रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore): बालपण व शिक्षण
रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) (बंगाली मध्ये रोबीन्द्रनाथ ठाकूर) यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. रवींद्रनाथ यांचा जन्म कलकत्त्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला होता. कोलकत्यात असलेल्या जोरात शंकर ठाकूर वाडी येथे रवीचा जन्म झाला रवीचे वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदादेवी होते. त्यांना एकूण १४ आपत्य होती. त्यातील रवी हे १३वे आपत्य होते.
बरं रवी म्हणजेच रवींद्रनाथ टागोर बर का! लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 11व्या वर्षी मुंज झाल्यानंतर त्यांनी भारत ब्रह्मणांशी सुरुवात केली. या भारत ब्रह्मणात त्यांचे वडील त्यांच्यासोबत होते. 14 फेब्रुवारी 1873 रोजी रवींद्रनाथ यांनी भारत ब्रह्मणासाठी कलकत्ता सोडले. या भारत ब्रह्मणांच्या दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी पाहिली. हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी, अमृतसर तसेच शांतिनिकेतन येथील मालमत्ता सुद्धा त्यांनी पाहिले. शांतिनिकेतन म्हणजेच आजचे विश्वभारती विद्यापीठ होय. या ठिकाणी रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्र वाचले. त्याचबरोबर खगोलशास्त्र, कालिदासांचे काव्य, विज्ञान, खगोलशास्त्र आणि संस्कृत इत्यादींचे वाचन केले. त्यांच्या वाचनाच्या आवडीतूनच लिखाणाची आवड निर्माण झाली असावी असे वाटते.
रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore): जीवनपट
रवींद्रनाथांना आपण चित्र नाटककार बंगाली कवी संगीतकार कादंबरीकार समाज सुधारक आणि ब्राह्मपंथीय म्हणून ओळखतोच पण त्यांना गुरुदेव या नावाने संबोधले जायचे हे फार कमी लोकांना माहित आहे. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथांच्या लेखणीमुळेच बंगाली साहित्य आणि संगीतात अमुलाग्र बदल घडून आल्याचे आपल्याला दिसते.
रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी 1913 मध्ये नोबल पारितोषिक जिंकले आहे. नोबल पारितोषिक जिंकणारे ते फक्त पहिले भारतीय नसून ते पहिले गैर युरोपियन आणि पहिले साहित्यातील गीतकार बनले. रवींद्रनाथ टागोर यांनी 1913 मध्ये नोबल पारितोषिक जिंकले आहे. नोबल पारितोषिक जिंकणारे ते फक्त पहिले भारतीय नसून ते पहिले गैर युरोपियन आणि पहिले साहित्यातील गीतकार बनले. रवींद्रनाथांच्या काव्यात्मक गाण्यांमध्ये नुसते पारंपारिक काव्य म्हणून नाही तर आध्यात्मिक म्हणून सुद्धा पाहिले जायचे. दुर्दैव असं की त्यांचे सुंदर गद्य आणि जादुई कविता बंगाल बाहेर फारसे प्रसिद्ध नाहीत. पण इतरांनी सुद्धा त्यांचा आस्वाद घ्यावा असं कळकळीने वाटतं.
Video Credit: Gingerline Media
आजच्या पिढीला “जन गण मन” हे रवींद्रनाथांनी लिहिलं यापलीकडे फारसा ज्ञान त्यांच्या साहित्याबद्दल नाहीये याची खंत वाटते. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथांनी रचले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु बांगलादेशचे सुद्धा राष्ट्रगीत रवींद्रनाथांनीच रचलेले आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. अमर शोनार बांगला हे बांगलादेशच्या राष्ट्रगीताचे नाव आहे. रवींद्रनाथ सर्वात प्रथम लोकांसमोर आले ते १८७७ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या रचनांमुळे. या रचनांमध्ये काही दीर्घ कविता होत्या ज्या मैथिली कवीच्या विद्यापती प्रवर्तित शैलीच्या रचलेल्या होत्या. याच काळात त्यांनी बंगाली भाषेतील त्यांची पहिली लघुकथा “भिकारिणी”, संध्या-संगीत(१८८२) व सुप्रसिद्ध कविता “निर्झरेर स्वप्नभंग” इत्यादी रचना लिहिल्या होत्या. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी प्रवेश घेतला पण 1880 मध्ये कोणत्याही पदवी शिवाय ते बंगालला परत आले.
महाराष्ट्र आणि रवींद्रनाथ
त्या काळात महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथ यांच्यावरही पडला होता. त्यावेळी महाराष्ट्र राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये प्रमुख केंद्र असल्याने त्यांचे लक्ष महाराष्ट्र कडे गेले. रवींद्रनाथांनी संत तुकाराम महाराजांच्या साहित्यांचा अभ्यास त्यांनी बारकाईने केला होता. म्हणूनच रवींद्रनाथांनी संत तुकारामांचे अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
रवींद्रनाथांना (Rabindranath Tagore) आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा कारवार येथील सृष्टी सौंदर्यामुळे मिळाली होती. तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन रवींद्रनाथांसाठी सुद्धा प्रेरणास्थान होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा त्यांनी एक सुंदर खंडकाव्य रचले आहे.
पण त्या काळात रवींद्रनाथ नेता किंवा क्रांतीकारक या रूपात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी नव्हते व त्यांच्या सांस्कृतिक वृत्तीमुळे महाराष्ट्रात त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर सुद्धा रवींद्रनाथ केले होते त्याबरोबरच जगातील अनेक भाषात अनुवाद त्यांनी केले. महाराष्ट्रातील बऱ्याच कवींनी रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे मराठीतून अनुवाद केले आहे. ते याप्रमाणे आहेत
१. हरि नारायण फडके
२. डॉक्टर राम म्हैसुरळकर अमरावती- रवींद्र गीतांजली
3. ज्योती कुलकर्णी- गीतांजली रवींद्रनाथांच्या- माझ्या मराठीत
रवींद्रनाथांचे कार्य
रवींद्रनाथांनी चार लघुकादंबऱ्या लिहिल्या आहेत, “चतुरंग”, “शेषर कबिता”, “चार अध्याय”, “घरे बाईरे” आणि “नौका डुबी”. तसेच त्यांनी आठ मोठ्या कादंबऱ्या देखील लिहिल्या आहेत. जीवनस्मृती या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या बालपणापासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत. तसेच या पुस्तकाचे मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केले आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी वाल्मिकी प्रतिभा या नावाने रवींद्रनाथांनी पहिले नृत्य नाट्य लिहिले आहेत. या नृत्य नाट्यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन तसेच युरोपीय गीत शैलींचा समिश्र वापर केला आहे. गोरा, मुक्तधारा, राजऋषी, राजराणी अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिले आहेत. तसेच काबुलीवाला, दृष्टीदान, क्षुधित पाषाण या लघुकथा त्यांनी लिहिले आहेत. चंडालीका, चित्रांगदा, मालिनी आणि श्यामा या नृत्य नाटिका त्यांनी लिहिले आहेत. त्यांनी याचबरोबर काही काव्य व पुस्तके देखील लिहिली आहेत, गीतांजली, जन्मदिने, नैबैद्य, पत्रपूत इत्यादी. रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली तसेच हिंदी चित्रपट सुद्धा निघाले आहेत त्यापैकी काही उदाहरणे म्हणजे परिणीता, इत्यादी.
रवींद्रनाथांवरील मराठी पुस्तके
- रवींद्रनाथ टागोर: एक संपन्न व्यक्तिमत्व
लेखक: पद्मिनी बिनीवाले - रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्य दर्शन
लेखक: डॉ. नरेंद्र जाधव - रवींद्रनाथ-शुभ बुद्धीचे उपासक
लेखक: आशा साठे - रवींद्रनाथ टागोर
लेखक: प्रतिभा लेले - गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर (चरित्र, व्यक्तिचित्रण)
लेखक: उज्वला दीक्षित
Frequently Asked Questions (FAQs):
भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?
भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी 11 डिसेंबर 1911 रोजी हे गाणे मूलतः बंगालीमध्ये रचले होते. ‘भारतो भाग्यो बिधाता’ हे मूळ गाणे एक ब्राह्मो स्तोत्र आहे ज्यामध्ये पाच श्लोक आहेत आणि फक्त पहिला श्लोक राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या संतांचा प्रभाव रवींद्रनाथ टागोरांवर होता?
रवींद्रनाथांनी संत तुकाराम महाराजांच्या साहित्यांचा बारकाईने अभ्यास केला होता. संत त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
Vinesh Phogat Disqualified! सुवर्णपदकापासून वंचित ! 50 किलो वजन गटात वजन जास्त झाले!