Maharashtra Election Result लोक पोल | राज्यात महायुती आणि महाआघाडीचे भविष्य नक्की काय असणार..? MVA-162 तर.. महायुती ला 128 जागा.? Great Lead

Maharashtra Election Lok Pol Result: महाआघाडीला 152-162 जागांवर बहुमत मिळणारं तर महायुती ला 115-128 जागांवर विजय.?

Maharashtra Election Result: राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे भविष्य नक्की काय असणार..? कोण सत्ते येणार याबद्दल राजकीय विश्लेषकांकडून अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. महायुतीला लाडकी बहीण योजना चा फायदा होईल असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे, पवार आणि काँग्रेस यांच्या बाजूला वातावरण असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सत्तेत कोण येणार.? कोणाला फटका बसणार.? याचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचा अंदाज लोकपोल या संस्थेच्या सर्वेतून मांडण्यात आला आहे. या सर्वेणुसार महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुती मात्र 145 या बहुमताच्या आकड्यापासून खूप लांब राहील असे अंदाज या सर्वेंमधून मांडण्यात आले आहेत.

लोक पोलच्या या सर्वेमधुन महायुतीला कमी तर महाविकास आघाडीला जास्त जागा मिळण्याची संधी मिळेल असे अंदाज लोक पोल च्या सर्व मधून मांडण्यात आलेत. कोणाला किती जागा देण्यात आल्यात महायुतीला कमी आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळण्याची नेमकी कोणती कारणे सांगण्यात आली आहेत तेच आपण जाणून घेऊया. (Maharashtra Election Result) राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोक पोल कडून हा सर्वे घेण्यात आला होता. महाराष्ट्र मेगा लोक पोल सर्वे असे या सर्वेला नाव देण्यात आले आहे. या सर्वेचा कालावधी स्पष्ट करण्यात आला नसला तरी प्रत्येक मतदारसंघातील जवळपास 300 मतदारांशी स्वतः बोलून एकूण 86,400 नागरिकांची मत जाणून घेऊन लोक पोलने हा सर्वे करण्यात आल्यास कडून सांगण्यात आले आहे.

Maharashtra Election Result

Telegram Group Join Now

(Maharashtra Election Result) महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांसोबतच त्यांच्या वोट शेअर चा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे. लोक पोल सर्वेनुसार महाविकास आघाडीला 152 ते 162 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे त्याचबरोबर महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय बेल असे देखील अंदाज वर्तवण्यात आले आहे आणि इतर पक्षांना पाच ते 14 जागांवर निवडून येतील असे अंदाज वर्तवण्यात आले आहे. याचाच अर्थ महायुतीला पूर्णतः बहुमत मिळणार नाही असे अंदाज लोकपूलच्या या सर्व मध्ये वर्तवण्यात आले आहे.

पण कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मात्र या सर्व मधून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. टक्केवारीनुसार महायुतीला 37 ते 40 टक्के तर महाविकास आघाडीला 43 ते 46 टक्के आणि इतर व अपक्ष पक्षांना 16 ते 19 टक्के मतदान होण्याची शक्यता लोक पोलच्या सर्वे मध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेचे चित्र देखील त्यासारखेच असेल असे त्यांच्या सर्वेनुसार सांगण्यात येत आहे. या सर्वेनुसार महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आपली सत्ता स्थापन करेल असा एक अंदाज दिसत आहे. राज्यात आपले सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. तसेच या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 152 ते 162 जागांवर विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे यानुसारच महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सर्वेतून महायुती ही महाविकास आघाडीच्या जागांपासून 17 ते 30 जागा मागे राहण्याची शक्यता.?

(Maharashtra Election Result) त्यामुळे महाविकास आघाडी बहुमतांचा आकडा पार करताना दिसत आहे. दिसते गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीने महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असं उभं केलेल्या नरेटीव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असणारा असंतोष त्याच बरोबर मराठा आरक्षणाचा फायदा लोक पोलच्या सर्वे नुसार महाविकास आघाडीला मिळताना दिसत असल्यास नमूद करण्यात आल आहे. महायुतीच्या सरकारने लोकसभेतील पराभवानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या होत्या त्यात लाडकी बहीण योजना गेम बदलणारी ठरेल असे दिसतं होते.

परंतु लोक पोल च्या सर्वेतून महायुती ही महाविकास आघाडीच्या जागांपासून 17 ते 30 जागा मागे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण सारख्या योजना मतांमध्ये परिवर्तन न झाल्याचे दिसून आले होते. लोक पोल च्या माहिती हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो परंतु काही दिवसांपूर्वी आलेल्या (IANS-MATRIZE) च्या बातमी पत्रात त्यांनी केलेल्या सर्वेनुसार मात्र लोक पोलच्या अगदी विरोधात अंदाज वर्तवण्यात आलेला होता.

Video credit: @TV9MarathiLive

(Maharashtra Election Result) ह्या अहवालात महायुतीने 145 ते 165 जागांवर विजय प्राप्त करून बहुमतात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागांवर विजय मिळेल असं देखील अंदाज वर्तवण्यात आला होता. राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रा त काँग्रेसला 17 टक्के ठाकरे गट 16.9 टक्के तर शरद पवार गट 10.3 टक्के एकूण महाविकास आघाडीला 44.2 टक्के जागांवर एवढी मत मिळाली होती. लोकसभेच्या निकालावरून महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक 1 टक्क्याची घट ते 3-4 टक्क्यांची वाढ मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(Maharashtra Election Result) राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये 2024 मध्ये भाजपला 26.9 टक्के तर शिंदे गटाला 13% त्याचबरोबर अजित पवार गटाला 3.6% अशी एकूण 43% मतदन झाले होते. महायुतीला 37 ते 40 टक्क्यांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लोक पोलच्या सर्वेनुसार महायुतीची टक्केवारी विधानसभेत घसरन्याची शक्यता आहे असा अंदाज लोकपालच्या सर्व नुसार दिसत आहे. लोक पोल च्या सर्वेनुसार महायुती ला कमी मतदान होण्यामागची कारणं देखील स्पष्ट करण्यात आली आहेत. भाजपपक्षा कडून मतांच्या दूरवीकरणासाठी झालेल्या प्रयत्नांचा महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसू शकतो. (Maharashtra Election Result) महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे मतदारांचा कल राहिल्याने महायुतीला ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा फायदा होणार नाही असा हा सर्वे सांगतो.

सर्वेनुसार राज्यात महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा मुद्दा भावनिक आणि महत्त्वाचा बनला आहे.

(Maharashtra Election Result) भाजपा बद्दल मोठ्या प्रमाणावर सत्ताविरोधी असून राज्यात फडणवीस यांच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचाही महायुतीला फटका बसु शकतो असा अंदाज वर्तवला जात आहेत. पण एकनाथ शिंदे मात्र महायुतीचे लोकप्रिय नेते असतील असा देखील अंदाज लोक पोल सर्वे सांगत आहे. लोक पोलच्या सर्वेनुसार राज्यात सध्या महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा मुद्दा भावनिक आणि महत्त्वाचा बनला आहे. ज्याचा फटका महायुतीला बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे वळताना दिसत असला तरी हा ओबीसी मतदार विभागाला गेला आहे.

त्यामुळे ओबीसीचा महायुती घडवणारा धृवीकरण पूर्णपणे झालं नसतल्याचा ह्या सर्वच अंदाज आहे. लोकपोल सर्वेनुसार मराठा मत महाविकास आघाडीच्या पाठी उभे राहतील तर ओबीसी मतांचा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मत विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओबीसी शेतकऱ्यांमध्ये असणारा असंतोष ओबीसी मतांचा विभाजन होण्याचा प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं आहे. सोयाबीन आणि कापसाला हमीभाव न मिळाल्याने हा देखील मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा असेल. दोन्ही पिकांच्या हमीभावावरून ग्रामीण भागात खुप जास्त असंतोष दिसून येत आहे असे ह्या सर्व मध्ये नमुद करण्यात आले आहे.

लोक पोल च्या ह्या सर्वेनुसार अजित पवार हे महायुती मधील सगळ्यात कमकुवत लिंक आहेत.?

(Maharashtra Election Result) पक्षाप्रमाणे विचार केला तर लोक पोल च्या मते काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात येऊ शकतो असे देखील सांगण्यात येत आहे. काँग्रेसचा हा उदय भाजपला पर्याय म्हणून उभा राहतोय तर भाजप अजून सुद्धा संघर्ष करत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला हा आक्रमक प्रचार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बुस देत असल्याचे सर्वे सांगतो आहे. लोक पोल च्या ह्या सर्वेनुसार अजित पवार हे महायुती मधील सगळ्यात कमकुवत लिंक आहेत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं काँग्रेसच्या मतांवर अवलंबून असण ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जात आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम पक्ष निवडणुकीवर फारसा प्रभाव पडणार नाही असे दिसुन येत आहे. परंतु बंडखोर उमेदवार हे आव्हाहन करतांना दिसतील असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीवर फारसा प्रभाव पडणार नाही पण बंडखोर उमेदवार आव्हान निर्माण करताना दिसू शकातो असा अंदाज लोक पोल च्या सर्वेने केला आहे.

लोक पोल सर्वे चा अंदाज खरा ठरेल का.?

लोक पोल सर्वे चा अंदाज खरा ठरेल का या साठी आतापर्यंत लोक पोल ने केलेल्या काही निवडकांच्या सर्वे बद्दल आपण जाणून घेऊया.

(Maharashtra Election Result) हरियाणा निवडणुकीच्या आधी केलेल्या सर्वेमध्ये लोक पोल ने दिलेल्या माहितीनुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 20-29 जागांवर विजय मिळेल तर काँग्रेस ला 58-65 जागांवर विजय प्राप्त होईल असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात हरियाणा मध्ये भाजप ही बहुमतांनी सत्तेत आली होती. तसेच मध्यप्रदेशात सुद्धा लोकपोल ने केलेल्या सर्वेत काँग्रेस ला130-142 जागांवर बहुमत मिळेल आणि भाजपला फक्त 84-98 जागांवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्ष निकालात भाजपला सगळ्यात जास्त बहुमत प्राप्त झाले होते.

भाजपला विधानसभा 2023 निवडणुकीत मध्यप्रदेश मध्ये एकूण 163 जागांवर बहुमतांनी विजय मिळाला होता. यानुसार लोकपोल चा निवडणुकी आधीचा सर्वे आणि प्रत्यक्ष हाती आलेले निकाल ह्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक पोल ने महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील फक्त 300 लोकांसोबत बोलून लोकपोल ने हा सर्वे तयार केला आहे. त्यामूळे लोक पोल चा हा अंदाज किती खरा ठरेल ते येत्या 23 नोव्हेंबरला कळणार आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

रितेश देशमुख यांचं लातूर येथे लय भारी झापुक झुपुक स्टाईल मध्ये भाषण..!

Riteish Deshmukh Viral Speech | रितेश देशमुख यांचं लातूर येथे लय भारी झापुक झुपुक स्टाईल मध्ये भाषण..! 1 Strong Leader

 

Leave a comment