Ch. Shivaji Maharaj Statue Collapses: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ढासळला आणि… ! Shocking News 26 Aug 24

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ढासळला आणि… !

Ch. Shivaji Maharaj Statue Collapses: नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रायगड येथे उभारलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा वादळामुळे कोसळला. ह्यावरून मराठी माणूस आणि महाराष्ट्राची जनता खूपच नाराज झाली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रति निष्काळजीपणा दाखवल्यामुळे ही स्थिती घडली आहे. सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची (Ch. Shivaji Maharaj Statue Collapses) पाहणी करताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि भाजपाचे आमदार नारायण राणे हे आमने-सामने आले.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग राजकोट येथील परिस्थितीची पाहणी केली.

बुधवारी 28 तारखेला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग राजकोट येथील परिस्थितीची पाहणी केली. याच दरम्यान नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले त्याचबरोबर दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. याच दरम्यान नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी ठाकरेंना धमकावत पोलीस अधीक्षक समोर धमकी दिली त्यांना घरात जाऊन मारेल.

Video Credit: @MumbaiTak

ह्या अशा वागण्याने महाराष्ट्रातील जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे. एकीकडे महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल जनता राग व्यक्त करत आहे. सध्याचे राज्यातील सरकार आणि केंद्र सरकार ह्या कामाला जबाबदार आहे. नौदलाच्या आणि बांधकाम विभागाच्या कामगारांनी आणि अभियांत्रिकांनी केलेल्या कामाची दखल दिली जाणार आहे. सध्या राज्य सरकार यांनी हात वर करून हा मुद्दा नौदलाकडे ढकलला आहे. राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे की या सर्व प्रसंगाची जबाबदारी पूर्णपणे नौदलाची आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचा बांधकाम प्रमुख याला देखील या सगळ्या प्रकारात दोषी मानली जात आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapses

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर ट्विट करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा (Ch. Shivaji Maharaj Statue) सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे “शक्तीस्थळ” असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे.

सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा !

सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Ch. Shivaji Maharaj Statue) पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे.

किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत!

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने (Ch. Shivaji Maharaj Statue Collapses) शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. अशातच अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिलीय, ” प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील… गेली सात दशकं तब्बल एकशेवीसच्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे ! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं भारताचे अत्यंत बुद्धीमान, संवेदनशील, मानवतावादी, देखणे, रुबाबदार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी !”

किरण माने पुढे लिहितात, “झालं असं की, फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही ! त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली. यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: या उद्घाटनाला आले.”

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Raj Thackeray | राज ठाकरे यांनी 28 ऑगस्ट रोजी बदलापूरला भेट देऊन…. Raj Thackeray Extremely Angry on ?

Raj Thackeray | राज ठाकरे यांनी 28 ऑगस्ट रोजी बदलापूरला भेट देऊन…. Raj Thackeray Extremely Angry on ?

Leave a comment