Stree 2: सरकटे का आतंक Movie Review
स्त्री २ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट स्त्री याचा सिक्युल आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये राजकुमार राव तसेच श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तसंच सर्वांचं आवडते अभिनेते पंकज त्रिपाठी सुद्धा या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. स्त्री 2018 ने जसा धुमाकूळ घातला होता त्याहूनही जास्त स्त्री २ ने देखील बॉक्स ऑफिस मधून सोडले आहे.
भारतात फारसं प्रसिद्ध नसलेलं Genre स्त्री या चित्रपटा द्वारे सादर करण्यात आला होता प्रेक्षकांनी त्याला पसंती द्वारे सिनेमा सुपरहिट केला होता. स्त्रीमध्ये चुडेल या संकल्पनेवर चित्रपटाची गोष्ट आधारित होती. तसंच स्त्री 2 सिनेमा सरकटे का आतंक यावर आधारित आहे. पंकज त्रिपाठी यांच्यासहित अपारशक्ती खुराना तसेच अभिषेक बॅनर्जी यांचा सुद्धा उत्तम अभिनयाचा आस्वाद प्रेक्षकांना मिळत आहे.
स्त्री २: Sequeal of Stree (2018)
2018 मध्ये नवोदित दिग्दर्शक अमर कौशिक यांनी एक असा चित्रपट लोकांच्या समोर आणला ज्याने हॉरर आणि कॉमेडी दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना परिश्रुत करणारा चित्रपट बनवला होता. स्त्री मध्ये अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत असून त्यांनी बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच छाप सोडली होती. स्त्री हा सिनेमा देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता कारण त्यात लोककथा आणि वास्तविक जीवनातील समस्यांचे परिपूर्ण मिश्रण आढळून आले होते.
Image Credit: Maddock Films
दिग्दर्शक अमर कौशिक यांनी या चित्रपटाद्वारे कुठलाही उपदेश न करता एका आगळ्यावेगळ्या प्रकाराने स्त्रियांच्या हिताचे समर्थन केले. तर आता दिग्दर्शक अमर कौशिक 2024 मध्ये सिक्युल घेऊन आपल्यासमोर आलेले आहेत. पण मागील सात वर्षात बरेच काही बदल सिनेसृष्टीत झालेले दिसतात. हॉरर कॉमेडी या या प्रकारचे अनेक सिनेमा मागील सात वर्षात प्रेक्षक समोर प्रदर्शित करण्यात आले आहेत. भारतीय सिनेमाने मागील सात वर्षात VFX आणि CGI गेम्स या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक वेगळीच उंची गाठली आहे. आता हे बघण्यासारखे आहे की स्त्री २ त्या दर्जाचा अनुभव प्रेक्षकांना देण्यात सफल होतो की नाही.
स्त्री २: चंदेरीचा शूर योद्धा विकी (Rajkumar Rao)
स्त्री (2018) प्रमाणेच स्त्री २ (Stree 2) मध्ये सुद्धा प्रसिद्ध कलाकारांचा संघ आपल्याला बघायला भेटतो. पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी पुन्हा त्याच उर्जे सोबत पडद्यावर दिसत आहेत. मागच्या वेळी प्रमाणे चंदेरी हे गाव पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. पण मागच्या वेळी सारखे स्त्री नाही तर एका पुरुषाने या गावांमध्ये हाहाकार माजवला आहे. त्या शीर नसलेल्या राक्षसाला “सरकटा” असे नाव दिले आहे. मागच्या वेळी जसे पुरुष संकटात होते तसे यावेळी स्त्रिया संकटात आहेत असे दाखवण्यात आले आहे तर हा जो सरकटा आहे, तो स्त्रियांचा शिकार करून त्यांना दाबून ठेवतो. स्त्री 2 चे पोस्टर असू द्या किंवा सिनेमातले दृश्य असूद्यात आपल्याला Stranger things ची आठवण करून देतात.
आता चंदेरीचा हा शूर योद्धा विकी म्हणजेच राजकुमार राव या सरकटे चा आता कसं थांबवणार हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. अर्थातच या मिशनमध्ये मदत करण्यास स्त्री म्हणजेच श्रद्धा कपूर त्याच्या मदतीस येणार आहे. त्याच बरोबर भेडिया म्हणजेच वरून धवन त्यांच्या मदतीस येतो. वरून धवन हा त्या चित्रपटातला सरप्राईज एलिमेंट होता.
स्त्री 2: 100 कोटीचा गल्ला! 3 दिवसात!
स्त्री 2 हा सगळ्यात जास्त स्टोरी लाईन मध्ये मार खाताना आढळून येत आहे. सुदैवाने उत्तम कलाकार असल्याने त्यांनी हा चित्रपट पडू दिला नाही हे लक्षात येते. काही ठिकाणी अतिशय गोंगाट आणि बऱ्याचदा सहन उद्या पलीकडच्या आवाजाने चित्रपट बघणे जड जाते. सुदैवाने कलाकार कथेची कमतरता भरून काढत आहेत. राजकुमार राव यांच्या कॉमिक टाइमिंग उत्तम असल्याकारणाने आणि ते त्यांच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये असल्याने सिनेमा बघणं जड जात नाही. श्रद्धा कपूरने स्त्रीच्या भूमिकेत षडयंत्र तसेच रहस्य या दोघांचे अगदी अचूक मिश्रण प्रदान केले आहे. अपारशक्ती खुराणा आणि अभिषेक बॅनर्जी यांची पात्रे चांगल्या प्रकारे प्रदर्शित केल्याने एकूण कथेमध्ये त्यांचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे ते समजते. तसेच पंकज त्रिपाठींच्या प्रत्येक डायलॉग नंतर शिट्ट्यांचा वर्षाव होताना दिसतो.
Video Credit: FlickVerse
चित्रपटाला Multiverse फील देण्याचा स्त्री 2 चा क्रॉसवर प्रयत्न एकदम चुकीचा वाटत आहे. स्त्री विश्वाकडे स्वतःहून देण्यासारखा बरेच काही आहे आणि भेडिया जोडून त्यात अधिक पात्रे कथेत जोडून उगाचंच सौम्य केल्यासारखे वाटते. परंतु चित्रपटाचे मुख्य टर्म कार्ड म्हणजेच अक्षय कुमारचा एक इलेक्शन कमी आहे जो शेवटी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच मनोरंजनाच्या दृष्टीने स्त्री तू हा बघण्यासारखा चित्रपट असून हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.