Paris Olympics 2024 | “आणि तो क्षण आला!” मनु भाकरने मिळवून दिलं भारताला पहिलं कांस्यपदक | First Bronze Medal

नेमबाज मनू भाकरने Paris Olympics स्पर्धेत कांस्यपदक पटकावला!

नेमबाज मनू भाकर हिने Paris Olympics स्पर्धेत कास्य पदक पटकावला आहे. भारताच्या मनु भाकरला 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात कांस्यपदक पटकावलं आहे. मनू हि Paris Olympics 2024 स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. 10 मीटर पिस्तूल रायफल च्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलेला आहे. भारतीय खूप खुश आहेत कारण हे भारताला ऑलम्पिक मध्ये मिळणारे पहिले पदक आहे. यापूर्वी 2020 मध्ये मनूला ऑलिंपिक मध्ये अपयश आले होते तेव्हा कुठलेही मेडल तिच्या हाती लागले नव्हते. मात्र यावेळी 2024 च्या ऑलम्पिक मध्ये म्हणून भारतीयांना निराश न करता पहिलं पहिलं आपलं पदक मिळवून दिला आहे त्या कांस्यपदकासाठी भारतीयांची तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

कोण आहे मनू भाकर?

हरियाणा येथील झाझर नावाच्या एका छोट्याशा गावात मनुचा जन्म झाला. त्या गावातही तिला बॉक्सिंग आणि रेसलिंग सारख्या खेळांसाठी लहानपणापासूनच ओळखले जायचे. शाळेत असतानाच एका विशिष्ट मार्शल आर्ट्स फॉर्ममध्ये तिने ट्रेनिंग घेतलेली आहे व त्यातही तिने नॅशनल लेवल चे मेडल्स पटकावले आहे. त्या मार्शल आर्ट फॉर्मला “thang ta” या नावाने ओळखले जाते.

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिनी शूटिंग शिकण्यास सुरुवात केली. आणि एकाच आठवड्यानंतर तिन्ही वडिलांकडे स्पोर्ट्स शूटिंग पिस्तूलचा हट्ट केला.
आणि तिचा हा हट्ट सुद्धा तिचे वडील, राम किशन भाकर यांनी संपूर्ण पाठिंबा देत पूर्ण केला. हाच तो हट्ट होता ज्यानी आज मनू भाकर ही त्यासाठी ऑलम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

मनू ही नुसती रायफल शूटिंग मध्ये नाही, तर इतर खेळांमध्ये सुद्धा माहीर आहे. तिला पूर्वीपासूनच चाइल्ड प्रोडिजी म्हणून उपमा मिळालेली आहे.
एअर पिस्तूल सकट टेनिस, बॉक्सिंग आणि स्केटिंग या खेळांमध्ये सुद्धा ती उत्कृष्ट आहे.

 

Khelo India मुळे मिळाले प्रोत्साहन!

Video credit: youtube.com/@NarendraModi

दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमातून मनू भाकरने तिचे असे मत व्यक्त केले, “मी इंडियाला दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत रिप्रेझेंट करणार आहे. 2018 मध्ये जे Khelo India चे फर्स्ट एडिशन होते , त्यात मी नॅशनल रेकॉर्ड सहित गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर मी India च्या रायफलिंगच्या टॉप core ग्रुप मध्ये आले. पासून मी निश्चय केला की मला इंडियाच्या जर्सी मध्ये स्वतःला बघायचे आहे.ती पुढे असेही म्हणाली की, Khelo India हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी बऱ्याच इंडियन खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन करत आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून माझे बरेच जूनियर आणि सीनियर खेळाडू मित्र जे आता ऑलम्पिक मध्ये सहभागी होत आहे आणि ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”

Tokyo ते Paris Olympics पर्यंतचा मनूचा प्रवास

तीन वर्षांपूर्वी Tokyo मध्ये झालेल्या ऑलंपिक मध्ये मनू भाकरने तिच्या रायफल पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती मेडल पासून हुकली होती. पण यावर्षी Paris Olympics 2024 मध्ये तिने आखिर बाजी मारली आहे. आपल्या भारताला पहिलं कांस्यपदक मिळवून दिलेला आहे. भारताला ऑलम्पिक मध्ये कांस्यपदक मिळवून देणारी ही पहिली वहिली भारतीय महिला ठरली आहे. कांस्यपदक जिंकल्यानंतर मनू भाकर च असं वक्तव्य आलं की, “मला खूप आनंद झाला आहे,  खूप मेहनत घेतल्यानंतर आणि भरपूर ऊर्जा लावून मी खेळत होते. कांस्यपदक जिंकले असले, तरी मी खूप खुश आहे की देशासाठी मी काहीतरी करू शकले.”

Top 13 Partner Workouts CrossFit for Power Couples

मनू भाकरने दिलं तब्बल १२ वर्षानंतर Paris Olympics नेमबाजीत पदक

Paris Olympics 2024 मध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारतासाठी राज्यवर्धन सिंग राठोड (2004), अभिनव बिंद्रा (2008),  विजयकुमार (2012) आणि गगन नारंग (2012) या चार पुरुषांनी नेमबाजी मध्ये ओलंपिक पदक जिंकले आहेत. तब्बल 12 वर्षानंतर भारताला नेमबाजी मध्ये मनू भाकर हिने कास्यपदक जिंकून दिले. यापूर्वी भारताला ऑलिम्पिक गेम्स मध्ये नेमबाजी या गेम मध्ये विजयकुमार अभिनव बिंद्रा गगन नारंग राजवर्धन सिंग राठोड या नेमबाजांनी पदक मिळवून दिली होती. मनू भाकर हिचे खूपच कौतुक आणि गौरव होत आहे कारण ऑलम्पिक गेम्स नेमबाजी मध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

मनूच्या आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर

 

paris olympics 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मनुचे वडील राम किसन भाकर यांनी पत्रकारांची संवाद साधताना सांगितले की जेव्हा मनुची मॅच असते त्यावेळी घरातले टीव्ही आणि सोशल मीडिया आम्ही बंद ठेवतो. आज मनू चा ऑलम्पिक मध्ये परफॉर्मन्स होता त्यासाठी मनुची आई सकाळपासून तिच्या विजयासाठी देवपूजा आणि पाठ करत होती. मनूच्या विजयानंतर आम्हाला आमच्या नातलगांनी, जवळच्या मित्रमंडळींनी कॉल करून कळविले की मनुने ऑलिंपिक गेम मध्ये कांस्यपदक जिंकले आहे. तेव्हा आम्हाला कळले. कारण आम्ही सकाळपासून टीव्ही बंद करून बसलो होतो. आम्ही प्रार्थना करत होतो की मनूला गोल्ड मेडल मिळावं पण काही हरकत नाही आम्हाला आमच्या मुलीवर सार्थ अभिमान आहे. कारण तिने भारताला आपल्या देशाला एक मेडल मिळवून दिला आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

https://taajyabatmya.com/