American airlines crash | US Army black hawk helicopter आणि American airlines चे विमान हे एकमेकांना धडकले.! 67 dead

American airlines crash | वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या भयानक प्लेन क्रॅश अपघातात 67 लोक ठार.

American airlines crash: वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या भयानक प्लेन क्रॅश अपघातात जवळपास 67 लोक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या भयानक घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना त्वरित माहिती मिळाली होती त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल खेर व्यक्त केला आहे. यूएस आर्मी चे हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सचे विमान हे एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. ह्या अपघातात 67 नागरिक ठार झाल्याचे दिसून येत आहे.

American airlines crash

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

American airlines crash अमेरिकन एरलाईन्स चे विमान जेव्हा आर्मी च्या हेलिकॉप्टर ला धडकले तेव्हा ते वॉशिंग्टन DC मधील नदी पोटोमॅक ह्या ठिकाणी पोहचले होते अपघात झाल्यानंतर विमान आणि आर्मी चे हेलिकॉप्टर हे नदीच्या पाण्यात कोसळले रात्रीच्या वेळी तात्काळ मदत कार्य मिळायला उशीर झाला असावा असे देखील सांगण्यात येत आहे. ह्या घटनेची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लगेचच मिळली त्या नंतर अपघात झालेल्या ठिकाणी मदत कार्यासाठी नौदल, आर्मी आणि एअरफोर्स ची टीम दाखल झाली.

American airlines crash | कसा झाला अपघात??

Federal Aviation Administration ने दिलेल्या माहिती नुसार हा अपघात रात्री सुमारे नऊ वाजेच्या दरम्यान झाला आहे. सुत्रांच्या माहिती नुसार अमेरिकन एरलाईन्स चे विमान हे विचाटा वरून रेगन नॅशनल एअरपोर्ट कडे जात होते ह्या दरम्यान हे विमान वॉशिंग्टन DC जवळ पोटोमॅक ह्या नदीजवळ असताना अचानक अमेरिकन आर्मी च्या विमानाला धडकले. अमेरिकन एरलाईन्स चे हे विमान लँडिंग करत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 67 लोकं मृत असल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशिरा पर्यंत पोटोमॅक नदीत बचाव कार्य सुरू होते.

Video Credit: @BBCHindi

American airlines crash यादरम्यान रेगन राष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमानांची वाहतूक आता रद्द करण्यात आलेली आहेत. यादरम्यान आर्मी चे हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एरलाईन्स चे विमान यांचे काही व्हिडिओज आता समोर आलेले आहेत ज्यात दोन्ही विमान आणि चोपर ची टक्कर समोर दिसतं आहे. Federal Aviation Administration ने दिलेल्या माहिती नुसार हा अपघात रात्री सुमारे नऊ वाजेच्या दरम्यान झाला आहे. ह्या घटनेनंतर बचाव कार्य जोरात सुरू आहे.

American airlines crash

American airlines crash ह्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्र जाहिर केले ज्यात त्यांनी म्हटले आहे की “मला रिगन नॅशनल एअरपोर्ट जवळ झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर यांच्या भयानक अपघाताबद्दल संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे. परमेश्वर मेलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती देवो. बचाव कार्य मध्ये सगळ्यात पहिली प्रतिक्रिया देणाऱ्या सुरक्षाकर्मिना धन्यवाद देतो. या घटनेवर मी लक्ष देऊन आहे, जशा मला सूचना मिळतील त्याप्रमाणे मी आपल्याला अपडेट करत राहील धन्यवाद”.!

 

विमान आणि आर्मी हेलिकॉप्टर च्या दुर्घटनेनंतर तेथील नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर साधला निशाणा.!

American airlines crash अमेरिकन एरलाईन्स च्या राष्ट्रीय विमानात जवळपास 60 प्रवश्यांसोबत 4 एअरक्राफ्ट crew असण्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन DC येथे झालेल्या विमान आणि आर्मी हेलिकॉप्टर च्या दुर्घटनेनंतर तेथील नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर निशाणा साधला आहे. हा अपघात आहे की हल्ला ह्या बद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. ज्याठिकाणी हा अपघात झाला त्याठीकानावरून फक्त पाच ते सहा किमी अंतरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवास स्थान Whitehouse आहे. अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थीत केले आहेत. अमेरिका सुरक्षित आहे का हा प्रश्न देखील विरोधी पक्षाचे नेते आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत. सध्या ह्या घटनेची आजुन चौकशी सुरू आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Jaguar F Pace 2024 On road Price in India| Ground Clearance, Dimensions, Top model Features and more…

Leave a comment