The Kapil Sharma Show on Netflix | मामा-भांजे, कृष्णा आणि गोविंदा हे पुन्हा एकत्र दिसले. Best Entertainer No.1

The Kapil Sharma Show on Netflix | बऱ्याचदा आम्ही शूटिंग निमित्त एकमेकांसमोर आलो पण..?

The Kapil Sharma Show on Netflix: आपल्या सर्वांनाच माहित आहे अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा अभिनेता कृष्णा हे दोन्ही एकमेकांशी अनेक वर्षांपासून बोलत नाहीत. कौटुंबिक वादावरून आणि वैयक्तिक गोष्टींवरून दोघांमध्ये खूप आधी वाद झाले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदा याला त्याच्या राहत्या घरी पायाला गोळी लागल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी कृष्णा आणि त्याचे कुटुंब हे देखील गोविंदा यांना पाहायला गेले होते. अनेक वर्षांच्या रागाचे चिन्ह आणि कौटुंबिक वाद हे सोशल मीडियामुळे सर्वांनाच माहित पडले होते परंतु या विषयावर गोविंदा तसेच कृष्णा हे मोकळेपणे बोलत नव्हते.

अनेकदा अभिनेता कृष्णा यांनी आपल्या मामा गोविंदा बद्दल बरेच न्यूज चॅनलला आणि सोशल मीडियावर सांगितले आहे की त्याने अनेकदा गोविंदा शी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु मामा हा नेहमीच त्याच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने कधीच मला वेळ दिला नाही आणि तो त्याच्या जागी आणि मी माझ्या जागी बरोबर आहेत म्हणून पत्रकारांनी कुठल्याही अफवा पसरवू नयेत असे देखील कृष्णा याने सांगितले होते. आमचे वाद कधीच मिटले आहेत माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी चित्रपट सृष्टीत आगमन केले त्या काळात मामानेच मला प्रोत्साहन दिले होते आणि मदत केली होती.

 

Govinda Krishna Abhishek kapil sharma show

Telegram Group Join Now

आज मी देखील चित्रपट सृष्टीत माझा एक वेगळा स्थान निर्माण करू शकलो यासाठी मी मामाचा नेहमीच ऋणी राहील असे देखील कृष्णा नेहमी म्हणतो. परंतु लोकांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज आहेत. आमच्या नात्या त थोडेफार कौटुंबिकाने वैयक्तिक वाद होते जे आता संपले आहेत. त्यानंतर बऱ्याचदा आम्ही शूटिंग निमित्त एकमेकांसमोर आलो आहोत आम्ही सामान्यांप्रमाणेच एकमेकांशी बोलतो आहोत.

(The Kapil Sharma Show on Netflix) Netflix वर सुरू असलेल्या द कपिल शर्मा शो मध्ये सध्या कृष्णा हा काम करत आहे. या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा आणि शक्ती कपूर व सह कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याच दरम्यान मामा भाचे म्हणजेच अभिनेता गोविंदा आणि कृष्णा हे दोन्ही एकमेकांना भेटले. ऑन स्क्रीन केमिस्ट्री चा एक ट्रेलर नुकताच लॉन्च झाला होता त्यामध्ये कृष्णा गोविंदाला कडकडून मिठी मारतो आणि म्हणतो “बोहोत सालोबाद मिले है अब तो नही छोडूंगा” आणि हे बोलून घट्ट मिठी मारून आपल्या मामा बरोबर म्हणजेच गोविंदा बरोबर कृष्णा ने त्याचे मनोगत आणि भावना व्यक्त केल्या.

द कपिल शर्मा शो हा भारतात तसेच बाहेर देशात सुद्धा प्रेक्षकांचा लाडका आहे. सोनी टेलिव्हिजन वर आधी सुरू झालेल्या द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show on Netflix) अनेक वर्ष सोनी टेलिव्हिजन सोबत काम केले आणि अनेक भाग गाजवले देखील. कपिल शर्मा या शोमुळे खूप जगप्रसिद्ध झाला त्याचबरोबर कपिल शर्मा भारतीय चित्रपट सृष्टीतला महागडा अभिनेता सुद्धा झाला गेल्या काही वर्षांमध्ये कपिल शर्मा याने कोट्यावधींचा टॅक्स सुद्धा भरला आहे.

Video Credit: @KapilSharmaK9

द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) हा काही काळासाठी बंद सुद्धा झाला होता. सहकलाकारान सोबत झालेल्या वादांमुळे कपिल शर्मा याला हा शो बंद करावा लागला होता. अभिनेता सुनील ग्रोवर हा खूप चांगला अभिनेता आहे याने द कपिल शर्मा शो याचे अनेक भाग गाजवले आहेत. या शोमध्ये सुनील ग्रोवर यांनी अनेक वेगवेगळे पात्र सुद्धा साकारले आहेत जसे की ज्यातले अतिशय लोकप्रिय झालेले पात्र म्हणजे डॉक्टर मशरूम गुलाटी त्याचबरोबर स्त्रियांचे पात्र आणि अनेक दिग्गज कलाकारांच्या मिमिक्री सुद्धा सुनील ग्रोवर याने केल्या होत्या.

अनेक वर्ष कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये दुरावा दिसून आला होता परंतु आता हे दोन्हीही कलाकार एकत्र येऊन नेटफ्लिक्स वर द कपिल शर्मा शो Netflix मध्ये काम करत आहेत. कपिल शर्मा याला मानसिक त्रास होत होता ज्या कारणाने त्याने आपल्या वैयक्तिक जीवनावर आणि कामावर त्याचा परिणाम करून घेतला होता असे देखील कपिल शर्मा यांनी वक्तव्य दिले होते.

(The Kapil Sharma Show on Netflix) हा सध्या Netflix या OTT प्लॅटफॉर्म वर प्रसारित होतो. ह्या शो चे भाग हे प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवारी रात्री  प्रसारित होत असतात. त्याच बरोबर ह्या आठवड्यात (The Kapil Sharma Show on Netflix) मध्ये 90 च्या दशकातली कॉमेडी आणि हसवणारे दिग्गज कलाकारांची जोडी इथे आलेली होती. ज्या मध्ये अभिनेता गोविंदा, अभिनेता चंकी पांडे आणि अभिनय क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणारा कलाकार शक्ती कपूर ह्यांना आमंत्रित केले होते.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter

 

7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter

Leave a comment