“तंटा नाय तर घंटा नाय!”
अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वात लाडका अभिनेता, रितेश विलासराव देशमुख, यंदाच्या Bigg Boss Marathi Season 5 ची होस्टिंगची जबाबदारी पार पाडणार आहे. यावर्षी महेश मांजरेकर होस्टिंग करत नसले याची खंत जरी मनात असली, तरी रितेश देशमुख हा शोक कसा होस्ट करतील हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. “तंटा नाय तर घंटा नाय!”, असं म्हणत रितेशने धमाकेदार सुरुवात केली Bigg Boss Marathi Season 5 ला. 28 जुलै 2024 रोजी बिग बॉस मराठी season 5 चे ग्रँड प्रीमियर कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित करण्यात आले. याचबरोबर एक अनोखी सुरुवात होत आहे एका नवीन सीझनला तेही नवीन होस्ट बरोबर.
कोण आहेत Bigg Boss Marathi Season 5 मधील 16 स्पर्धक जाणून घेऊया
वर्षा उसगावकर
सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री, ज्यांनी मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा धूम गाजवली अशा वर्षा उसगावकर यांनी एक सुखद धक्का देऊन Bigg Boss Marathi पदार्पण केले. वर्षा उसगावकर यांनी अप्सरा आली या गाण्यावर जोरदार एन्ट्री करून स्वतःची छाप पहिल्याच एपिसोड मध्ये दर्शकांवर ठेवली. काही दिवसापूर्वीच वर्षा उसगावकर, “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेला निरोप दिल्यानंतर हेडलाईन्स मध्ये चर्चेत होत्या.
अंकिता वालावलकर
यावेळी बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांसोबतच सोशल मीडियावर गाजणारे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. त्यापैकीच एक @kokanheartedgirl या नावाने फेमस असलेली आपली सर्वांची लाडकी अंकिता वालावलकर ही सुद्धा आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. पहिल्याच एपिसोड मध्ये तिने प्रेक्षकांचं मन जिंकल आहे.
पंढरीनाथ कांबळे
आपला सर्वांचा लाडका हा देखील बिग बॉस मराठीच्या सीजन 5 मध्ये आपल्याला दिसणार आहे. Grand Premiere मध्ये रितेश देशमुख आणि सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले त्याच्या उत्तम टाइमिंगने आणि बेस्ट कॉमेडी सेन्सने आपला सर्वांना खूपच एंटरटेनमेंट चा नवा चमचमीत तडका या सिझनमध्ये दिसणार आहे. वर्षानुवर्ष प्रेक्षकांना हसवत असलेल्या पॅडी कांबळेने विदूषक या भूमिकेचा स्किट सादर करत लोकांचे मनोरंजन केले. पॅडीला विदूषकाच्या भूमिकेत बघून प्रेक्षकांन, लक्ष्मीकांत बेर्डे यांची नक्कीच आठवण आली असणार.
Image credit: Colors Marathi
सुरज चव्हाण
इंस्टाग्राम स्टार म्हणून नावाजलेला आपला मराठी कलाकार या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहे. बुक्की टिंगूड गुलिगत धोका अशा आपल्या जबरदस्त आणि खतरनाक डायलॉग्ने सुरज चव्हाण हा फेमस झाला आहे त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात तू किती खतरनाक आणि गुलिगत परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचं मन जिंकेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
घन:श्याम दरोडे
घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी हे देखील Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात आपल्याला दिसणार आहे. छोट्या पुढारी यांनी Grand Premiere मध्ये धमाकेदार एन्ट्री घेऊन रितेश देशमुख आणि सर्व प्रेक्षकांना जोरदार हसवले. त्यांच्या राजकीय वक्तव्यासाठी ते नेहमीच चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरात शिरण्यापूर्वी त्यांनी सांगितले की बाहेर जरी मी राजकारण करत असतो, तरी सुद्धा आज देखील मी कोणाशी आघाडी करायची आणि कोणाशी युती करायची का बिनविरोध लढायचं, हे बिग बॉसच्या घरात खेळतानाच सांगेल. असा आव्हान करत त्यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.
निक्की तांबोळी
Bigg Boss Hindi मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून निक्की तांबोळी ला ओळखले जाते. निकीने हिंदी मध्ये बरेच reality shows केले आहेत. Bigg Boss हिंदी सोबतच रोहित शेट्टी यांच्या खतरो के खिलाडी मध्ये सुद्धा तिने काम केले आहे. त्याचबरोबर हिंदी आणि तेलगू चित्रपटातही काम करून तिने स्वतःचा असा fanbase तयार केला आहे.
इरिना रुदकोवा
मूळची रशिया ची असलेली इरिना रुदाकोवा, ही प्रोफेशनने मॉडेल आहे. तसेच सिनेसृष्टीमधील नवीन चेहरा म्हणून हिला ओळखले जाते. मूळची रशिया प्रांतातील असूनही तिला हिंदी तसेच मराठी भाषा बऱ्यापैकी समजते व ती बोलायचा ही प्रयत्न करते. Bigg Boss Marathi Season 5 चा Grand Premiere एपिसोड मध्ये आपण हिला चक्क रितेश विलासराव देशमुख यांचा बरोबर मराठीत संवाद साधताना बघू शकता.
जान्हवी किल्लेकर
मराठी टीव्ही सिरीयल्स च्या माध्यमातून घराघरात पोचणारी ही सगळ्यांची आवडती अभिनेत्री म्हणजेच जानवी किल्लेकर. भाग्य दिले तू मला या सिरीयल मुळे तिला बरेच प्रसिद्धी मिळाली. निगेटिव्ह रोल्स साठी तिला ओळखले जाते. आता बघूया ह्या Bigg Boss Marathi Season 5 च्या प्रवासात ती हीरोइन म्हणून समोर येते की विल्लन.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.