Bigg Boss Marathi S05 : भाऊच्या धक्क्यावर, मांजरेकरच हवेत, रितेश भाऊ नको ! नेटकरी वैतागले! Worst Host Ever!

Bigg Boss Marathi Season 5: नेटकरी वैतागले!

सध्या चर्चेत असलेल्या कलर्स मराठी वरील मराठी बिग बॉस Bigg Boss Marathi चा हा सीजन चांगलाच गाजत आहे. बिग बॉसच्या घरात आलेले सर्वच स्पर्धक आपापल्या डोक्याने खेळत आहेत. ह्या सिझनला महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख होस्ट करत आहे.

गेले काही सीजन महाराष्ट्राचे कणखर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करीत होते. आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांना होस्ट म्हणून आणा अशी मागणी सोशल मीडियावर बिग बॉस प्रेमींकडून होत आहे. वीकेंड चा वार शनिवार आणि रविवार या दिवशी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख हे येतात आणि आठवडाभर झालेल्या चर्चांवर ते बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांची चूक समोर आणून देतात. कोण कसा वागतोय कोण काय बोलतोय महाराष्ट्रातील जनतेला कोण खटकते आहे ह्या सगळ्या विषयांवर भाऊच्या धक्क्यावर आलेले होस्ट रितेश देशमुख हे सर्व सदस्यांची शाळा घेतात.

निक्की ला आणि तिच्या ग्रुप ला चांगलेच सुनावले पाहिजे हीच अपेक्षा !

सोशल मीडियावर सध्या बिग बॉस मराठी Bigg Boss Marathi ची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही सीजनच्या व्हिडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात महेश मांजरेकर हे घरातील सदस्यांना कसे झापतात आणि ओरडतात त्याचे व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक वर खूप जोरदार व्हायला होत आहे. ह्याचमुळे सध्या रितेश देशमुख आणि महेश मांजरेकर यांच्या बद्दल चर्चा सुरू आहे. रितेश देशमुख हे नेहमीच घरातील सर्व सदस्यांना मान देऊन बोलत असतात. आणि त्यांचा राग खूप कमी आहे ह्यामुळे बिग बॉस प्रेमी खूप वैतागलेत. त्यांनी निक्किला आणि जान्हवीला ओरडून सुद्धा त्या पुन्हा आपल्या थाटात दिसतात असे वाटते की त्यांना रितेश सरांच्या बोलण्याचा काही फरकच पडत नाही असे सोशल मीडियावर नेटकरी म्हणत आहेत.

ह्याच जागी मांजरेकर असते तर ह्या निक्कीला आणि त्या जान्हवीला सोबतच त्या वैभवला आणि अरबाजला सुद्धा धडा शिकवून कामाला लावले असते. मराठी भाषेचा अपमान होतो ज्येष्ठ कलाकारांचा अपमान होतो मराठी प्रेक्षकांचा अपमान होतो तरीदेखील रितेश भाऊ एवढ्या प्रेमाने रागवतात ह्याचा संताप सोशल मीडियावर होत आहे.

गेला होता पुढारी बनून, झाला आता चमचा ?

त्याचबरोबर Bigg Boss Marathi मध्ये छोटा पुढारी म्हणून गेलेल्या घनश्यामला सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केला आहे. ग्रुप A आणि ग्रुप B सध्या असे दोन ग्रुप आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहेत. ग्रुपमध्ये निक्की बरोबर छोटा पुढारी उर्फ घनश्याम हा नेहमीच चिपकु आणि शेपूट सारखा फिरताना दिसतो असे बिग बॉस प्रेमी म्हणतायेत. नावाचा पुढारी आहे फक्त, लंगूर के हाथ मे अंगूर अश्या बऱ्याच टोमन्याचा मारा नेटकरी सोशल मीडियावर करत आहेत.

रितेश म्हणाला : भेडिये झुंड मे आते है, शेर अकेला आता है.

काल झालेल्या Bigg Boss Marathi च्या एपिसोड मध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश विलासराव देशमुख यांनी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. घरातील एक सदस्य गद्दार म्हणून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे त्याचा देखील उल्लेख रितेश भाऊंनी केला. वैभव चव्हाण हा ग्रुप B मधून खेळत असताना सुद्धा गद्दारी करून ग्रुप A ला जिंकव न्यासाठी काहीही करू शकतो असे भाऊ म्हणाले. त्याच बरोबर सध्या चर्चेत असलेला बिग बॉस मराठी च्या घरातील हिरो म्हणजेच सुरज चव्हाण याने मागील आठवडा गाजवला असे देखील रितेश भाऊ म्हणाले. सुरवातीचे दोन आठवडे सूरजला बिग बॉस च्या घरातील खेळ कसा खेळायचा ते कळत नव्हते. परंतु आता मात्र तो फारच उत्तम खेळायला लागला आहे. त्याच्या बद्दल रितेश भाऊ बोलताना म्हणाले या घरात एक नवा हिरोने जन्म घेतला आहे तो म्हणजे सुरज चव्हाण. सूरज ने एकट्याने ह्या ग्रुप A ला सडेतोड उत्तर दिले होते. त्याचबरोबर रितेश भाऊंनी एक कडकं डायलॉग हाणला ” भेडिये झुंड मे आते है, शेर अकेला आता है”! या वाक्यावर ग्रुप A मधील सदस्य निक्की आणि जान्हवी यांना चांगलीच मिरची लागली आहे.

Bigg Boss Marathi च्या मोठा ट्विस्ट! घरात उघडणार नवीन खोली; नाव आहे खूपच खास, पाहा प्रोमो

बिग बॉस मराठी च्या घरात सध्या दोन ग्रुप पडले आहेत ग्रुप A आणि ग्रूप B

Bigg Boss Marathi Season 5 .. Mahesh Manjrekar best host

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ग्रूप A मधील सदस्य निक्की, जान्हवी, अरबाज, घनश्याम आणि वैभव हे एकीने खेळतात असे सर्वांना दिसत आहे. ह्याच उलट ग्रुप B मध्ये आजूनही एकोपा नाही किंवा त्यांना कधीच कुठलाच टास्क हा strategy ने खेळता येत नाहीये असे देखिल सर्वांना दिसत आहे. तसे पाहायला जाता ह्या ग्रुप मध्ये लोकांची संख्या ही जास्त आहे. परंतु कधीच ह्यांचात एक मत होत नाही असे दिसून येते. ह्या ग्रुप मध्ये वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, सुरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, निखिल दामले, योगिता चव्हाण, धनंजय पवार, आर्या, इरीना हे आहेत.

आज कोण जाणार बिग बॉस मराठी च्या घरातून बाहेर??

कालपर्यंत नॉमिनेशन रूम मध्येBigg Boss Marathi च्या घरातील चार सदस्यांना उभ करण्यात आले होते. सुरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत. सोशल मीडियावर सध्या दोनच नाव चर्चेत आहेत ते म्हणजे निखिल दामले आणि योगिता चव्हाण. आज प्रदर्शित होणाऱ्या भागात दिसणार आहे कोण घरातून बाहेर जातो. मागील आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी एलिमिनेशन थांबवले होते कारण कलर्स मराठी वाहिनीचा एक नवा संकल्प त्यांनी सुरू केला आहे. सोशल मीडियावर सध्या योगिता चव्हाणचा नाव समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यात योगिता ने बऱ्याचदा बिग बॉसला आणि घरातील सदस्यांना सांगितले की तिला घरी जायचंय. योगिता चव्हाण नुकतच लग्न झालेला आहे. तिला तिच्या घरच्यांची खुप आठवण येते असे ती म्हणाली. ह्यावरून असे दिसत आहे की योगिता चव्हाण ही आज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Stree 2: १०० कोटींचं कलेक्शन! रेकॉर्ड ब्रेक कमाई! 3 दिवसात! Superhit हॉरर कॉमेडी

Leave a comment