Mahindra XEV 9e आणि BE 6e चे हे 9 आकर्षक फीचर्स तुम्हाला माहित आहेत का?
Mahindra XEV 9e आणि BE 6e: काही दिवसांपूर्वीच महिंद्राने आपल्या दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. या कार्स चे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय उत्पादनातील मूळतः इलेक्ट्रिक असलेल्या या प्रथमच गाड्या आहेत. स्पोर्टी लुक आणि मिनीमिलिस्ट डिझाईन शिफ्ट हे वैशिष्ट्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेतच. पण त्यांच्या दिसण्याव्यतिरिक्त सुद्धा काही अशी वैशिष्ट्ये आहेत ज्यांनी कार चालकांचे मन जिंकून घेतले आहे.
ऑगमेंटेड रियालिटी based हेड्स अप डिस्प्ले
दोन्हीही नवीन महिंद्रा Electric Car गाड्यांमध्ये फीचर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ह्या डिस्प्ले मध्ये ऑगमेंटेड रियालिटी टेक्नॉलॉजी चा समावेश करण्यात आला आहे. या डिस्प्लेवर आपल्याला गाडीचा वेग आणि टर्न बाय टर्न नेवीगेशन जे ड्रायव्हरच्या मदतीस येते ब्राईटनेस आणि पोझिशन ऍडजेस्ट करणं यासारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
ऑटो पार्क असिस्ट
महिंद्रा 360 डिग्री कॅमेरा सिस्टम चा पुरेपूर वापर करून घेतला आहे. महिंद्राच्या दोन्हीही इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये (Mahindra XEV 9e आणि BE 6e) हा लक्झुरिअस फीचर चा समावेश करण्यात आला आहे. सिस्टम मुळे अगदी लहान जागेत सुद्धा गाडी पार्किंग करण्यात ड्रायव्हरला फारच मदत होते.
ट्रिपल स्क्रीन लेआउट
महिंद्रा XEV 9e च्या इंटिरियर मधील सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ट्रिपल स्क्रीन लेआउट. महिंद्रा BE 6e च्या केबिनमध्ये एक नाही दोन नाही तर चक्क तीन डिजिटल डिस्प्ले आपल्याला बघायला मिळतात. जत ड्रायव्हर सीट समोरील डिजिटल डिस्प्ले, मिडल डिस्प्ले आणि पॅसेंजर साईड डिस्प्ले चा समावेश आहे.
ड्रायव्हरच्या समोरील डिस्प्ले आणि नेहमीसारख्या मिडल डिस्प्ले वापर कशासाठी होतो हे तर आपल्याला माहीतच असेल परंतु जो तिसरा डिस्प्ले देण्यात आला आहे म्हणजेच पॅसेंजर सीट समोरील जो डिस्प्ले देण्यात आलेला आहे त्याचा वापर ओटीटी प्लॅटफॉर्म वरील सिरीयल, चित्रपट किंवा गाणे ऐकण्यासाठी करता येणार आहे. तेवढेच नव्हे तर व्हिडिओ कॉल्स किंवा ऑडिओ फोन कॉल्स साठी देखील तिसरे डिस्प्ले चा वापर करता येऊ शकतो. त्याचबरोबर क्लायमेट कंट्रोल बोलून कंट्रोल सारखे फंक्शन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सेल्फी कॅमेरा
महिंद्राच्या दोन्ही गाड्यांमध्ये केबिनच्या आत एक सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे. या वैशिष्ट्याचे नाव वाचूनच तुमच्या लक्षात आले असेल की हा कॅमेरा नक्की काय करतो. परंतु नुसता फोटो काढणे हा या मागचा उद्देश नसून कॅमेरा ड्रायव्हरच्या हालचालींवर फोकस ठेवतो आणि जर ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरून तो थकला आहे असं जाणवलं तर त्याला विश्रांती घेण्यासाठी सांगतो. त्या व्यतिरिक्त व्हिडिओ कॉल करण्यासाठी देखील या कॅमेरा चा उपयोग करण्यात येऊ शकतो.
Video Credit: @TheWeekMagazineIndia
NFC कार अनलॉकिंग
वर्षानुवर्ष चालत आलेल्या त्याच चाव्यांच्या डिझाईन ला जर तुम्ही कंटाळा आला असेल तर महिंद्र तुमच्यासाठी NFC सपोर्ट चावी घेऊन आले आहे. ह्या चावीमुळे त्याच जुन्या पद्धतीच्या चावी मुळे होणारी झंझट पासून तुमची सुटका होणार आहे. कारण त्या जुन्या चावी च्या ऐवजी आता कार्ड सारखी दिसणारी चावी महिंद्रा घेऊन आले आहे. ही चावी फक्त गाडीवर (Mahindra XEV 9e आणि BE 6e) tap करायची आणि गाडी अनलॉक होईल.
महिंद्रा XEV 9e आणि BE 6e ची किंमत आणि प्रतिस्पर्धी
महिंद्रा ने नुकतेच आपल्या दोन इलेक्ट्रिक कार (Mahindra XEV 9e आणि BE 6e) चे उद्घाटन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी या दोन्ही गाड्यांच्या किमती देखील सांगितल्या आहेत. दोन्हीही गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे 59 kWh चा बॅटरी पॅक त्यासोबत मिळतो. BE 6e ची किंमत ₹ 18.90 लाखापासून सुरू होते तर XEV 9e ची किंमत ₹ 21.90 लाखापासून सुरू होते.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.