PM Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी 74 वा वाढदिवस साजरा करीत.. भारतीयांना दिल्या ” श्री विश्वकर्मा दिनाच्या” शुभेच्छा! PM Vishwakarma Yojana 2024 | Most Expensive E-auction!

PM Narendra Modi| मिळालेल्या भेटवस्तूचे 17 सप्टेंबर रोजी e-auction होणार?

PM Narendra Modi यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मिळालेल्या भेटवस्तू यांचे आज 17 सप्टेंबर रोजी e-auction होणार आहे. ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू जसे की पारंपारिक अंगवस्त्र शॉल पारंपारिक टोप्या पगडी फेटा त्याचबरोबर सोन्याची चांदीची भेटवस्तू खादीने बनलेल्या वस्त्र आणि शाल तसेच काही पेंटिंग्स आणि राम मंदिराचा एक छोटा देखावा असलेलं असलेली भेटवस्तू तिची किंमत जवळपास साडेपाच लाख रुपये आहे त्याचबरोबर मोदींना मिळालेला मोराची मूर्ती जिची किंमत जवळपास साडेतीन लाख रुपये आहे राम मंदिराचा देखावा 2.75 लाख रुपये अशा अनेक भेटवस्तूंचे आज e-auction होणार आहे ज्यात कमीत कमी किमतीच्या वस्तू 600 रुपयांपासून ते जास्तीत जास्त नऊ लाखापर्यंतच्या भेटवस्तूंचे ऑनलाइन पद्धतीने e-auction होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेला विश्वकर्मा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) त्याचे देखील उद्घाटन केले. या योजनेमुळे भारतातील सुतारी काम करणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ह्या योजनेची घोषणा नुकतीच केली गेली आहे. या योजनेचा सुतार काम लोहार काम विणकाम भांडी बनवणे शिल्पकला करणारे आणि इतर पारंपारिक व्यवसाय करणारे भारतातील कुशल कारागीर यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विश्वकर्मा योजने चे पैसे कधी मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) 2024 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. ज्यात सुतार काम लोहार काम आणि शिल्पकला काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना या योजनेचे फॉर्म भरता येणार आहेत. पीएम मोदी विश्वकर्मा योजना 2024 यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन हा फॉर्म भरता येणार आहे. त्यात जाऊन आपले नाव नंबर पत्ता रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर आधार इ केवायसी पूर्ण करून आपला मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. MSDE च्या ऑनलाइन ट्रेनिंग नंतर जे उपभोक्ता या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) 2024  या अंतर्गत पहिल्या टप्प्यात एक लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर वर जाऊन भेट द्या.

https://pmvishwakarma.gov.in/

विश्वकर्मा योजने संदर्भात अधिक माहिती मिळवून देण्यासाठी खालील दिलेली PDF फाईल डाऊनलोड करा.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अहमदाबाद मेट्रोच्या Phase-II चे अनावरण

Video Credit: @ANINewsIndia

दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रोच्या Phase-II चे अनावरण केले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवास करून नवीन युवा पिढीच्या विद्यार्थ्यांची संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अहमदाबादच्या नवीन मेट्रो रेल प्रोजेक्टचे उद्घाटन केले. याचबरोबर भारतात येणाऱ्या काळात रेल्वेचे नवीन प्रोजेक्ट आणि 26 लाख घर बनवून देण्याचा देखील उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते सध्या त्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत सोबतच पूर्वी राहत असलेल्या गांधीनगर येथील घरात त्यांचा काही वेळ घालवत आहेत.

Click here: PM Vishwakarma Yojna

पंतप्रधान मोदी यांनी अहदाबाद मेट्रो फेस-2 येथे नवीन मेट्रोचे उद्घाटन केले. वंदे भारत मेट्रो रेल या मेट्रो चे नाव बदलून आता नमो भारत मेट्रो असे ठेवण्यात आले आहे. ही मेट्रो अहमदाबाद सिटी ते भुज यादरम्यान सुरू होणार आहे. ह्या मेट्रो ट्रेनची सुविधा नागरिकांना सोमवार ते शनिवार या दिवशी मिळणार आहेत. रविवारी या नमो भारत मेट्रो ट्रेनच्या सुविधा बंदरातील. अहमदाबाद ते भुज यादरम्यान पुढील स्थानकांवर ही मेट्रो थांबणार आहे. काय आहे नमो भारत मेट्रो Phase-II चा रूट. अधिकृत वेळापत्रकानुसार ही गाडी अंजार मेट्रो स्टेशन, गांधीधाम मेट्रो स्टेशन, भचाव मेट्रो स्टेशन, समखिआली मेट्रो स्टेशन, हलवाड, धरंगधरा, विरमगाम, चंदलोडिया, आणि साबरमती मेट्रो स्टेशन या स्थानकांवर थांबणार आहे.

PM Narendra Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी “दीपज्योती” याचे आगमन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 Lok Kalyan Marg in New Delhi येथील निवासस्थानी गाईने एका वासरू ला जन्म दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची गौसेवा आणि प्राणीमात्रांना वरील आस्था ही नेहमीच दिसून येते. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका नवीन सदस्याचे शुभ आगमन झाले आहे,” असे सोशल मीडियावर पीएम मोदींनी X वर एका हिंदी पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन सदस्याचे नाव दिपज्योती असे ठेवले आहे, हे वासरू अतीशय गोंडस आहे, ज्याच्या कपाळावर एक विशिष्ट प्रकाशाच्या आकाराची खूण देखील आहे. सध्या ह्या वासरू “दिपाज्योती” सोबतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Ladki Bahin Yojana : पैसे आले खात्यात, रक्षाबंधनच्या आधीच बहिणीला मिळालं 1 Unexpected Gift!

Ladki Bahin Yojana : पैसे आले खात्यात, रक्षाबंधनच्या आधीच बहिणीला मिळालं 1 Unexpected Gift!

Leave a comment