लहान भाऊ धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख यांचं लातूर येथे लय भारी भाषण.
Riteish Deshmukh Viral Speech: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश विलासराव देशमुख रणांगणात उतरले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व पक्षांच्या जोरदार सभा सुरू आहेत. रोज नवनवीन किस्से पाहायला मिळत आहेत. कोणाला लोक पसंत करत आहेत कोणाला नाही हे सध्या आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही युतीचे नेते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत.
अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबई येथील माहीम येथे सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांचे जुने दिवस आठवले. मुलासाठी राज साहेबांनी जोरदार भाषण दिले. Riteish Deshmukh Viral Speech त्याचबरोबर धीरज विलासराव देशमुख हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून लातूर मतदारसंघातून ते उभे आहेत. गेली अनेक वर्ष धीरज विलासराव देशमुख हे निवडून येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. धीरज विलासराव देशमुख हे अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांचे ते धाकटे भाऊ आहेत. लातूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी गेली अनेक वर्ष देशमुख कुटुंबीय काम करत आहेत आणि त्या कामाची पावती Riteish Deshmukh Viral Speech म्हणून लातूर जिल्ह्यातील जनता ही धीरज विलासराव देशमुख यांना निवडून देत आहे.
तुमच्यामुळे धिरज ला धिरज भैय्या म्हणुन हाक मारेल..!
Riteish Deshmukh Viral Speech: रितेश देशमुख यांनी त्यांच्या भाषणात सुरुवातीला धीरज विलासराव देशमुख यांच्या बद्दल जनतेशी संवाद साधताना एक किस्सा सांगितलं लहानपणापासून देशमुख यांना रितेश धीरज म्हणून हाक मारत आले आहेत परंतु जनतेच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने धीरज हा फक्त आता धिरज नाही तर धिरज भैय्या म्हणून ओळखला जातो आहे आणि मी सुद्धा धीरज यांना धीरज भैय्या म्हणूनच हाक मारेल असे देखील रितेश देशमुख म्हणाले. रितेश देशमुख यांनी त्यांच्या लय भारी स्टाईल मध्ये भाषण केले.
त्यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले या सभेला जमलेली ही जी गर्दी आहे आणि जनता आहे ही म्हणजे धिरज विलासराव देशमुख यांच्या विजयाची पावती आहे आणि ही म्हणजे लीड आहे लीड असे म्हणून सांगितले. पुढे भाषणात विरोधी पक्ष नेहमीच धिरज देशमुख यांच्याकडे तुम्ही त्यांच्या पक्षात सामील व्हावं म्हणून तुमच्याकडे येतात तरीसुद्धा आजपर्यंत तुम्ही ज्या निष्ठेने पक्षाशी प्रामाणिक आहात त्यासाठी ही जनता येथे जमली आहे हीच पावती आहे तुमच्या निष्ठेची आणि हा जो स्वाभिमान आहे तोच लातूरचे स्वाभिमाना आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीचा स्वाभिमान आहे. या लातूरच्या जनतेच्या स्वाभिमान आहे असे देखील रितेश देशमुख यांनी आपल्या भाषणात संबोधित केले.
बिग बॉस मराठी नंतर पहिल्यांदा रितेश देशमुख महाराष्ट्रातील जनतेसमोर.
Riteish Deshmukh Viral Speech: रितेश देशमुख यांच्या भाषणाच्या वेळी जनतेतून रितेश भाऊंनी “भाऊचा धक्का” असा देखील आवाज देत होते. पुढे रितेश देशमुख यांनी आपल्या भावाबद्दल म्हणजेच धीरज विलासराव देशमुख यांच्या बद्दल त्यांच्या कामाचा उल्लेख केला लातूरच्या जनतेने गेल्या पंचवार्षिक मध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक लाख मतांनी धीरज विलासराव देशमुख यांना निवडून आणले होते तसेच यावेळी देखील धीरज विलासराव देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन रितेश देशमुख यांनी केले.
शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेती विषयी व्यापार पिकांना भाव मिळावा याचे प्रश्न असतील किंवा महिलांच्या सुरक्षेचे आणि ग्रामीण विकासाचे प्रश्न असतील त्यांच्यावर धीरज देशमुख हे नक्कीच काम करतील आतापर्यंत केलेल्या कामांची पावती ही लातूर जिल्ह्यात आणि परिसरात दिसूनच येत आहे. Riteish Deshmukh Viral Speech पुढे अजूनही बरीच काम करायची आहेत त्यासाठी महाआघाडीचे जे सरकार आहे त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राला चांगल्या स्थितीवर पोहोचवायचे आहे म्हणून रितेश देशमुख यांनी महविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकांनी भरपूर मतांनी विजय मिळवून द्यावा असे देखील रितेश देशमुख आपल्या भाषणात संबोधित केले.
Riteish Deshmukh Viral Speech: आज आपले युवक लातूर पॅटर्न मध्ये शिक्षण घेत आहेत परंतु त्या युवकांसाठी महाराष्ट्र कुठे रोजगार नाहीत युवक बेरोजगार फिरत आहेत. रोजगार द्यायची जबाबदारी कोणाची आहे हे देखील सरकार विसरला आहे. रोजगार नाही शेतकऱ्याच्या पिका- पाण्याला भाव नाही. सरकारला भानावर आणून देण्यासाठी जनतेने माहा आघाडीला मतदान केले पाहिजे असे देखील येथे देशमुख म्हणाले. गेल्या वेळी लातूर कर जनतेने धीरज विलासराव देशमुख यांना एक लाख मतांनी विजयी केले होते परंतु यावेळी जनतेला रितेश देशमुख यांनी सांगितले की यावेळी मतदान करताना धीरज देशमुख यांच्या नावासमोरच मशीन चं बटन एवढा जोरात दाबा की पुढच्या वेळी विरोधकांची डिपॉझिट कायमची जप्त व्हायला पाहिजे.
समोर गोलीगत धोका आहे त्यामुळे सावधान रहा.!
Riteish Deshmukh Viral Speech: लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे झाला होतं तसंच आता विधानसभेच्या वेळी झापुक झुपुक् वार आहे त्यामुळे काही काळजी करू नका. त्याचबरोबर विरोधकांना टोला देत रितेश देशमुख यांनी बिग बॉस मराठी च्या season गाजलेला सुरज चव्हाणचा डायलॉग हाणला. सीझन ५ मधील सदस्य सुरज चव्हाण याचे काही डायलॉग गाजले होते. तोच डायलॉग रितेश देशमुख यांनी त्यांच्या वेगळ्या स्टाईल मध्ये युवकांसमोर मांडले ह्या नंतर रितेश देशमुख यांच्या साठी गर्दीतून टाळ्या शिट्ट्या पडल्या होत्या. समोर गोलीगत धोका आहे त्यामुळे सावधान रहा त्या धोक्याला बळी पडू नका आपला उमेदवार चांगला आहे म्हणून एक नंबर च बटन दाबून त्यांना निवडून द्यावं असे देखील रितेश यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
Video Credit: @abpmajhatv
Riteish Deshmukh Viral Speech: EVM machine वर अनेक नावं आहेत आणि त्यांच्या भावाचे म्हणजेच धीरज देशमुख यांचे बटन कोणते हे जनतेला रितेश देशमुख यांनी पटवून दिले. कृष्ण गीतेत म्हणाले आहेत कर्म करत राहणे हाच आपला धर्म आहे. Riteish Deshmukh Viral Speech आणि जो कर्म करतो त्याला धर्माकडे बघण्याची गरज नाही कारण आपले कामच आपला धर्म असतो असे म्हणत रितेश देशमुख यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. सध्या विरोधी पक्षाचे धर्माच्या नावावर राजकारण करत आहे ते फक्त काम करत नाहीत म्हणून धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत.
जो काम करत नाही तोच धर्माच्या नावावर राजकारण करतो असे म्हणत रितेश देशमुख यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. पुढे रितेश देशमुख यांनी जबरदस्त भाषण करत जनतेचे मन जिंकले. धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या कामाचं काय ते आम्हाला सांगा..? धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या पिका पाण्याला भाव काय याचा सांगा..? धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का नाही याचे उत्तर द्या..?? असे म्हणत रितेश देशमुख यांनी महायुती वर निशाणा साधला. लातूर जिल्ह्यातील युवक मेळाव्यात रितेश देशमुख यांचे भाषण जोरदार गाजले. बूथ वर आपल्या आपल्या भागात किती किती मतदार आहेत त्यांना मतदानाच्या दिवशी मदत करा. सर्वांना मतदान करण्याचे आव्हाहन Riteish Deshmukh Viral Speech रितेश देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक येत्या २० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदात्यांनी आपला मतदानाचा अधिकार नक्कीच वापरावा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करून आपले योगदान करावे असे देखील रितेश देशमुख Riteish Deshmukh Viral Speech यांनी आपल्या भाषण सांगितले. युवकांनी आपापल्या वार्डमध्ये आपल्या मतदारांना वयोवृद्ध माणसांना आणि ज्यांना मदत हवी असेल अशा लोकांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्र पर्यंत पोहोचवून मदत करावी असे देखील आव्हान रितेश देशमुख यांनी युवकांना केले.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षाचे आणि महायुतीचे सरकार हे सध्या जोरदार प्रचार करत आहे लोकसभेत मिळालेल्या निकालावरून हे स्पष्ट झाले होते की महायुती सरकारचे देखील वर्चस्व महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळेच दोन्हीही युतींचे नेते आता महाराष्ट्रभर प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. भाजप पक्षाच्या उमेदवारांसाठी त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात भाषण करणार आहेत.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
manoj Jarange | आम्ही आमचा गेम शेवटच्या दोन दिवसात दाखवू – मनोज जरांगे पाटील