Chhava: छावा मूव्ही टीजर रिव्ह्यू! पुन्हा इतिहासाबरोबर छेडखानी नको! Releasing 6 Dec 2024| Super Exciting

Chhava Movie Teaser Review

नुसतच बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने बघितलं तर शिवरायांचा छावा हा चित्रपट नक्कीच धुमाकूळ वाजवेल यात शंका नाही. परंतु तानाजी आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये जसं ऐतिहासिक गोष्टींचे फेरबदल करून दाखवण्यात आले तसे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असलेल्या या सिनेमांमध्ये कथेमध्ये सोयीने केलेले फेरबदल मराठी प्रेक्षक सहन करेल का?

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका?

आदित्य धार यांच्या उडी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात शिवरायांचा छावा या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. एकूणच त्याची वेशभूषा, अभिनय तसेच आभूषण इत्यादी बघता त्याने महाराजांसारखं दिसण्याचं व वावरण्याचा उत्तम प्रयत्न केल्याचे दिसून येते. अभिनेता म्हणून विकी कौशल हा नक्कीच आत्ताच्या पिढीतला एक उत्कृष्ट कलाकार आहे यात शंका नाही.

चित्रपटगृहात प्रदर्शित कधी होणार?

नुकताच यूट्यूब च्या माध्यमातून छावा (Chhava) या चित्रपटाचे टीचर दर्शकांसमोर आले. छत्रपती संभाजी महाराजांचे पात्र साकारताना विकी कौशलनी दिलेली “हर! हर! महादेव” ची घोषणा अगदीच बॉक्स ऑफिस वर घुमणार असे जाणवते. अ मॅडॉक फिल्म प्रोडक्शन तसेच दीपक विजन द्वारा प्रस्तुत आणि
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छावा हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इतक्या कमी वेळात छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द प्रेक्षकांसमोर दाखवणे खूपच कठीण ठरू शकते. छावा (Chhava) चित्रपटात आपल्याला अक्षय खन्ना याची एक झलक बघायला मिळाली आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की अक्षय कन्ना मुघलांचा बादशाह औरंगजेब यांची भूमिका कशी पार पाडतात.

टीझर येथे पहा:

Video Credit: Maddock Films

या चित्रपटातील इतर पात्रे कोण साकारणार?

Cast:

  1. छत्रपती संभाजी महाराज – विकी कौशल
  2. अक्षय खन्ना- औरंगजेब
  3. रश्मिका मंदाना- येसूबाई भोसले
  4. दिव्या दत्ता-सोयराबाई
  5. आशुतोष राणा
  6. संतोष जुवेकर
  7. प्रदीप सिंह रावत- येसाजी कंक
  8. विनीत कुमार सिंग

Release Date: 06 डिसेंबर 2024
दिग्दर्शक: लक्ष्मण उतेकर
संगीत: ए. आर. रहमान
प्रोडक्शन कंपनी: मॅडॉक फिल्म

Chhava Vicky Kaushal Movie Teaser
Credit: Youtube Channel Maddock Films
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

काय आहेत दर्शकांच्या प्रतिक्रिया?

महाराणी येसूबाई यांची भूमिका रश्मिका मंदाना साकारणार आहे. सोशल मीडियाच्या प्रतिक्रियांवरून असे भाष्य समोर येत आहे की, महाराणी येसूबाईंची भूमिका करण्यासाठी एखादी मराठी अभिनेत्री का निवडण्यात आली नाही. रश्मिका मंदाना ही साउथ इंडियन म्हणजेच दक्षिण भारतीय भाषिक अभिनेत्री असून तिला महाराणी येसूबाई यांची भूमिका खरंच साकारता येईल का? महाराणी येसूबाई हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या त्या मराठा साम्राज्याच्या द्वितीय अभिषेक महाराणी होत्या.

तसेच सोयराबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी असून त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. अभिनेत्री दिव्या दत्ता उत्तम अभिनेत्री आहेत यात वाद नाही परंतु सोयराबाई या इतिहासातील एक महत्त्वाच्या घटक होत्या त्यांची भूमिका दिव्या दत्ता कशा पार पडतात हे बघण्याची उत्सुकता दर्शकांना लागले आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Kiran Mane: “त्या दिवसापास्नं दारू अशी सुटलीये की…..”

Kiran Mane: “त्या दिवसापास्नं दारू अशी सुटलीये की…..” Inspiring Story 4 Us

Leave a comment