“प्रविण मसाले” यशोगाथा… | Pravin Masale | No. 1 मसाले

“प्रविण मसाले” ची यशोगाथा…

Pravin Masale: आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे, हुकमीचंद चोरडिया! अत्यंत फाटकं असणारं आयुष्य, प्रचंड गरिबी, धंद्यात येणारं अपयश या सर्वांवर मात करत त्यांनी हा ब्रॅण्ड उभारला ही त्याचीच गोष्ट…

गोष्ट आहे १९५० च्या दशकातली. पुण्यात एक मारवाडी कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा मिरचीच्या बियांचा धंदा. घरात खाणारी तोंड भरपूर मात्र त्यातलं मोठं पोरगं मात्र भरपूर चळवळया. ‘हुकूमीचंद चोरडिया’ असं या पोराचं नाव. त्याला खूप मोठं व्हायचं होतं. खूप पैसा कमवायचा होता.

धडपड्या असल्याने त्याने अनेक धंदे सुरू करून बघितले. लाकडाची वखार काढली, हॉटेल तसंच किराणा मालाचं दुकान टाकून बघितलं. पण यांपैकी काहीच चाललं नाही. ढिगभर कर्ज झालं. देणेकऱ्यांचा ससेमिरा पाठीमागे लागला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली होती, मात्र तरीही हा पोरगा काही हार मानणाऱ्यांपैकी नव्हता.

मग मसाला बनणार तरी कसा…?

हुकूमीचंद मिरचीच्या बिया गोळा करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरायचे. प्रत्येक ठिकाणी त्यांची व्यावसायिक नजर नव्या धंद्याचा शोध घ्यायची. महाराष्ट्रभरच्या या भटकंतीत एक गोष्ट त्यांना सगळीकडेच कॉमन दिसली.

ती गोष्ट म्हणजे ‘गावातल्या बाजारात मसाला विकणाऱ्याकडे होणारी गर्दी’. चोरडीयांच्या नजरेने ही गोष्ट हेरली आणि त्यातूनच त्यांना एक आयडिया सुचली. त्यांनी काय केलं तर ‘कांदा लसूण’ मसाल्याचं सॅम्पल घेतलं आणि ते आपल्या बायकोला दाखवलं. त्यांच्या पत्नी कमलाबाई. त्या पडल्या कट्टर जैन धार्मिक. कांदा आणि लसूण या दोन्हीही गोष्टी घरात वर्ज्य होत्या. मग मसाला बनणार तरी कसा…?

हुकूमीचंद होते हट्टी. त्यांनी कर्मालाच ‘धर्म’ मानलं आणि बायकोची समजूत काढायला सुरुवात केली. शेवटी कमलाबाई तयार झाल्या. मात्र मसाला बनवणं काही सोपं काम नव्हतं. पण हुकूमचंद जिद्दीला पेटले होते. त्यांनी बायकोला साथीला घेतलं आणि पाहता-पाहता मसालाच बनवून टाकला.

नवरा बायकोने मोठ्या कष्टाने बनवलेला मसाला विक्रीसाठी म्हणून एका दुकानदाराकडे ठेवण्यात आला. विशेष म्हणजे ग्राहकांना देखील तो आवडला. सुरुवातीचे काही दिवस स्वतः हुकुमीचंदांनी देखील आपल्या सायकलवरून घरोघरी जाऊन मसाल्याची विक्री केली.

प्रवीण मसाले यांचे founder हुकमिचंद चोरडिया |

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हातपाय मारायचे आणि पुरून उरयचं असा धडा हुकमिचंद चोरडिया यांनी शिकवला. सायकल पासून ते तीनशे कोटींची उलाढाल कसा आहे आहे हुकमिचंद चोरडिया यांचा प्रवास जाणून घेऊया.

साधारण 1962 साली चोरडिया कुटुंब हे पुण्यात राहत होते. त्यांच्या घरात मिरची बियांचा व्यवसाय ते घरातूनच करतं होते. घरातील कुटुंबात माणसं भरपूर असल्यामुळे घरची परस्थिती एवढी चांगली नव्हती. त्यातच चोरडिया यांच्या एका मुलाने ठरवल मिरचीचा व्यवसाय तर वडिल करत च आहेत राज्य भर फिरतं असतात तर आपण सोबत मसाल्यांचा व्यवसाय सुरू करावा.

सुरुवातीला त्यांनी भरपूर विचार केला. वेगवेगळे मसाले घरी बनवुन बघितले आणि त्याच बरोबर जवळच्या लोकांना वापरायला सुध्दा दिले. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून चोरडिया यांच्या लक्षात आले की हा व्यवसाय आपल्याला खूप पुढे नेऊ शकतो. मसाले बनवायच्या कामात त्यांना त्यांच्या पत्नी कमलाबाई ह्या मदत करायच्या आणि पती हुकमीचंद घरोघरी जाऊन मसाले विकायचे. आणि शिल्लक असलेला माल दुकानात ठेवायचे.

Video Credit: @5km-city

अशीच एकदा त्यांना कल्पना आली कांदा लसूण मसाल्याची. परंतू ह्यात एक अडचण होती. हुकमिचंद चोरडिया मुळात जैन असल्यामुळे घरात कांदा लसूण नसायचा. परंतु अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी हुकमीचंद यांना त्यांच्या कामात मदत केली. नवरा एवढी मेहनत करतोय म्हणून कमलाबाई यांनी शेवटी हुकमीचंद यांना मदत केली.

नुसता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात वापरला जाणारा चवीला उत्कृष्ट असा लागणारा कांदा लसूण मसाला प्रविण मसाला यांनी बनवला.

प्रवीण मसाले (Pravin Masale) हे भारतात तसेच परदेशात आपल्या मसाला विक्री साठी नावा रूपाला आले. कष्ट आणि सातत्य यांच्या जोरावर 25 देशात पसरलेला हा ब्रँड कसा उभारला याची कहाणी कदाचित एखाद्या सिनेमा सारखी वाटेल परंतु हुकमिचंद यांची ही कहाणी मात्र खरी आहे.

सन 1971 मध्ये पुण्यातील हडपसर येथे त्यांनी जागा घेऊन एक नवीन कारखाना सुरू केला. महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रवीण मसाल्याला (Pravin Masale) मागणी वाढल्याने पुढे जाऊन त्यांचे चार कारखाने झाले. प्रवीण मसाल्यांच्या उत्पादन वाढ झाली. प्रवीण मसाल्याचे (Pravin Masale) नाव आता सुहाना मसाला म्हणून सुद्धा ओळखले जाते.

सुहाना मसाला हे प्रविण मसाल्याचं Brand Name आहे. आज लगभग 300 कोटीच्या वर प्रवीण मसाले (Pravin Masale) यांचा उद्योग पोहोचला आहे. जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर माणूस खूप काही करू शकतो हे हुकमी चंद चोरडिया यांनी दिलेली शिकवण आहे.

“मसाला” मराठी सिनेमा हुकमीचंद यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट.

Pravin Masale Suhana Masala Hukmichand Chordiya

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आजच्या काळात जो तो उद्योग धंदा व्यवसाय याच्या गप्पा करत असतो. परंतु पूर्वीच्या काळात सुद्धा लोक शून्यातून विश्व निर्माण करायचे. तशीच काही स्टोरी होती हुकमीचंद यांची. मसाला हा सिनेमा 2012 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांनी काम केली होती जसे की डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष आणि बरीच दिग्गज मंडळी या सिनेमात पाहायला मिळाली होती.

हुकमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी 1962 मध्ये प्रवीण मसालेवाले (Pravin Masale) या मसाले ब्रँडची स्थापना केली होती. त्यांनी त्यांच्या घरापासून अल्प प्रमाण दिवस सुरू केला होता हा ब्रँड सुरुवातीला चोरडिया फूड प्रोडक्ट लिमिटेड म्हणून ओळखला जायचा.

चोरडिया ह्यांचे 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांची मुले राजकुमार चोरडिया आणि प्रदिप चोरडिया यांनी हडपसर येथे औद्योगिक वसाहतीत जमीन घेऊ उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन कंपनी उभारली. आज प्रवीण मसाले (Pravin Masale) यांचे उत्पन्न विदेशी चलनात $125 दशलक्षा पेक्षा जास्त आहे. त्यांची उत्पादने सुहाना मसाला, प्रवीण मसाला, तुफान आणि अंबारी ह्या ब्रँड अंतर्गत भारतात आणि इतर 60 अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Big Boss Marathi Season 5 | रितेश भाऊ तिला म्हणाले बिग बॉसच्या घरातील सगळ्यात Worst सद्स्य !

Big Boss Marathi Season 5 | रितेश भाऊ तिला म्हणाले बिग बॉसच्या घरातील सगळ्यात Worst सद्स्य !

Leave a comment