Vikrant Massey Quits Acting| 12th Fail सिनेमा मधून लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मेसी याने..?
Vikrant Massey News: भारतीय टेलिव्हिजन मालिका, वेब सिरीज आणि सिनेमा या क्षेत्रांमध्ये आपले विविध रूप आणि अभिनय कौशल्य दाखवून लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मेसी याने नुकताच सोशल मीडियावर आपल्या निवृत्ती बद्दल एक पोस्ट टाकली आहे. 12th फेल हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित झाला होता या सिनेमाने विक्रांत म्हशी याची वेगळीच ओळख निर्माण झाली होती. विक्रांत मेसी हा नेहमीच आपल्या अभिनय कौशल्याचा आणि गुणांचा वापर करून प्रेक्षकांच्या मनात घर करत आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कोण बनेगा करोडपती मध्ये विक्रांत मेसी आणि ट्वेल्थ फेल ज्यांच्या जीवनावर आधारित आहे ते पोलीस अधिकारी मनोज कुमार आणि त्यांच्या पत्नी हे देखील ह्या कार्यक्रमात उपस्थित होते.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालक अमिताभ बच्चन यांच्यासमोर विक्रांत मेसी यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. अभिनय क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करत आलेल्या विक्रांत मेसीने Vikrant Massey सांगितले की गेले कित्येक वर्ष मी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन सृष्टीत काम करत आलो आहे परंतु आज पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांना भेटण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे. याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. यादरम्यान अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील विक्रांत मिश्री यांच्या अभिनयाची आणि कलागुणांचे भरभरून कौतुक केले.
Vikrant Massey Quits Acting: सोशल मीडियावर पोस्ट टाकताना विक्रंत मेसी यांनी लिहिले आहे की गेली अनेक वर्ष आणि त्यापुढील काळ हा अभूतपूर्व आहे. तुमच्या अमाप आणि अप्रतिम पाठिंबामुळे मी आज इथवर पोहोचलो आहे त्याबद्दल मी सर्व चाहत्यांचे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु जसजसा मी पुढे जात आहे तसतशी मला पुन्हा कॅलिब्रेट करण्याची आणि घरी परत जाण्याची वेळ येते आहे. एक पती म्हणून एक वडील म्हणून आणि एक मुलगा म्हणून माझी सुद्धा ही जबाबदारी आहे की मी घरच्यांना वेळ दिला पाहिजे आणि अभिनेता म्हणून देखील माझी जबाबदारी आहे.
यापुढे लिहिताना विक्रांत मिशी आणि लिहिले की 2025 मध्ये आम्ही एकमेकांना शेवटची भेट घेऊन योग्य वाटेपर्यंत. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी नक्कीच सोबत असतील. पुन्हा एकदा धन्यवाद देऊन विक्रांत मेसी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
विक्रांत मेसी आणि त्याची अभिनय कारकिर्दी.!
विक्रांतचा जन्म मुंबईतच झाला. विक्रांत चे आई वडील यांनी पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. त्याला एक भाऊ सुद्धा आहे ज्याने कालांतराने मुस्लिम धर्म स्वीकारला होता त्याचे नाव मोईन आहे. मोठ्या भावाच्या अश्या वागण्याने त्याला खूप त्रास झाला. विक्रांत मेसी ला लहान पानापासूनच कला क्षेत्राची आवड होती. त्याने वयाच्या अवघ्या 7 वर्षा पासूनच नृत्य कला शिकायला सुरवात केली. कलेची जाण असल्याने त्याच्या पालकांनी आणि कला शिक्षकांनी विक्रांत ला कले बद्दल शिक्षणाचे मार्गदर्शन केले. विकृत चे शिक्षणं हे वर्सोवा आणि बांद्रा ह्या भागात झाले आहे. विक्रांत ह्याने हिंदू धर्म स्वीकारला आई वडील ख्रिस्त असून सुद्धा त्याला शिव आराधना करायला आवडत असे विक्रांत मेसी हा महादेवाचा भक्त आहे.
विक्रांत मेसी ने अभिनय क्षेत्रात पदार्पण कधी केले ??
Video Credit: @viralbollywood
Vikrant Massey Quits Acting: विक्रांत मेसीने 2007 मध्ये डिस्नेच्या ‘धूम मचाओ धूम’ या कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनंतर तो ‘बालिका वधू’ सारख्या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकांमध्ये झळकला. त्याचबरोबर ‘धरम वीर’ सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्येही दिसला.
- ब्रोकन बट ब्युटीफुल
- मिर्झापूर
- क्रिमिनल जस्टिस
- हसीन दिलरुबा
- सेक्टर 36
यांसारख्या चित्रपटात विक्रांत ने मुख्य भूमिका साकारल्या. ज्यामध्ये त्याला प्रेक्षकांडून कौतुकाची थाप मिळाली. मिर्झापूर सारख्या सुप्रसिद्ध ऑनलाइन मालिकांमधील भूमिकांनी ओटीटीमध्ये प्रवेश केला.
विक्रांतला कोण आणि का धमकावत आहे?
साबरमती रिपोर्ट या चित्रपटाच्या कॉन्फरन्स दरम्यान, या प्रश्नावर विक्रांतने अशी भाष्य केले की, “मला धमक्या येत आहेत का? हो! धमक्या आल्या आहेत आणि अजूनही येत आहेत. जसं की तुम्हाला माहिती असेलच साबरमती रिपोर्ट हा चित्रपट संपूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे. दुर्दैवाने जर तुम्ही हा चित्रपट बघितला नसेल तर बघण्या पूर्वीच कुठलीही चुकीचे मत तुम्ही मांडणं योग्य ठरेल. तुम्ही जर या चित्रपटाचा ट्रेलर बघितला असेल तर या संपूर्ण तीन मिनिटे ट्रेलर मध्ये आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया च्या योगदानाबद्दल या सगळ्या घटनांवर त्यांची काय भूमिका होती याबद्दल चित्रपटात दाखवले आहे. पूर्ण पिक्चर न पाहता या धमक्या मला आणि माझ्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमला येत आहे.”
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.