7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter

7 Indian Superfoods | सुपर फुड्स म्हणजे काय?

Indian Superfoods: असे खाद्यपदार्थ जे कमीत कमी कॅलरीजच्या बदल्यात तुम्हाला जास्तीत जास्त पौष्टिक मूल्य म्हणजेच न्यूट्रिशनल व्हॅल्यू देतात. असे भरपूर भारतीय सुपरफुट्स आहेत जे तुमच्या रोजच्या दैनंदिनीत आहारात समाविष्ट करू शकतात.

सुपर वर्ड्स हा शब्द ऐकून तुम्हाला भीती वाटत आहे का?

Indian Superfoods: डायट आणि पौष्टिक आहार या विषयावरून सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे सेलिब्रिटी लोकांनी तर सर्वसामान्यांना फार वेडच लावले आहे. सुपरफुड ऐकून तुमच्या डोळ्यासमोर एखादे महागडे खाद्यपदार्थ येते का? पण अजिबात काळजी करू नका आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलेलो असेच हे काही खाद्यपदार्थ आहेत जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात समाविष्ट केले तर नक्कीच तुमच्या प्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम होईल. तर आता जाणून घेऊया अशा भारतीय सुपरफुड्स (Indian Superfoods) बद्दल जे अगदी स्वस्थ आणि उत्तम आरोग्यदायी ठरतात.

आवळा

आवळा किंवा भारतीय गुजबेरी म्हणून ओळखला जाणारे या फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळते. त्यामुळे जर कुठल्याही प्रकारे तुम्ही आवळ्याचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आवळ्याचं लोणचं, आवळ्याचं मुरांबा, आवळा कॅन्डी आणि इतर बरेच असे पदार्थ असतील जे आपल्या आई किंवा आजी वर्षानुवर्ष बनवत आल्या आहेत. त्यांचे (Indian Superfoods) सेवन नक्कीच करा.

Indian Superfoods Ghee

Telegram Group Join Now

 

तूप

तुम्हाला आठवतं का लहानपणी आजी अगदी आग्रहाने “तूप खा रे” असे आपल्याला म्हणायची. परंतु काही अफवांमुळे तूप खाल्ल्याने जाड होते असा गैरसमज पसरू लागला. आणि बऱ्याच लोकांनी तू (Indian Superfoods) खाणे बंद केले. रोजच्या जीवनात जर गाईचे तूप सेवन केले तर पचनक्रिया सुधारते, हाड मजबूत होतात, हाडांचे झीज व्हायचं प्रमाण कमी होते, आणि पोटाची चरबी कमी व्हायला सुद्धा मदत होते.

नाचणी/नागली

नाचणी हा एक अद्भुत सुपरफुड आहे. नाचणीमध्ये विटामिन डी आणि लोहसत्व म्हणजेच आयर्न भरपूर प्रमाणात असल्याने नाचणी आरोग्यासाठी फारच महत्त्वाचा ठरते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा नाचणी अत्यंत फायदेशीर आहे.

केळी

बाजारात सहज उपलब्ध होणारी आणि सर्वात स्वस्त फळांपैकी एक म्हणजे केळी. परंतु बऱ्याचदा केळीकडे दुर्लक्ष करण्यात येते. चवीला खूप गोड असलेला हा पदार्थ आरोग्यासाठी चांगला नाही असा बऱ्याच लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. पण पोटॅशियमने समृद्ध असलेले केळी हृदयासाठी अतिशय महत्त्वाची आहे. केळीमध्ये उच्च प्रमाणात फायबर आहे आणि आपल्या आतड्यांसाठी फारच फायदेशीर ठरते. त्याचबरोबर केळी विटामिन बी सिक्स आणि विटामिन सी ने समृद्ध आहे आणि हेल्दी कार्बोहायड्रेट्स चे उत्तम साधन आहे.

मखाना

तुम्हाला सुद्धा जेवण झाल्याच्या काही वेळानंतर काहीतरी खावेसे वाटते का? पण अशी भीती वाटते की खाल्ले तर वजन वाढेल किंवा अति कॅलरीच्या सेवनामुळे फॅट् वाढेल? तर या प्रश्नावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे मखाना. चवीला चमचमीत आणि आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर. खरंच खाण्यासारखं पदार्थ मिळणं दुर्मिळच आहे. मखन हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आढळतात आणि त्याचबरोबर ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे.

Video Credit: @saurabhbothra

नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांना लावल्याने फायदा होतो हेच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण नारळाच्या तेलाचे सेवन केल्याने आरोग्यासाठी हृदयासाठी तसेच हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलाचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. Winter Care

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम विटामिन के आणि इतर मिनरल्स आढळतात. तसेच भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे शरीरातील वात कमी होतो आणि हाडांना जिजण्यापासून वाचवते. Best in Winter.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Malaika Arora | तूम्ही वाचला का..? मलायका अरोरा ने केला तिचा Secret Daily Plan Reveal..! 30 days Challenge

Malaika Arora | तूम्ही वाचला का..? मलायका अरोरा ने केला तिचा Secret Daily Plan Reveal..! 30 days Challenge

Leave a comment