नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’
Nagraj Manjule Khashaba Movie Teaser: महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आवडते दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एक नवीन चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येत आहे. आतापर्यंत नागराज मंजुळे यांच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. नागराज मंजुळे यांनी प्रेक्षकांच्या मनात एक मोठी जागा तयार केली आहे. नागराज मंजुळे यांचा पिक्चर म्हटलं की प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला जातात. आणि प्रत्येक वेळी नागराज मंजुळे यांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा पेक्षा जास्तच मनोरंजन केले आहे. त्यांच्या चित्रपटातून नुसते मनोरंजनच नाही तर बघणारा माणूस काही ना काही नक्कीच शिकून जातो. त्यांच्या ‘Fandry’ आणि ‘Sairat’ या दोन्ही चित्रपटांनी समाजातील प्रत्येकाला निशब्द केले होते. सहज गंमतशीर चाललेली गोष्ट बघत असतानाच अचानक समाजात असलेल्या जातीभेद व इतर गंभीर समस्यांबद्दल विचार करायला लावणे हे नागराज मंजुळे यांची स्पेशलिटी म्हटली पाहिजे.
‘खाशाबा’ चित्रपटात कोण कोणते कलाकार आहेत?

नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ चित्रपटात आपल्याला जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, ओम भुतकर, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, संग्राम सिंग(पैलवान) आणि स्वतः नागराज मंजुळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. परंतु सगळ्यात विशेष गोष्ट अशी की खाशाबा या मुख्य पात्राची भूमिका नक्की कोण करणार आहे हे सिक्रेट प्रेक्षकांसाठी ठेवले आहे. मुख्य अभिनेत्याचे नाव किंवा चेहरा दाखवला नाही म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे प्रत्येक जण काही ना काही नाव गेस करत आहे.
Nagraj Manjule’s Khashaba Movie
मराठी सिनेसृष्टी मागे पडत आहे की काय आणि हिंदीचे वर्चस्व वाढायला लागले असे वाटत असतानाच नागराज मंजुळे यांचा एक चित्रपट येतो आणि अख्ख्या मराठी सिनेसृष्टीचे दिवस बदलून टाकतो. सैराट आणि फॅन्ड्री सारख्या चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टी वर एक वेगळीच छाप सोडल्याचे आपल्या सगळ्यांनाच आठवते. नुसतच प्रेक्षकांच्या मनात नाही तर बॉक्स ऑफिसवर सुद्धा राज्य गाजवणे यासाठी नागराज मंजुळे प्रसिद्ध आहेतच. अशातच आता नागराज मंजुळे खाशाबा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच घेऊन येत आहे. या चित्रपटाचा टिझर 2 जुलै 2026 रोजी आपल्या सगळ्यांच्या भेटीस आला. या टीचर ने इतकी उत्सुकता वाढवली आहे की शब्दात सांगणं सोपे नाही. चित्रपटामध्ये बऱ्याच मराठी कलाकार आपल्याला बघायला मिळत आहेत.
Video credit: @WeekendWatchmanMarathi
खाशाबा चित्रपटाच्या टिझर मध्ये अजून एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आपल्याला दिसले ते म्हणजे माजी खासदार संभाजी राजे भोसले. खाशाबा जाधव हे कोल्हापूरच्या रांगड्या मातीतले आणि भारतासाठी ऑलम्पिक मेडल आणणारी पहिले खेळाडू होते. या चित्रपटाच्या टिझरमध्ये अगदी काही सेकंदांसाठीच आपल्याला माझी खासदार संभाजी राजे भोसले यांची झलक दिसली आहे. एवढेच नाही तर त्यांनी X या सोशल मीडिया माध्यमावर खाशाबा चित्रपटाचे टीजर शेअर केले आहे.
‘खाशाबा’ चित्रपटाचे मुख्य कलाकार कोण?
खाशाबा चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याचा चेहरा आणि नाव जाहीर केले नसले तरी सुद्धा आमच्या टीमने हे मुख्य पात्र कोण साकारत आहे हे अगदी अचूक ओळखले आहे. आमच्या सूत्रानुसार खाशाबा चित्रपटाचे मुख्य भूमिका संकल्प बॅनर्जी याने साकारलेली आहे. आता 1 जानेवारी 2027 या तारखेला खाशाबा आपल्या जवळच्या चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार असून मुख्य भूमिका कोण साकारत आहे हे तेव्हाच उघडकीस येईल.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News
Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News