Homemade Ginger Candy: हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय! #1 Best Remedy For Cough & Cold in Winter

Homemade Ginger Candy: हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय!

Homemade Ginger Candy: हिवाळा म्हटलं की त्याबरोबर सर्दी खोकला यासारखे आजार सुरू होतात. अशावेळी घशाला आराम मिळण्यासाठी आपण कित्येक उपाय करतो. वास घेणे, मेडिकलमधील खोकल्यावरील गोळ्या सगळे, कफ सिरप आणि बरच काही. या सगळ्यांच्या ऐवजी एकच घरगुती उपाय म्हणजे अद्रक गोळी. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही गोळी लहान असो किंवा वयस्कर सगळ्यांनाच आवडेल आणि कशाची खवखव दूर पळवून घशाला नक्कीच आराम देईल. चला तर मग बघूया कशी बनवायची अद्रक गोळी.

अद्रक गोळी चे फायदे

लहान मुलांच्या बाबतीत किंवा आजारी पेशंटच्या बाबतीत सुद्धा बाहेरून आणलेल्या अद्रक गोळीवर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. अशावेळी घरी बनवलेली ही अद्रक गोळी नक्कीच फायदेशीर ठरते. आणलेल्या अद्रक गोळी मध्ये बऱ्याचदा साखर आणि भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्हस टाकलेले असते म्हणून ही अद्रक गोळी घरच्या घरी बनवा आणि स्टोअर करून ठेवा.

Homemade Ginger Candy Best in Winter for Cough and Cold

Telegram Group Join Now

Ingredients| साहित्य

Homemade Ginger Candy: अद्रक गोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची यादी खालील प्रमाणे आहे.

  • अद्रक 150 ग्रॅम
  • गूळ 400 ग्रॅम
  • काळ मीठ चवीनुसार
  • हळद ½ चमचा
  • मिरी पूड चवीनुसार
  • तूप ½ चमचा

पाककृती | Homemade Ginger Candy Recipe

  1. सर्वप्रथम आल्याला धुवून त्याचे साल काढून घ्या आणि आल्याचे बारीक काप करून घ्या.
  2. आता हे आल्याचे काप मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
  3. आता एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आल्याची पेस्ट टाकून मिनिटभर भाजून घ्या
  4. आता वरून 400 ग्रॅम गूळ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून शिजवून घ्या.
  5. गुळ संपूर्ण विरघळत नाही तोपर्यंत मिश्रण एकजीव करत रहा. मध्यम आचेवर आलं आणि गुळाची मिश्रण तव्याला लागणार नाही ही काळजी घेत हलवत रहा.
  6. आता जोवर हे संपूर्ण मिश्रण घट्ट होत नाही आणि त्यातील पाणी आटत नाही तोपर्यंत मिश्रण परतवत रहा. या मिश्रणाचा एक थेंब पाण्यात टाकून त्याचा मऊ गोळा तयार होतो की नाही हे तपासून पहा.
  7. पुढे या मिश्रणात चवीनुसार काळे मीठ एक चिमूट काळीमिरी पावडर आणि अर्धा चमचा तूप घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  8. सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यास लगेच ते बटर पेपरवर टाकून पसरवून घ्या.
  9. मिश्रण गार झाल्यावर थोडे पिठीसाखर त्याच्यावर भुरभुरून घ्या. जेणेकरून हे मिश्रण एकमेकांना चिकटणार नाही.
  10. आता याचे गोळे किंवा तुकडे करून एका बंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. या गोळ्या जवळपास तीन महिने टिकतात.

Ginger Candy Recipe Video

Video Credit: @hebbarskitchenhindi

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

The Sabarmati Report | अभिनय क्षेत्रातून निवृत्ती खोटी? हा फक्त PR Stunt अभिनेता म्हणाला.? 15 Nov 24 Publicity Stunt.?

The Sabarmati Report | अभिनय क्षेत्रातून निवृत्ती खोटी? हा फक्त PR Stunt अभिनेता म्हणाला.? 15 Nov 24 Publicity Stunt.?

Leave a comment