Chhaava Trailer | शिवप्रेमी भडकले, आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत..?
छत्रपति संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” ह्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. छत्रपति संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर हा सिनेमा बनवला गेला आहे. लेखक दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचं काही ठीकणी कौतुक होत आहे तर काही ठिकाणी त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे. छत्रपति संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या प्रमुख भूमिकेत विकी कौशल आणि रशमिका मंधाना यांची मुख्य भूमिका असणार “छावा” हा चितपट येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या नंतर फक्त २ दिवसात ६० लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पहिला आहे.
छत्रपति संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट सृष्टीतील हा पहिला सिनेमा आहे. Maddock Films चा हा सिनेमा हा येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्षित होणार आहे. आपल्याला जबरदस्त अनुभूती देणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मना मनात छत्रपति संभाजी महाराज यांचा इतिहास कितपत पोहचवेल हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.
Chhaava Trailer दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या मराठा साम्राज्यातील एक महान आणि क्षत्रिय व्यक्तिमत्व अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांचा इतिहास बऱ्याच सिनेमा आणि नाटकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत जसाच्या तसा कोणी पोहोचवण्याचे धाडस अजूनही केलेले नाही. प्रेक्षकांना ह्या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहेत.
शिवप्रेमी भडकले, आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत..?
Chhaava Trailer “छावा” या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख भूमितीत विकी कौशल्य हा अभिनेता दिसणार आहे त्याचबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलर Chhaava Trailer प्रदर्शित झाल्यानंतर बरेच अपवाद शिवप्रेमींना पाहायला मिळाले आहेत. टेलर मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे दोघेही डान्स करताना दिसत आहे. हे मात्र काही शिवप्रेमींना आवडलेले नाही.
Video Credit: @abpmajhatv
यासंदर्भात छत्रपती यांच्या वारसा लाभलेले संभाजी राजे यांनी शुद्ध पटाच्या निर्माता आणि दिग्दर्शक यांना विनंती केली आहे की असे कुठलेही सीन तुम्ही या सिनेमात दाखवू नये जेणेकरून आपल्या महाराजांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या इतिहासाला गालबोट लागेल. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच ही कारणे समोर आले आहेत या संदर्भात मुलाखत देताना छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले की आम्ही चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठीच प्रोत्साहन देत आहोत.
परंतु चुकीच्या पद्धतीने कुठलेही कुठल्याही गोष्टी दाखविल्या तर अनेक शिवप्रेमींचे मन दुखावतील याचं भान ठेवून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी देखील याबाबतीत काळजी घ्यायला हवी. Chhaava Trailer आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा आणि त्यांचा इतिहास हा जगभर प्रसिद्ध व्हावा आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचावा हीच आमची भावना आहे असे देखील छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
Tata EV Scooter Launch date जाहीर? किंमत फक्त ₹75000? Best ev Scooter
Tata EV Scooter Launch date जाहीर? किंमत फक्त ₹75000? Best ev Scooter