Paris Olympics 2024 | मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे न दिलं भारताला 3 रे Bronze Medal ! Great Victory !

भारताच्या यादीत सलग तिसरे कांस्यपदक ! स्वप्नील कुसाळे न दिलं 3 रे Bronze Medal !

आज सुरू असलेल्या Paris Olympics 2024 ऑलिंपिक गेमच्या फायनल राऊंड मध्ये आपल्या भारताच्या स्वप्निल कुसाळेने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. स्वप्नील कुसाळे ने 50m rifle मध्ये तिसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे. भारतासाठी हे सलग तिसरे कांस्यपदक आहे जे एअर रायफल नेमबाजी यामध्ये मिळाले आहे. या आधी मनु भाकर हिने वैयक्तिक आणि ग्रुप असे दोन्ही मिळून दोन कांस्यपदक आणि आता स्वप्निल कुसाळे याने एक, असे एकूण तीन कांस्यपदक भारताच्या ऑलिम्पिक यादीमध्ये नोंदले आहेत.

काल झालेल्या सामन्यात स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) हा चौथ्या स्थानी होता, त्याचबरोबर युक्रेंचा S Kulish हा तिसऱ्या स्थानी, नॉर्वेचा J. Hegg दुसऱ्या स्थानी तर चायना चा YK Liu हा पहिल्या स्थानी होता. आज झालेल्या फायनल राऊंड मध्ये चीन चा Y.K Liu याने आपले प्रथम स्थान भक्कम धरून त्याला ह्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले. तसेच नॉर्वेच्या J. Hegg पिछाडीवर सोडत युक्रेंच्या S. kulish. ला दुसरं स्थानावर बाजी मारून सिल्वर मेडल प्राप्त केले. आपल्या भारताच्या स्वप्निल ला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल, त्याला कांस्यपदक मिळाले.

50 मीटर 3P रायफल शूटिंग मधले हे पहिलेच पदक मिळाले आहे.

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Bronze Medal स्वप्निल कुसाळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आतापर्यंत भारताच्या यादीत दहा मीटर रायफल साठी दोन कांस्यपदक आलेली होती. 50 मीटर 3P रायफल शूटिंग मधले हे पहिलेच पदक मिळाले आहे. स्वप्निल कुसाळेचे सर्वांतर्फे खूपच कौतुक होत आहे. स्वप्निल ने स्टेज 2 च्या इलिमिनेशन शॉट नंतर त्याची पुढील शॉर्ट सह प्रत्येकी 10.5, 9.4, आणि शेवटी 9.9 हे शॉर्ट मारून त्याने फायनल मध्ये आपली जागा आणि स्थान तिसऱ्या क्रमांकावर निश्चित केले. या प्रकारे आपला स्वप्निल कुसाळे कांस्यपदकाचा मानकरी झाला. गोल्ड साठी प्रत्येकी 10 points लागणार असल्या कारणाने तो तिसऱ्या स्थानावर राहिला याचप्रमाणे भारताला तिसऱ्या पदकाची भर आपल्या यादीत ठेवता आली. याआधी स्वप्निल कुसाळे ने रियो Olympics स्पर्धेत 2016 मध्ये रोप्य पदक जिंकले होते, त्यामध्ये त्याला 451.4 एवढे गुण मिळाले होते.

Paris Olympics 2024 | कोण आहे स्वप्निल कुसाळे ?

स्वप्निल कुसाळे हा मूळचा कांबलवाडी गावं जिल्हा कोल्हापूरचा आहे. तो सध्या पुण्यात रहातो तेथेच त्याने शिक्षण आणि आपल्या स्पोर्ट्स ची coaching घेतली. स्वप्निल हा गेल्या १२ वर्षां पासून Olympics games ची practice करत आहे. त्याचा जन्म 6 Aug 1995 साली झाला होता. त्याचे वय 28 वर्ष आहे तो गेल्या दहा- बारा वर्षांपासून ऑलिंपिक आणि नॅशनल गेम्स मध्ये भाग घेत आहे. याआधीही त्याने भारताला बरेच मेडल्स मिळवून दिले आहेत. जसे की 2017 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये स्वप्निल ला कांस्यपदक मिळाले होते.

Paris Olympics 2024 | स्वप्निल स्वप्नील कुसाळेला आले आनंदाश्रू !

Video Credit : ABP majha 

स्वप्निल ने त्याच्या भावना व्यक्त करताना सांगितले की “मी खूप भारावलो आहे. मी शब्दात सांगू शकत नाही पण मला खूप जास्त आनंद होतोय. मी गोल्ड नाही जिंकू शकलो, तरी माझ्यासाठी Bronze medal हे खूप महत्त्वाचे आहे. मी आपल्या देशासाठी मेडल जिंकू शकलो.”

काय म्हणाले स्वप्निल कुसाळे चे “आई-बाबा” ?

पत्रकारांशी संवाद साधताना स्वप्नील कुसाळे चे आई-वडील अगदी भाऊक होताना दिसतात. स्वप्निल च्या आईचे आनंद अश्रू अनावर झाले. स्वप्निल कुसाळे चे वडील असे म्हणाले की, “मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षांची स्वप्निलची जी तपश्चर्या आहे, त्याचे जे कष्ट आहेत तो कधीच बोलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीच खाली पडू देणार नाही याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला असेल पण तरी त्यांनी तिरंगा झेंडा फडकवत ठेवला याचा मला अभिमान वाटतो.”
आनंदाने पाणवलेल्या डोळ्यांनी स्वप्निल कुसाळे ची आई असं म्हणाली की,” माझ्या मुलाने भारताचा झेंडा अटकेपार फडकवला याचा मला खूप अभिमान वाटत आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.” स्वप्निलच्या आई-बाबांसारखंच संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देश सुद्धा स्वप्निल कुसाळेच्या विजयावर अभिमान बाळगतो या त काहीच शंका नाही. आज महाराष्ट्रातल्या तसेच भारतातल्या प्रत्येक आई-वडिलांना स्वप्निल कुसाळे सारखा पुत्र जन्माला यावा असे नक्कीच वाटत आहे.

स्वप्निल कुसाळेच्या Coach दिपाली देशपांडे

दिपाली देशपांडे ह्या स्वप्नील सारख्या बऱ्याच मुलांना कोचिंग करत असतात. दिपाली देशपांडे यांच्याशी आज दिल्लीमध्ये संवाद साधताना त्या म्हणाल्या, मला खूपच आनंद होतोय इतक्या वर्षांची स्वप्निल ची मेहनत आज कामी आली आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

https://taajyabatmya.com/paris-olympics-2024-hockey-manu-bhaker-sarabjot/

Leave a comment