Maruti Suzuki Brezza फेसलिफ्ट 2026
Maruti Suzuki Brezza Facelift 2026: नवीन मारुती सुझुकी ब्रेझा कारची बुकिंग्स सुरू आहे. ग्राहकांना ही कार बुक करण्यासाठी ₹11,000 टोकन अमाऊंट भरावी लागेल. ह्या नवीन गाडीमध्ये बरेच नवे फिचर्स आणि स्टाईलचे बदल बघायला मिळणार आहे.
Features
Exterior Design
मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट 2026 मध्ये बरेच आकर्षक बदल ग्राहकांना बघायला मिळणार आहेत. लक्झरीयस इंटिरिअर सोबतच स्टायलिश आणि स्पोर्टी एक्स्टेरियर बघायला मिळणार आहेत. असे सांगण्यात येत आहे की ह्या नवीन फेसलिफ्ट 2026 मॉडेलचा एकंदरित आकारामध्ये फारसा बदल नसेल परंतु हे काही छोटे बदल ब्रेझाला एक मनमोहक रूप नक्कीच देईल. ह्या नवीन ब्रेझा कारचा नवीन लुकचा ट्रेलर आजच प्रसारित झाला असून ह्या गाडीचा ट्रेलर मध्ये बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आहे.
Interior Design
नविन मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट 2026 मॉडेलचा सर्वात मोठा बदल आपल्या तिचा इंटिरिअर डिझाइन मध्ये बघायला मिळणार आहे. बरेचसे कनेक्टेड कार फिचर्स बदलण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच बरोबर वायरलेस फोन चार्जिंग, क्रूस कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि डिस्प्ले बदलण्यात येण्याची शक्यता आहे.

पण ह्याहूनही एक मोठा बदल ब्रेझा कारचा इंटिरिअर मध्ये करण्यात आलेला आहे. Brezza चा सर्वात मोठा बदल तिचा केबिन मध्ये करण्यात आलेला आहे. नवीन ब्रेझा 2026 मध्ये आपल्याला 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम बघायला मिळणार असल्याचे सांगितले जाते. ह्या पूर्वीचा जुन्या ब्रेझा कारचा डिस्प्ले 9-इंच इतका होता. त्याच बरोबर अनेक आधुनिक डिझाईन्स आणि फिचर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत.
नवीन मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट 2026 कधी लॉन्च होणार आहे?
मारुती सुझुकी कंपनीची ग्राहकांना सर्वात जास्त आवडणारी आणि सर्वात जास्त विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV म्हणून ओळखली जाणारी कार आहे. ग्राहकांचा भेटीला ब्रेझा 2016 मध्ये आली होती. तेव्हा पासूनच मारुती सुझुकी ब्रेझा सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार्स पैकी एक आहे.
ब्रेझा कारची बुकिंग सुरू झाली आहे. लवकरच 23 जुलै 2026 रोजी ही गाडी ग्राहकांचा भेटीस येणार आहे. अँडव्हान्स बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना ₹11,000 टोकन रक्कम भरावी लागेल. बुकिंग ऑनलाईन म्हणजेच मारुती सुझुकी कंपनीचा अधिकृत वेबसाईट वर करता येईल. तसेच आपल्या जवळच्या शोरूममध्ये देखील करता येणार आहे.
Video Credit: @HarshVLOGS
नवीन मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट 2026 मध्ये CNG आहे का?
हो! नवीन ब्रेझा मध्ये CNG आहे. पण त्यातही महत्त्वाचा बदल बघायला मिळणार आहे. मारुती सुझुकी व्हिक्टोरिस सारखेच अंडरफ्लोअर-माउंटेड CNG टँक आपल्याला ब्रेझा 2026 मध्ये सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता आहे. ह्या बदलांमुळे बूट स्पेस नक्की वाढणार आहे.
अजून एक मोठा बदल म्हणजे 6-गियर मॅन्युअल गियरबॉक्स आहे. ह्यापूर्वी 5-स्पीड युनिट वापरला जात होता. ह्या बदलांमुळे महामार्गांवर गाडी चालवणे अजून सोपे आणि आरामदायक होईल.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News
Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News