Big Boss Marathi Season 5 | रितेश भाऊ तिला म्हणाले बिग बॉसच्या घरातील सगळ्यात Worst सद्स्य !

Big Boss Marathi Season 5 | जान्हवी किल्लेकरच्या विधानावरून अख्खा महाराष्ट्र तापला !

Big Boss Marathi Season 5 | गेल्याच आठवड्यात जान्हवी किल्लेकर ने पॅडी कांबळे यांचा खूप जास्त अपमान केला होता. ती नेहमीच भान विसरून लहान मोठे जेष्ठ कसलाच विचार न करता सरळ अपमान करत सुटते. तिने पॅडी भाऊंच्या अभिनय क्षेत्रात केलेल्या कामावर बोट ठेवला. आज पर्यंत तुम्ही फक्त वर एक्टिंग करत आला आहात आणि इथे बिग बॉसच्या घरात देखील फक्त ओवर अक्टींग करत आहात. या तिच्या विधानावरून अख्खा महाराष्ट्र तापला होता. ह्याच कारणासाठी रितेश भाऊंनी जान्हवी ची चांगलीच शाळा घेतली. तिचा चेहरा किती खोटं बोलतो आणि ती प्रत्येक वेळी राळा झाल्यानंतर पुन्हा येऊन रडून माफी मागते याला देखील लोक एक ढोंगी नाटक म्हणतात जे खर आहे.

Big Boss Marathi च्या घरात रितेश भाऊंनी आणली जेल !

Big Boss Marathi Season 5 | भाऊच्या धक्क्यावर ह्यावेळी जरा वेगळे बघायला मिळाले. निक्की आणि तिचा ग्रुप हे नेहमीच तोंड सोडून बोलत असतात आणि वाद घालत असतात. त्यांच्या या कारणाला बघून भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी एक नवीन अनाउन्समेंट केली. या घरातील पहिली सदस्य जानवी किल्लेदार हिला भाऊच्या धक्क्यावरून हाकलण्यात आलं. या आठवड्यात ती जेलमध्येच राहणार आहे. तिचा माज उतरवण्यासाठी रितेश भाऊंना हे पाऊल उचलावे लागले.

Video credit: @AtoZMarathi

रितेश भाऊ अरबाजला म्हणाले मला हलक्यात घेऊ नका !

गेल्या आठवड्यात रितेश भाऊंना त्यांच्या कामावरून नेटकरांनी चांगलाच ट्रोल केले होते. रितेश भाऊंच्या जागी जर मांजरेकर राहिले असते तर त्यांनी नक्की आणि तिच्या ग्रुपला चांगलाच धडा शिकवला असता अशी प्रेक्षकांची मागणी होती. जी ह्या आठवड्यात रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाईल मध्ये करून दाखवली. रितेश भाऊंनी गेले दोन आठवडे खूप समजवायचा प्रयत्न केला समजदारीने सांगायचा प्रयत्न केला परंतु ग्रुप ए मधील सदस्य ऐकायला तयारच नव्हते शेवटी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी वातावरण गरम केलं आणि दाखवून दिलं कसे भाऊंना हलक्यात घेणे सदस्यांना नडू शकते.

जान्हवी चे अश्रू खरे की खोटे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Big Boss Marathi Season 5 | भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी जेव्हा जान्हवीला जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिला त्यावेळी निक्कीला देखील त्यांनी सूचना दिली की पुढचा नंबर तुमचा सुद्धा असू शकतो. जान्हवी तुम्ही किती खोट्या आहात हे आम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही रडून दाखवता तुम्हाला चक्कर येतात तुम्हाला सहानुभूती हवी असते परंतु जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला कितीतरी बरं वाईट बोलत असतात त्यांच्यावर हात वारे करत असतात त्यांच्यावर धावून येत असतात तेव्हा तुमची बुद्धी तुमची अक्कल कुठे गहाण ठेवलेली असते असे देखील रितेश भाऊ म्हणाले.

निक्की स्वतः जान्हवी ला जेलमध्ये टाकावे हा देश रितेश भाऊंनी दिला. आता तरी ही लोकं सुधरतील अशी अपेक्षा आहे. स्वतःला जास्त स्मार्ट समजणारी निक्की आता गब गुमान रितेश भाऊंचा सल्ला ऐकत होती. तिला मिळालेली कॅप्टन सी ही देखील भिक आहे असे सुद्धा रितेश भाऊ म्हणाले जे महाराष्ट्राच्या जनतेला आणि मराठी माणसाला खूपच आवडले रितेश भाऊंची खूपच तारीफ होत आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Chhava: छावा मूव्ही टीजर रिव्ह्यू! पुन्हा इतिहासाबरोबर छेडखानी नको! Releasing 6 Dec 2024| Super Exciting

Chhava: छावा मूव्ही टीजर रिव्ह्यू! पुन्हा इतिहासाबरोबर छेडखानी नको! Releasing 6 Dec 2024| Super Exciting

Leave a comment