Ratan Tata यांचे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले
गुरुवारी संध्याकाळी दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा (Ratan Tata) यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रख्यात उद्योगपती आणि समाजसेवी रतन टाटा यांचे मुंबईतील स्मशानभूमी पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी बंदुकीची सलामी देऊन रतन टाटा यांना आदरांजली वाहिली. रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले.
उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी त्यांच्या घरातून नेण्यात आले. त्यावेळी एक पांढऱ्या फुलांनी सजवलेले होते. दक्षिण मुंबईतील एनसीपीए येथे रतन टाटा यांचे पार्टी देण्यात आले. दक्षिण मुंबईतील एनसीपी येथेच लोकांसाठी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन ठेवण्यात आले. रतन टाटांचे कुटुंब अंत्यविधीसाठी उपस्थित होते. रतन टाटा यांच्या कुटुंबासह त्यांचे सावत्र भाऊ नोयल टाटा आणि टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन तसेच टाटा समूहाचे इतर उच्च अधिकारी वरळी येथील स्मशानभूमीत उपस्थित होते.
सोमवारी 7 ऑक्टोबर 2024 रोजी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रतन टाटा यांना दाखल करण्यात आले. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि वय संबंधित समस्यांमुळे रतन टाटा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भारत शोकाकुल झाला होता. टाटांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक दिग्गज, कलाकार, राजनेते, खेळाडू, उद्योगपती, विद्यार्थी आणि इतर जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमाने रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत असे म्हटले की, “दूरदर्शी, व्यावसायिक नेता, दयाळू आत्मा, आणि एक विलक्षण माणूस भारताने गमावला.” असे संबोधले. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर काँग्रेसने एका निवेदनात असे म्हटले आहे की, “पद्मविभूषण श्री रतन टाटा, भारतीय उद्योगाचे टायटन आणि भारताच्या कॉर्पोरेट लँडस्केपला आकार देणारे एक परोपकारी व्यक्ती यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे”.
रतन टाटा यांच्या जीवनाची एक झलक
रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म बॉम्बे म्हणजेच आत्ताची मुंबई येथे झाला. त्यांचा जन्म ब्रिटिश राज्यात झाला असून 28 डिसेंबर 1937 या दिवशी एका पारसी जोरात झोराष्ट्रियन कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. ते नवल टाटा (ज्यांचा जन्म सुरत मध्ये झाला आणि नंतर टाटा कुटुंबात त्यांना दत्तक घेण्यात आले) आणि सोनू टाटा समूहाचे संस्थापक (जमशेदजी टाटा यांची भाची) यांचा मुलगा होता.
1938 मध्ये जेव्हा टाटा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या पालकांची फारकती झाली आणि त्यानंतर रतन टाटांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन नवाज बाई (रतन टाटांची आजी आणि रतनजी टाटा यांची बायको) टाटा यांनी केले. रतन टाटा यांनी कॅम्पियन स्कूल, मुंबई येथे आठवीपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूल आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूल मध्ये शिक्षण सुरू ठेवले.
त्यांनी 1955 मध्ये पदवी प्राप्त केली. हायस्कूल नंतर टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला जिथून त्यांनी 1962 मध्ये आर्किटेक्चर मध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली. कॉर्नेल मध्ये असताना टाटा अल्फा सिग्मा फि फ्रेटरनिटीचे सदस्य झाले. 2008 मध्ये टाटा यांनी कॉर्नेलला $50 मिलियन भेट दिली, ज्यामुळे रतन टाटा विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय देणगीदार बनले.
FAQs (Frequently Asked Questions)
रतन टाटा हे दत्तक पुत्र आहेत का?
नाही. रतन टाटा (Ratan Tata) यांनी कोणालाच दत्तक घेतलेले नाही. परंतु बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज होतो की शंतनू नायडू हा त्यांचा दत्तक पुत्र आहे.
रतन टाटा आणि शंतनू नायडू यांची भेट कशी झाली?
शंतनू आणि टाटा यांची पहिली भेट 2024 मध्ये झाली तेव्हा शंतनू हा टाटा समूहासाठी काम करत होता. त्यावेळी रतन टाटा (Ratan Tata) यांनी शंतनुलं मुंबईत एकत्र काम करण्यासाठी आमंत्रण दिले.
रतन टाटा यांच्याकडे किती ब्रँड आहेत?
सध्याच्या काळात रतन टाटा कुठलेच कंपनीचे मालक नव्हते त्याऐवजी टाटा ग्रुप हे टाटा सन्स चे मालक असून त्यांचे मुख्य इन्वेस्टमेंट होल्डिंग कंपनी आणि ते टाटा कंपनीचे प्रमोटर आहेत. टाटा ग्रुप भारतातील सगळ्यात मोठी बिझनेस समूह समूह आहे. या समूहात 100 गुण अधिक कंपन्यांचा समावेश असून त्या शंभरहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहेत. टाटा सुमूहातील काही प्रमुख कंपन्यांमध्ये ह्या कंपन्या समाविष्ट आहेत:
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
- टाटा मोटर्स
- टाटा स्टील
- टाटा पावर
- टायटन
- टाटा प्रोजेक्ट
- एअर इंडिया
- इंडियन हॉटेल्स कंपनी
- टाटा कन्सुमर प्रोडक्ट्स
- वोल्टास
रतन टाटांच्या कायम सोबत असलेला मुलगा कोण आहे?
रतन टाटा यांच्या सोबत कायम असलेला मुलगा म्हणजेच शंतनू नायडू (Shantanu Naidu).
टाटा मोटर्सचे CEO कोण आहेत?
मार्क लिस्टोसेला (Marc Llistosella) टाटा मोटर्सचे CEO आहेत. मार्क लिस्टोसेला यांची 1 जुलै 2021 पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा मोटर्स लिमिटेड म्हणाले, “मार्कचे टाटा मोटर्समध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे. मार्क लिस्टोसेला यांची 1 जुलै 2021 पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा मोटर्स लिमिटेड म्हणाले, “मार्क लिस्टोसेला यांचा ऑटोमॅटिक इंडस्ट्री मध्ये सर्वात जुना अनुभव आहे”. यापूर्वी कार्यरत असलेल्या कंपन्यांची यादी याप्रकारे आहे:
- प्रेसिडेंट अँड सीईओ ऑफ Fuso ट्रक अँड बस कॉर्पोरेशन.
- हेड ऑफ दैमलेर ट्रक्स इन एशिया.
- MD अँड CEO ऑफ देमलेर इंडिया कमर्शियल व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड.
Video Credit: @AbhiandNiyu
टाटा समूहाचे एमडी कोण आहेत?
नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. टाटा समूहाचे फाउंडर जमशेदजी टाटा होते त्यांचे मुख्य कार्यालय म्हणजेच हेडकॉटर्स बॉम्बे हाऊस मुंबई महाराष्ट्र येथे स्थित आहे.
टाटा ही जपानी कंपनी आहे का?
नाही. टाटा हि भारतीय कंपनी आहे. टाटा ही एक भारतीय मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेडक्वार्टर्स म्हणजेच मुख्य कार्यालय भारताची आर्थिक राजधानी मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे.
लेम्बोर्गिनी टाटाच्या मालकीची आहे का?
नाही. लेम्बोर्गिनी ही ताटाच्या मालकीचे नाही. लेम्बोर्गिनी ही वोक्सवॅगन ग्रुप एका जर्मन कंपनीच्या मालकीची आहे.
टाटाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर आहेत.
टाटाचे पहिले CEO कोण होते?
सर जमशेदजी नुसेरवानजी टाटा हे टाटा समूहाचे पहिले चेअरमन होते सर जमशेदजी टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. वयाच्या 29 व्या वर्षी सर जमशेदजी टाटा यांनी एका ट्रेडिंग कंपनीची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी 21 हजाराच्या भांडवलासह या कंपनीची सुरुवात केली होती.
रतन टाटा कोणती कार वापरायचे?
टाटा समूहाचे माजी चैरमन स्वर्गीय रतन टाटा (Ratan Tata) ह्यांनी आपल्या जीवनात भरपूर कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न करून टाटा समूहाचे नाव जगभरात प्रसिद्ध केले. रतन टाटा यांना बऱ्याचदा the Ferrari California ही कार मुंबई शहरात वापरताना पाहिले आहे. त्यांचे समाज कार्य हे नेहमीच लोकांच्या स्मरणात राहणार आहे. टाटा मोटर्स च्या एका स्वप्नातील कार ला जेव्हा रतन टाटा यांनी ग्रहाकांसमोर उतरवले तेव्हा त्यांचे खरे स्वप्न पूर्ण झाले होते असे देखील रतन टाटा यांनी बऱ्याच वेळा उल्लेख करायचे.
टाटा मोटर्स ची नॅनो कार हा रतन टाटा जी यांच्या जीवनातील सर्वात जवळचा उपक्रम होता. Tata Nano ही रतन टाटा (Ratan Tata) यांची सर्वात आवडती कार होती. सर्वसामान्य जनतेला स्वस्तात कमी किंमतीत कार उपलब्ध करून देणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यामुळे जर का आपण पाहिलत तर रतन टाटा यांच्या सर्वात आवडत्या कार मध्ये टाटा नॅनो चा समावेश आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.