Big Boss Marathi| निक्की – अरबाज पुन्हा एकत्र… काय आहे निक्कीचा प्लॅन? S05| Scariest Week Ever!

जाणी-दुश्मन सदस्यांना बिग बॉस ने जोड्यांमध्ये बांधले !

Big Boss Marathi: ह्या आठवड्याच्या सुरवाती पासून बिग बॉस (Big Boss Marathi) यांनी सर्व सदस्यांना त्यांनी जोड्यान मध्ये बांधले आहे. जोड्या खालील प्रमाणे आहेत. सुरवातीला जे लोक एकमेकांच्या विरोधात होती त्यांनाच बिग बॉस ने जोड्यांमध्ये बांधले आहे.

1. निक्की – अभिजीत
2. अरबाज – आर्या
3. वैभव – धनंजय
4. वर्षा – अंकिता
5. सुरज – जान्हवी
6. पॅडी – घनश्याम

बिग बॉस च्या ह्या आठवडयात कोणीही बाहेर जाणार नसून ह्या आठवडयात वोटिंग लाईन बंद असणार आहेत. पुढील आठवडयात कोण बिग बॉस (Big Boss Marathi) च्या घरातून बाहेर जाईल ह्या कडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

बिग बॉस मराठी च्या घरात मानकाप्याने केले 4 सदस्यांना nominate !

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) च्या घरात सध्या नवीन टास्क साठी एक नवीन रूम बनवण्यात आली आहे. ज्यात सर कटा उर्फ मानकाप्या याची थीम बनवण्यात आली आहे. ह्या आठवड्यात nominate झालेल्या सदस्यांना मध्ये अंकिता वालावलकर, उर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत ह्यांची नावं आहेत. नॉमिनेशन जाहीर होण्यापूर्वी बिग बॉस (Big Boss Marathi) ने मानकाप्याच्या पाताळ लोकात ए उभक नवीन टास्क दिला होता. ज्यामध्ये मानकाप्याचे धड आणि मुंडकं दोन वेग वेगळ्या दिशेला उभे होते.

Bigg Boss Marathi Season 5 Maankapya

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मानकाप्याच्या मुंडक्या जवळ घरातील सर्व सदस्यांचे चित्र लावण्यात आले होते आणि दुसऱ्या बाजूला मानकाप्याच्या धडा जवळ चार रिकामे slots ठेवण्यात आले होते. ज्यात घरातील एका सदस्याला बोलावून दोन जोडींना nominate करायचे होते.

निक्की – अरबाज पुन्हा एकत्र येतील काय आहे निक्कीचा प्लॅन ?

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) च्या घरात कल्ला सुरू असतो. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस (Big Boss Marathi) ने दोन विरुद्ध टोकाच्या लोकांना जोडीमध्ये बांधले आहे. नेहमीच चर्चेत असलेली जोडी अरबाज आणि निक्की हे एकमेकांपासून दूर झाले आहेत. सुरुवातीला तीन ए आणि टीमली असे दोन ग्रुप झाले होते ज्यात लेखी आणि अरबाज हे टीम बी ला खूपच जोरदार टक्कर देत होते. परंतु बिग बॉस ने जोड्यांमध्ये बांधल्या पासून नक्की आणि अरबाज मध्ये दुरावा निर्माण झाला आहे. घरातील सदस्यांना ह्या संधीचा चांगलाच फायदा मिळतो आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या भागात आपण पाहिले की नक्की आणि अरबाज हे एकत्र येताना दिसत आहेत. एकमेकांमध्ये झालेले मतभेद विसरून आणि एकमेकांची माफी मागून ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे.

Video Credit: @ActRidersMandar

अरबाज सोबत बांधल्या गेलेल्या आर्याने अरबाजला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु जोरू का गुलाम पुन्हा तिच्याकडे जाईल असे वाटते आहे. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर काय होणार याची देखील लोकांना उत्सुकता आहे. कारण मागील आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी जान्हवीला चांगली शिक्षा सुनावली आणि निक्कील देखील चांगलाच धडा शिकवला होता.

Big Boss च्या घरातील जेवणाची सामग्री मिळवण्यासाठी मोजावी लागणार किंमत !

बिग बॉस (Big Boss Marathi) मराठीच्या घरातील कल्ला प्रेक्षक आवर्जून बघत आहेत. बिग बॉस चा हा सीझन चांगलाच गाजतो आहे. कारण ह्या वेळी सोशल मीडियावरिल content creator आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार बिग बॉस च्या घरात सामील झाले आहेत.

आठवाभर घरातील लोकांनी खाऊन पिऊन चांगलाच कल्ला घातला आहे. आता गुरुवारी झालेल्या टास्क मध्ये सदस्यांना बी बी करंसी कमवून खाण्या-पिण्याची सामग्री खरेदी करता येणार होती. मानकाप्या च्या तळघरात सोन्याची नाणी होती जी टीम ए आणि टीम बी ला मिळवायची होती. ह्या टास्क मध्ये शेवटी घनश्याम आणि पॅडी सोबत अंकिता आणि वर्षा यांची जोडी परफॉर्म करतं असताना. घनश्याम आणि अंकिता मध्ये चांगलीच हाता पाई झाली. ह्या टास्क मध्ये टीम बी ने उत्तम कामगीरी करून १ लाख ४४ हजार बीबी करन्सी जिंकली तर टीम बी ने ८८ हजार बीबी करन्सी जिंकत टास्क संपवायला.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Ch. Shivaji Maharaj Statue Collapses: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ढासळला आणि… ! Shocking News 26 Aug 24

Ch. Shivaji Maharaj Statue Collapses: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ढासळला आणि… ! Shocking News 26 Aug 24

Leave a comment