Olympic Games | 2016 च्या रिओ ऑलम्पिकला Maria Andrejczyk चं पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकलं!

Olympic Games: Rio & Tokyo

Olympic Games: मारिया आंद्रेत्जि़क (Maria Andrejczyk) २५ वर्षांची पोलॅन्डची खेळाडू आहे. भालाफेक (Javelin throw) मध्ये 2016 च्या रिओ ऑलम्पिकला (Rio Olympics) तिचं पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकलं. २०१८ उजाडला आणि कळलं की तिला हाडांचं कॅन्सर आहे. टोकियो ऑलम्पिक मध्ये (Olympic Games) सहभागी होण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलेलं.

सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झालेत आणि मारिया परत फील्डवर आली. २०२०च्या समर ऑलम्पिकला सिल्वर मेडल पटकावलं आणि टोकियोचे दारही उघडलेत. टोकियोत तिने स्वतःचा रेकॉर्ड आणि पोलॅन्डचा राष्ट्रीय रेकॉर्ड तर मोडलाच; पण त्याच सोबत विश्वविक्रमाच्या यादीत आजतागायतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी करत तिने सिल्वर मेडलही पटकावलं.

मारिया आंद्रेत्जि़क (Maria Andrejczyk) जेव्हां टोकियोत ही कामगिरी करत होती, तेव्हां मायदेशी पोलॅन्ड मध्ये एक लहान मुलाचे आईबाप हैराण होत होते. त्यांच्या ८ महिन्याच्या मिलोस्ज़ेक मलिसाला हृदयाच्या एक खूप दुर्मिळ विकार आहे. ह्या मुलाच्या आजारावर उपचार एकच – हृदयावर शल्यक्रिया. पण हे विकार असं आहे की इतक्या लहान पोरावर ह्या विकाराची शल्यक्रिया करायला अक्ख्या पोलॅन्ड मध्ये एकही शल्यचिकित्सक किंवा हॉस्पिटल तयार नव्हतं.

Olympic Games Maria Andrejczyk Javelin Throw Rio & tokyo Olympics

Telegram Group Join Now

अनेक ठिकाणी नकार पचवल्यावर अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरला ह्या शल्यक्रियेची व्यवस्था असल्याचं कळलं. मात्र तिकडे संपर्क केल्यावर त्यात ३,८५,००० डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास ३ कोटी रुपयांचा खर्च ऐकून मिलोस्ज़ेकच्या आई बाबांच्या तोंडाचं पाणी पळालं.

“आमच्या मिलोस्ज़ेकला वाचवा!”, मारियाने ऐकली ही हाक!

मिलोस्ज़ेकच्या आई-वडिलांनी crowd funding साठी प्रयत्न केलेत पण त्यात निम्मे पैसेच एकत्र झालेत. crowd fundingच्या नियमांनुसार दिलेल्या कालावधीत पूर्ण रक्कम एकत्र होऊ शकली नाही, तर crowd funding फोरम दानदात्यांना त्यांचे पैसे परत करते. मिलोस्ज़ेकच्या आईवडिलांवरही ही वेळ येऊन ठेपली. कॅम्पेन संपायला अगदी मोजके दिवस उरले होते. त्यांनी आवश्यक अशी अर्धी रक्कम अजून एकत्र करण्यासाठी fund raiser च्या पोस्टवर हाक मारली – “आमच्या मिलोस्ज़ेकला वाचवा.” मारियाने ही हाक ऐकली.

मारियाकडे एवढे पैसे तर नव्हते, पण तिच्याकडे दोन दुर्लभ गोष्टी होत्या. एक – मदत करण्याची अदम्य इच्छाशक्ती, आणि दुसरं – तिचं दहा बारा दिवसांपूर्वी जिंकलेलं ऑलम्पिकचं सिल्वर मेडल. तिने तडक ते मेडल मिलोस्ज़ेकच्या उपचारासाठी लिलावात काढलं.

हे मेडल नाही, तिचं स्वप्न होतं. जे स्वप्न २०१६ला हुकलं होतं, २०१८ला पूर्णपणे भंगच झालेलं, आणि २०२१ मध्ये हे स्वप्न पाच वर्षांची मेहनत, साधना, तपश्चर्या, ध्यास लावून मेडलच्या रुपात तिने साकारलं होतं. अटीतटीच्या परिस्थितीत अनोळखी माणसांसाठी तेच तिने विकायला काढलं.

पोलॅन्डच्या एका सुपरमार्केट चेन झाबका पोल्स्काने हे मेडल विकत घेतलं सव्वा लाख डॉलर्स मध्ये म्हणजे साधारण ९३ लाख रुपयांत, हे पैसे थेट फंड रेजर संस्थेकडे जमाही केलेत. पण झाबका पोल्स्काचे मालक इकडेच थांबले नाहीत. त्यांने मारियाच्या मदतीच्या भावनेला तोडीसतोड काम केलं. त्यांनी मारियाचा सिल्वर मेडल तिला परत दिला, आणि सांगितलं – परत कधी, कुणाचं जीव वाचवावेसे वाटल्यास अश्या गोष्टी तुझ्याच हाताशी असाव्यात.

ही मुलगी माझी लेक, किंवा बहीण असती, तर….

टोकियो ऑलम्पिक मध्ये (Tokyo Olympic) ३५० इव्हेंट्स म्हणजे साधारण हजारभर पदक विजेता होते. आपल्या देशाला ७ पदक आलेत, म्हणून त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत जेव्हां ७० पदक येतील तेव्हां नावं लक्षात राहणे कठीण होईल. पण मारिया आंद्रेत्जि़कसारखे खेळाडू खेळावर, रिकॉर्डबुक्स मध्ये आपलं नाव लिहितातच, पण इतिहासावरही आपलं नाव कोरून ठेवतात. ते नाव विसरत नाहीत.

पूर्वीच्या काळात भाले हृदयात खुपसून प्राण घेतले जात असे. मारियाने भाला फेकून प्राण वाचवले, आणि मारियाच नाही तर झाबका पोल्स्कानेही हृदय जिंकले. ह्या घटना अश्या असतात, ज्या आपल्याला बदलायला भाग पाडतात, जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतात, ज्या खेळांवर प्रेम करायला भाग पाडतात.

ही मुलगी माझी लेक, किंवा लहान बहीण असती, तर खांद्यावर घेऊन नाचलो असतो. नाहीए, तरी हरकत नाही, माणूस म्हणून तिचा अभिमान आहेच… तिची माहिती लक्षात ठेवा,
नाव – मारिया आंद्रेत्जि़क
देश – पोलॅन्ड
खेळ – जेवलीन थ्रो
पदक – सिल्वर

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/neeraj-chopra-silver-medal-india-paris-olympics/

Neeraj Chopra: ह्या वेळी निशाणा Silver वर लागला! First Silver Medal in Paris Olympics 2024

Leave a comment