BMW बद्दल 10 असे Facts जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल! Best Luxurious Car!

BMW ची स्थापना केव्हा झाली? आणि इतिहास काय आहे?

BMW, Bayerische Motoren Werke AG ची स्थापना 1916 मध्ये म्युनिक, जर्मनी येथे झाली. सुरुवातीच्या काळात या कंपनीने विमानाच्या इंजिनचे उत्पादनाचे काम केले होते. 1920 च्या दशकात या कंपनीने मोटरसायकल उत्पादन आणि अखेरीस 1930 च्या दशकात ऑटोमोबाईल्स मध्ये संक्रमण केले.

काय आहे BMW च्या आयकॉनिक लोगो मागचं रहस्य?

BMW चा लोगो ज्याला बऱ्याचदा “राऊंडेल” म्हणून संबोधले जाते त्यात निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या चार चतुर्थांशांना छेदणारी काळी रिंग आहेत. बीएमडब्ल्यू ही कंपनी सुरुवातीला विमानाच्या इंजिनचे उत्पादन करायची. त्याचेच प्रतीक म्हणून हा लोगो डिझाईन करण्यात आला होता. निळा आणि पांढरा हे निळ्या निळ्या आकाशाविरुद्ध फिरणाऱ्या प्रोफेलरचे प्रतीक आहेत.

BMW ने कसं साध्य केलं तंत्रज्ञानातील नाविन्य?

Video Credit: @wisddom

BMW प्रसिद्ध आहे त्यांच्या ऑटोमेटिव्ह तंत्रज्ञानातील नवकल्पनांसाठी. त्यांनी 2013 मध्ये पहिली इलेक्ट्रिक कार, BMW i3 सादर केली आणि ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम्स (ADAS) तसेच हायब्रीड पावरट्रेन्स ची निर्मिती करण्यासाठी आघाडीवर आहे.

ब्रँड पोर्टफोलिओ:

त्याच्या प्रख्यात बीएमडब्ल्यू ब्रँड व्यतिरिक्त, कंपनीकडे MINI आणि Rolls-Royce यांचे सुद्धा मालकी अधिकार आहेत. हे ब्रँड ऑटोमॅटिक अभिरुची आणि लक्झरी विभागांच्या विविध श्रेणींना पूरक आहेत. वाहने अनेकदा सांस्कृतिक चिन्ह बनतात.

कामगिरी आणि मोटर्स स्पोर्ट हेरिटेज:

BMW ला मोटर्स स्पोर्ट्स मध्ये वारसा आहे, विशेषतः टुरिंग कार आणि फॉर्म्युला 1 रेसिंग मध्ये. ब्रँडचा M विभाग त्यांच्या नियमित मॉडल्सचे उच्च कार्यक्षमता प्रकार तयार करतो. जे त्यांच्या अचूक अभियांत्रिकी आणि उत्साहवर्धक ड्रायव्हिंग डायनामिक्स साठी ओळखले जाते.

लक्झरी आणि डिझाईन:

बीएमडब्ल्यू हे लक्झरी आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्ससाठी प्रसिद्ध आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण सुरेखता मिसळणार्या वाहनांची निर्मिती करतात.

BMW ची मॅन्युफॅक्चरिंग कोण कोणत्या देशात होते?

BMW XM launched in India

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीएमडब्ल्यू जर्मनी, युनायटेड स्टेट्स, आणि इतर देशांसह जगभरात असंख्य उत्पादन सुविधा चालवतात, त्याचबरोबर जागतिक पोत आणि स्थानिक उत्पादन सुनिश्चित करतात. बीएमडब्ल्यू मॉडेल्सचे मॅनुफॅक्चरींग मुख्यतः जर्मनी मध्ये होते. जर्मनी मध्ये एकूण 8 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. त्यातील सर्वात मोठा प्लांट डिंगॉल्फिंग ला आहे. इतर प्लांट्स बर्लिन, लँडशट, लीपझिग, म्युनिक, रेजेन्सबर्ग आणि वाकर्सडॉर्फ येथे स्थित आहे. तसेच युनायटेड स्टेट्स मध्ये बीएमडब्ल्यू चा जगातील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्पॅटंनबर्ग, साउथ कॅरोलीना येथे स्थित आहे. त्याचबरोबर साउथ आफ्रिका मेक्सिको चायना भारत युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रिया येथे सुद्धा बीएमडब्ल्यूचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत.

जागतिक उपस्थिती:

बीएमडब्ल्यू ही जागतिक ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. बीएमडब्ल्यू च्या उत्पादन नेटवर्कमध्ये जगभरातील 30 पेक्षा जास्त उत्पादन सुविधांचा समावेश असून ते 140 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रतिनिधीनसह जागतिक स्तरावर विक्री करतात.जागतिक स्तरावर बीएमडब्ल्यू ही कंपनी सातव्या क्रमांकावर राज्य करत आहे.

शासन पद्धती:

त्याने आपल्या वाहनांमध्ये पर्यावरण पूरक साहित्य वापरले आहेत. तसेच पर्यावरण पूरक उत्पादन प्रक्रियांचा समावेश केले आहे. BMW i4 आणि iX सारखा मॉडेल सह इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान प्रगत करण्यासाठी टिकाऊ पणासाठी वचनबद्ध केले आहे.

FAQs (Frequently Asked Questions):

BMW ही कंपनी मर्सिडीज पेक्षा श्रीमंत आहे का?

2018 मध्ये BMW ग्रुपचा एकूण रवीरेव्हेन्यू ₹ 97.5 Bn युरोस इतका होता. BMW ग्रुपमध्ये बीएमडब्ल्यू मिनी आणि रोल्स रॉयस या यांचा समावेश आहे. त्याच काळात मर्सिडीज बेंज कार गेमलर ट्रक्स डॅमलेर व्हॅन्स आणि डेबलर कोचेस यांचा एकूण रेवेन्यू दीडशे बिलियन होता.

भारतात BMW कार ची किंमत किती आहे?

भारतात BMW कार ची किंमत ₹ 43.90 लाख पासून सुरू होते. परंतु BMW ची भारतामधील सर्वात महाग कार ₹ 2.60 Cr मध्ये उपलब्ध आहे. BMW मधील सर्वात नवीन मॉडेल 5 सिरीज ₹ 72.90 लाख या किमतीत उपलब्ध आहे.

BMW चे उत्पादन भारतामध्ये होते का?

होय! BMW चे प्लांट चेन्नईमध्ये असून तिथे 12 कार मॉडेल्सची निर्मिती होते. BMW X5, BMW X7, BMW 6 Series Gran Turismo, BMW 2 Series Gran Coupe, BMW 3 Series, BMW 3 Series Gran Turismo, BMW 7 Series, BMW 8 Series, BMW X1,BMW X3,BMW X4,BMW X5,BMW X7 and Mini Countryman.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

http://Mahindra Thar Roxx: धमाकेदार एंट्री! आता फक्त 12.99 लाखात 5 दरवाजांची महिंद्रा थार ! Best Car

Mahindra Thar Roxx: धमाकेदार एंट्री! आता फक्त 12.99 लाखात 5 दरवाजांची महिंद्रा थार ! Best Car

 

Leave a comment