Bigg Boss Marathi 5 | पहिल्याच दिवशी झाली बाचाबाची! अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांचात वादाची सुरुवात!

Bigg Boss Marathi Season 5: पहिल्याच दिवशी झाली बाचाबाची!

कलर्स मराठी या नावाजलेल्या वाहिनीवर 28 जुलै 2024 रोजी बिग बॉस मराठी सीजन 5 ची सुरुवात झाली. या सीझनचा होस्ट आपल्या सर्वांचा अभिनेता महाराष्ट्राचा आवडता सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख असून त्याने या सीजन ची जोरदार सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर यांच्या नंतर होस्ट म्हणुन रितेश देशमुख वरचढ ठरतात की खाली पडतात हे बघण्यात दर्शक उत्सुक आहेत. दर सीजन प्रमाणे यावेळी ही एक आगळी वेगळी थीम बिग बॉस मराठी मध्ये बघायला मिळत आहे.

बिग बॉस चा dilemma सदस्यांना झेपेल का?

प्रत्येक सीझनमध्ये एक नवीन थीम घेऊन बिग बॉस आपल्यासमोर येतात. तसेच यावर्षी देखील सदस्यांना एका मोठ्या डिलेमामध्ये बिग बॉस ने टाकले. प्रत्येक सदस्यांना रितेश यांनी एक प्रश्न विचारला. त्यांची आवडती वस्तू किंवा बिग बॉस करन्सी. या सीझनमध्ये कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी किंवा कुठलेही ऐश्वर्यासाठी सदस्यांना मोजावे लागतील कामात करन्सी . हे पैसे म्हणजेच बिग बॉस ची करन्सी. असंच वर्षा उसगावकर यांना रितेश ने विचारलं, एक हफ्त्यासाठी पावर कार्ड किंवा दहा हजार करन्सी जी घरातल्या सगळ्यांच्या कामात येईल. पावर कार्डची पावर अशी होती की एक हप्त्यासाठी घरातल्या सगळ्या ड्युटी पासून मुक्तता मिळणार. वर्षा यांनी पावर कार्ड घेऊन स्वतःला सगळ्या बिग बॉसच्या घरातल्या ड्युटी पासून मुक्त ठेवले.

उशिरा आंघोळ केल्याने झाले वाद!

पहिल्याच दिवशी Bigg Boss यांना वाट बघायला लावल्यामुळे सर्वच घरातले सदस्य वर्ष उसगावकर यांच्यावर भडकले. निक्की तांबोळी अगदी उद्धटपणे वर्षा ताई यांना या वयात मेकअप करून तरी काय असं होणार आहे? असा प्रश्न विचारला. Bigg Boss च्या आदेशाला न जुमानता, मेकअप करण्यात इतक्या गुंग झाल्या वर्षा उसगावकर की सगळेच सदस्य त्यांच्यावर ओरडले. असं असताना निक्की तांबोळी त्यांना हाक मारायला बेडरूम मध्ये गेली असता उगाच नको ते कारण देऊन वर्षाने अजून वाट बघायला लावली.

Video credit: Rajshri Marathi ShowBuz

वर्षा उसगावकर यांना दिला Bigg Boss ने दंड!

आज वरचा असा इतिहास आहे की उद्धट आणि उशीर करणाऱ्या सदस्यांना Bigg Boss ने कायमच शिक्षा सुनावली आहे. वर्षा उसगावकरांच्या अशा वागण्यामुळे आता बिग बॉस त्यांना काय शिक्षा सुनावतात हे बघण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

कोण हिट कोण फ्लॉप ?

बिग बॉस मराठी च्या पहिल्याच दिवशी प्रीमियर नंतर प्रेक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही प्रेक्षक इंस्टाग्राम रील इन्शुरन्सर कंटेंट क्रियेटर सुरज चव्हाण याच्यावर नाराज आहेत काहीजण कमेंटमध्ये म्हणतायेत याला काही येत नाही तरीसुद्धा याला कसं काय बिग बॉस मराठीत घेतले हा मोठा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

कोण आहेत Bigg Boss Marathi चे 16 सदस्य?

Bigg Boss Marathi Season 5 contestants list

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

  1. वर्षा उसगावकर
  2. अभिजीत सावंत
  3. निक्की तांबोळी
  4. आर्या जाधव
  5. अंकिता वालावालकर
  6. अरबाज पटेल
  7. धनंजय पवार
  8. घनश्याम दरोडे
  9. इरिना रुदाकोवा
  10. जान्हवी किल्लेेकर
  11. निखिल दामले
  12. पंढरीनाथ कांबळे
  13. पुरुषोत्तम पाटील
  14. सुरज चव्हाण
  15. वैभव चव्हाण
  16. योगिता चव्हाण

वर्षा उसगावकर यांनी पॅडी कांबळेला ओळखलंच नाही ?

बिग बॉस मराठी च्या या सीझनमध्ये आपला मराठी अभिनेता पॅडी कांबळे हा देखील सहभागी झाला आहे. त्याच्या एंट्री च्या वेळी वर्षा उसगावकर यांना तो लांबून दिसला नाही, म्हणून त्यांच्या तोंडून निघालेल्या वाक्यामुळे त्यांना आता प्रेक्षक आणि सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांना वाटलं की हा अंशुमन विचारे आहे जो की पॅडीलासुद्धा कळलं नाही की नेमकं वर्षाताई त्याला ओळखतात किंवा नाही. याच कारणामुळे पहिल्याच दिवसापासून वर्षाताईंना सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाली आहे.

त्याचबरोबर रील स्टार सुरज चव्हाण याला देखील ट्रोल केले जात आहे. त्याचा मुख्य कारण असं की निवड करताना त्याला कळलेच नाही की नेमकं काय घ्यायचं. फक्त त्याच्या नेहमीप्रमाणे तेवढेच आपलं बोलीत गोलीगत, बुक्कीत टिंगूड. या असल्या वागण्यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत राहतो, नेमका तो काय करेल बिग बॉसच्या घरात ह्यावर सगळ्यांचे लक्ष आहे.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Bigg Boss Marathi Season 5 | छोटा पुढारी, पॅडी कांबळे आणि रिलिस्टर गुलीगत सुरज चव्हाण आले बिग बॉसच्या घरात!

Leave a comment