मारुती सुझुकी New Dzire मुळे Tata Tigor आणि Hyundai ची Aura ची demand झाली कमी..? 2 Star 4 Star Rating Top

New Dzire मारुती सुझुकी Dzire मुळे Tata Tigor आणि Hyundai ची Aura ची demand झाली कमी..?

New Dzire: मारुती सुझुकी Dzire लॉन्च झाल्यापासून मारुती सुझुकी कंपनी च्या प्रतिस्पर्धी ह्युंदाई टाटा आणि होंडा ह्यांना आता मोठा फटका बसणार आहे. New Dzire सोबत तिच्या ह्या सेगमेंट मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून ह्युंदाई कंपनी ची Aura, टाटा मोटर्स ची Tiago कार आपल्या समोर आहेत. होंडा ने नुकतेच जाहिर केले आहे. होंडा Amaze ही नवीन अंदाजात आपल्या ग्राहकांच्या डिसेंबर 2024 मध्ये भेटीला येणार आहे. म्हणुन सध्या आपण New Dzire ला तिच्या सेगमेंट मधील सर्वोत्तम ठरलेल्या कार्स बद्दल जाणून घेऊया. तुम्ही देखील ह्या तिन्ही ही कार बद्दल संभ्रमात असाल कुठली कार घ्यावी आणि कुठली नाही तर ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आलो आहोत.

ह्याच बरोबर ह्या तिन्ही कार च्या engine बद्दल आणि power बद्दल जाणून घेऊया.

सारखाच सेगमेंट मधल्या तिन्ही कार चे engine जवळपास सारख्याच पॉवर चे आहे 1197 CC चे इंजिन मिळते. New Dzire 1.2 लिटर NA पेट्रोल इंजिन 80 bhp @112 NM, 68 bhp @102 nm (CNG), Hyundai Aura 1.2 लिटर NA पेट्रोल इंजिन 82 bhp @114 NM, 68 bhp @95nm (CNG), Tata Tigor, 1.2 लिटर NA पेट्रोल इंजिन 84 bhp @113 NM, 72 bhp @95 nm (CNG).

New Dzire

Telegram Group Join Now

Hyundai Aura मध्ये काय स्पेशल आहे जे New Dzire आणि Tata Tigor मध्ये मिळत नाही.?

Hyundai Aura ही कार New Dzire 2024 आणि Tata Tigor हिला 4 cylinder engine ह्या बाबतीत मागे टाकते. मारूती सुझुकी New Dzire ने आत्ता पर्यंत फक्त 3 cylinder engine दिले आहे. आणि Tata Tigor मध्ये सुद्धा फक्त 3 cylinder engine मिळते. ह्यामुळे आपल्या कार च्या pickup आणि परफॉर्मन्स मध्ये फरक पाडतो. 4 सिलिंडर इंजिन मुळे ह्युंदाई कंपनी ची Aura ही New Dzire आणि Tata Tigor पेक्षा वरचढ ठरते.

  1. Length in mm: Maruti Suzuki Dzire – 3995, Hyundai Aura – 3995, Tata Tigor – 3993.
  2. Width in mm: Maruti Suzuki Dzire – 1735, Hyundai Aura – 1680, Tata Tigor – 1677.
  3. Height in mm:  Maruti Suzuki Dzire – 1525, Hyundai Aura – 1520, Tata Tigor – 1532.
  4. Wheel base in mm: Maruti Suzuki Dzire – 2450, Hyundai Aura – 2450, Tata Tigor – 2450.
  5. Ground Clearance in mm: Maruti Suzuki Dzire – 163, Hyundai Aura – 165, Tata Tigor – 170.
  6. Boot Space in liter: Maruti Suzuki Dzire – 382, Hyundai Aura – 402, Tata Tigor – 410.

Air bags किती मिळतात.?

Global NCAP Safety मध्ये कोणत्या कार ला जास्त आणि कोणत्या कार ला कमी ratings मिळाल्या आहेत हे जाणून घेऊया. जागतिक वाहन बाजारात आता अनेक कार कंपन्या आपल्या lower end model पासूनच कार्स मध्ये 6 AIRBAGS अनिवार्य केलेल्या आहेत. कार ची Safety Ratings Global NCAP नुसार कमी जरी असली तरी सुद्धा AIRBAGS मुळे वाहन चालकाला सह कार मध्ये बसलेल्या पॅसेंजर कुठल्याही अपघातात ईजा होऊ नये त्यासाठी 6 AIRBAGS निश्चितपणे उपयोगी ठरतात.

New Dzire: नवीन Dzire कार मध्ये आता 6 Airbags आपल्याला पाहायला मिळतात.

Hyundai Aura: ह्युंदाई मोटर्स ने आपल्या सगळ्याचं कार्स ला आता 6 Airbags अनिवार्य केलेल्या आहेत. त्यामुळे Aura मध्ये सुद्धा आपल्या 6 Airbags मिळतात.

Tata Tigor: TATA मोटर्स आपल्या build क्वालिटी मुळे आणि safety रेटिंग मुळे ग्राहकांच्या पसंतीत उतरते. टाटा Tigor मध्ये आता पर्यंत फक्त 2 airbags पाहायला मिळत आहेत. परंतु Tata मोटर्स च्या इतर कार्स मध्ये जसे की Tata Punch, Tata Altroz ह्या कार्स मध्ये आपल्याला 6 AIRBAGS पाहायला मिळतं आहेत.

Video Credit: @CarKaPunchnaama

Global NCAP Safety Ratings Hyundai Aura ही कार 2 Star घेऊन सगळ्यात खालच्या क्रमांकावर आहे

नुकत्याच झालेल्या Global NCAP Safety test मध्ये न्यू जनरेशन मारूती सुझुकी Dzire ने Hyundai Aura आणि Tata Tigor ह्यांना मागे टाकले आहे. ड्रायव्हर safety सह Child safety मध्ये सुद्धा मारूती सुझुकी Dzire ही कार अग्रेसर ठरली आहे. किती आहेत global NCAP Safety Ratings जाणून घेऊया.

Maruti Suzuki Dzire: 5 Star Ratings 
Tata Tigor: 4 Star Ratings 
Hyundai Aura: 2 Star Ratings 

घेऊन सध्या पाहिल्या क्रमांकावर आहे. त्याच बरोबर आपला भारतीय ब्रॅण्ड टाटा मोटर्स ची Tata Tigor ही दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे आणि Hyundai Aura ही कार 2 Star घेऊन सगळ्यात खालच्या क्रमांकावर आहे. मारूती सुझुकी ने गेल्या 10 वर्षांचा स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. Global NCAP Safety test मध्ये मारूती सुझुकी च्या कुठल्याही कार ला आता पर्यंत 5 स्टार रेटिंग मिळालेली नव्हती परंतु नवीन मारुती सुझुकी Dzire कार ने ह्या टेस्ट मध्ये 5 स्टार घेऊन लोकांची मन जिंकली आहेत.

किती फरक आहे किंमतीत New Dzire, Tata Tigor आणि Hyundai Aura मध्ये..??

Petrol आणि CNG varient च्या किंमती खालील प्रमाणे.

New Dzire starting price : ex showroom Base मॉडेल ची किंमत 6.79 लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल 10.14 लाखांपासून सुरू होतो.

Hyundai Aura Starting Price: ex showroom Base मॉडेल ची किंमत 6.49 लखांपासुन सुरू होते त्याच बरोबर Hyundai Aura Top model ची किंमत 9.05 लखांपासुन सुरू होते.

Tata Tigor Starting Price: ex showroom Tata Tigor Base मॉडेल ची किंमत 6.00 लखांपासुन सुरू होते त्याच बरोबर Tata Tigor Top model ची किंमत 9.40 लखांपासुन सुरू होते.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

New Honda Amaze | मारुती सुझुकी Dzire ला टक्कर द्यायला येत आहे Honda Amaze..! upcoming 2025

New Honda Amaze | मारुती सुझुकी Dzire ला टक्कर द्यायला येत आहे Honda Amaze..! upcoming 2025

 

 

Leave a comment