Rinku Rajguru New Film | सैराट फेम सर्वांची लाडकी आर्ची दिसणार नवीन सिनेमा मध्ये..! Best Actress Cinema in 2025

Rinku Rajguru | रिंकू राजगुरू दिसणार नव्या भूमिकेत !

Rinku Rajguru: सैराट सिनेमा सगळ्यांच्याच लक्षात असेल. आज सैराटला रिलीज होऊन जवळपास दहा वर्षे झाली आहेत परंतु या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीला लोकांनी चांगलेच प्रेम दिले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने स्वतःला अभिनेक्षेत्रात पूर्णतः झोकून दिले. आज रिंकू राजगुरु मराठीच नाही तर हिंदी आणि तमिल चित्रपट सृष्टीत सुद्धा काम करत आहे. सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट व्हायरल झाली ज्यात झी स्टुडिओ आणि कोकोनट फिल्म्स च्या प्रोडक्शन अंतर्गतच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना रिंकू राजगुरू हिने आपला फोटो पोस्ट केला आहे.

Rinku Rajguru

Telegram Group Join Now

“जिजाई” नावाचा नवीन चित्रपट रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिच्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी रिंकू राजगुरु विनय कागर या मराठी सिनेमा देखील काम केले होते. या सिनेमात अभिनेत्री म्हणून तिने आपले काम चोखपणे केले होते. त्याचबरोबर हिंदी वेब सिरीज आणि सिनेमांमध्ये देखील रिंकूची मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आहे. टू हंड्रेड होला हो या हिंदी चित्रपटामुळे रिंकू राजगुरु ला हिंदी चित्रपट सृष्टीत एक वेगळच स्थान मिळालं होतं.

त्याचबरोबर 100 नावाची एक वेब सिरीज सुद्धा रिंकू राजगुरु नये मुख्य भूमिकेत केली होती. रिंकू राजगुरु हिच्यावर मराठी सिनेमाचे महान दिग्दर्शक नागराज जी मंजुळे यांचा नेहमीच मार्गदर्शन असते. रिंकू राजगुरू नुकतच प्रदर्शित झालेल्या आणि सुपरहिट झालेल्या मराठी सिनेमा देखील झळकली होती. झिम्मा २ या सिनेमात रिंकू नये अतिशय कमालीची भूमिका साकारली होती.

Video Credit: @marathinewschannel

सैराट नंतर रिंकूच आयुष्य बदलले..!

Rinku Rajguru नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि लिखित सैराट हा सिनेमा मराठी नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपले नाव कोरून गेला आहे. त्याचबरोबर सैराट हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला होता या सिनेमात अभिनय करणारे मुख्य कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात या सिनेमापासून केली होती. त्यांना लाभलेले गुरु म्हणजे नागराज जी मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनय प्रशिक्षण घेतले आणि आज सैराट सिनेमातील सर्वच कलाकार चांगल्या स्तरावर काम करत आहेत.

सुरुवातीला रिंकू ला पाहून कोणालाही वाटले नव्हते की ही मुलगी पुढे जाऊन हिंदी चित्रपट सृष्टीत काम करेल परंतु तिच्या बोलक्या चेहऱ्यात मुळे आणि डोळ्यांमुळे ती प्रत्येक पात्र अतिशय उत्स्फूर्तपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडते यामुळे तिला हिंदी चित्रपट सृष्टीत आणि वेब सिरीज मध्ये चांगले काम मिळत आहे आज रिंकू राजगुरू ही शिक्षण सुद्धा करत आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Read More: Homemade Ginger Candy: हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय!

Homemade Ginger Candy: हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय! #1 Best Remedy For Cough & Cold in Winter

Leave a comment