5 Benefits of Tea in Winter | कोरा “चहा” पिल्याने काय फायदा होतो आणि गुळाचा चहा पिल्याने काय होते.?
Benefits of Tea in Winter: सध्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात आणि जगभरात भारतीय लोकांबरोबरच विदेशी यांना सुद्धा चहा हा प्रकार खूप जास्त प्रमाणात आवडू लागला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड्स सह अनेक फ्लेवर्सच्या चहा आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. जागोजागी चहाची टपरी आपल्याला आधी दिसायची आता चहाच्या वेगवेगळ्या कंपन्या हा व्यवसाय जोरात चालवत आहे. चहा पिल्याने फायदा होतो की तोटा या संभ्रमात अनेक जण असतात.
चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे अशा वातावरणात नक्कीच तुम्हाला देखील चहा पिण्याची तलप लागू शकते. (Benefits of Tea in Winter) अनेक लोक साखरेचा चहा पितात तर काही लोक गूळ टाकून चहा पितात आणि काही जणांना तर गुड आणि साखर नसला तरी चालतो ते कोरा चहा पितात असे अनेक प्रकारे चहा पिला जातो, कोरा चहा पिल्याने काय फायदा होतो आणि गुळाचा चहा पिल्याने काय होते या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
“चहा” भारतात कसा आला.?
१९०० मध्ये ब्रिटिशांनी चहा हा प्रकार भारतात आला याआधी कॉफी आणि चहा हे ब्रिटिशांचे आवडते पेय होते. त्यानंतर ब्रिटिश काळात चहाची शेती होऊ लागली. चहा म्हटले की आपल्याला आसाम हे राज्य डोळ्यासमोर येते त्या वातावरणात चहाचे पीक हे चांगल्या प्रमाणात येते. सगळ्यात पहिले 1850 साली दार्जिलिंग मध्ये चहाची शेती सुरू करण्यात आली. भारतात अनेक फ्लेवर च्या चहा पहायला मिळतात. (Benefits of Tea in Winter) भारतात चहा चे उत्पादन हे आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये होते. हे दोन्ही क्षेत्र आज जगातील सर्वात जास्त चहा पिकवणाऱ्या जेवली क्षेत्रामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. आसाम मध्ये 4 लाख हेक्टर पेक्षा अधिक जमीनीवर फक्त चहा पिकवला जातो.
चहाचे विविध प्रकार ज्यांचा आस्वाद तुम्ही हिवाळ्यात नक्कीच घ्यायला हवा!
हे आहे चहाचे काही प्रकार जे हिवाळ्यातील थंडीच्या वातावरणात घेतल्याने आरोग्याला नक्कीच फायदा मिळतो (Benefits of Tea in Winter).
कोरा किंवा काळा चहा
या चहाची कडक चव आणि त्यातून मिळणारी कॅफेन बूस्ट थंडीच्या वातावरणात शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करते.
मसाला चहा
या चहा मध्ये पाच आरोग्यदायी मसाल्याचे मिश्रण असल्याने आरोग्याला फारच फायदेशीर ठरते. अद्रक, काळीमिरी, तुळशी, वेलची आणि लवंग या पाच गुणकारी वस्तूंमुळे शरीरात उष्णतेची वाढ होते.
ग्रीन टी
उच्च प्रमाणात कॅफे सह या चहा मध्ये अँटिऑक्सिडंट ची मात्र सुद्धा भरपूर प्रमाणात असते म्हणून वजन कमी करायला या चहाचा उपयोग होतो.
लेमन ग्रास टी किंवा गवती चहा
गवती चहा मुळे आपल्या नेहमीच्या चहा पेक्षा एक वेगळी चव येते. त्याचबरोबर हा चहा आरोग्यासाठी फारच गरजेचा असतो. हिवाळ्यातील थंडीच्या वातावरणात गवती चहाने तरतरी आणि ऊर्जा निर्माण होते.
Video Credit: @medicallyspeakingreal
हिवाळ्यात चहा पिण्याचे पाच फायदे.!
Benefits of Tea in Winter:
सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो: हिवाळा म्हटलं की सर्दी आणि खोकला हे आलच. अशावेळी एक कप चहा घशाला एकदम आराम देतो. तुम्ही जर चहा मध्ये आलं, तुळशीची पानं आणि काळे मिरे बारीक ठेचून टाकले तर खोकल्यामुळे झालेल्या इन्फेक्शन पासून सुटका मिळायला मदत होते.
पचनक्रिया सुधारते: हिवाळ्याच्या वातावरणामुळे होणाऱ्या त्रासांमध्ये पचनक्रिया बिघडणे हा एक त्रास सगळ्यांनाच होतो. अशावेळी जर पुदिनाचा चहा तुम्ही घेतलात तर पचन क्रिया सुधारायला मदत होते. पुदिना सोबतच थोडं आलं आणि स्टार अनिस जर या चहात घातले तर पोट झटपट साफ होते.
वात कमी होण्यास मदत होते: गरम हर्बल चहा जर तुम्ही घेतलं तर वातामुळे आलेली सूज आणि दुखावा कमी होण्यास मदत होते. या हर्बल चहा मध्ये थोडे केसर जर ठेचून टाकले तर अधिक फायदा मिळेल.
नैसर्गिक रित्या ऊर्जा वाढवणे: घरोघरी किंवा रस्त्यांवर मिळणारा मसाला चहा मध्ये शरीराला गरजेचे असलेले न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स उच्च प्रमाणात असते. बाजारात मिळणाऱ्या कॅफिनेटेड ड्रिंक्स पेक्षा चहा हा कधीही उत्तम पर्याय ठरतो.
शरीरातील रक्ताभिसरण सुधरते: हिवाळ्यात वाढलेल्या थंडीमुळे बऱ्याचदा शारीरिक हालचाली कमी होतात अशा वेळी मसाला चहा पिल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter
7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter