New Dzire | आता फक्त Dzire म्हणायचं ?? किंमत फक्त 7 लाखा पासून | Best Car New Gen Maruti Suzuki Dzire

New-gen Maruti Suzuki Dzire: मारुती सुझुकी Swift Dzire नाही तर फक्त सुझुकी Dzire म्हणतात ह्या कार ला??? किंमत फक्त ७ लाखा पासून..!

New Dzire: जर तुम्ही गाडीचा फोटो बघून आमच्या ब्लॉग पोस्टवर आला असाल तर नक्कीच तुम्ही देखील मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायरचे चाहते असाल यात शंकाच नाही. भारतीय ग्राहकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. सर्वात जास्त विकली जाणारी आणि ग्राहकांच्या पसंतीत उतरणारी एकमेव सीडान कार म्हणजे मारुती सुझुकीची डिझायर ही आपल्या नवीन अवतारात लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. नुकताच लॉन्च झालेल्या नवीन डिझायर चे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. भारतीय बाजारात  धुमाकूळ घालण्यासाठी नवीन जनरेशनची मारुती सुझुकी डिझायर (New Dzire) लॉन्च झाली आहे.

नवीन आकर्षक फीचर्स बरोबरच क्लासिक डिझाईन आणि लूक सह कमीत कमी किमतीत नवीन (New Dzire) ग्राहकांसाठी भारतीय बाजारात उतरणार आहे. गेल्या काही वर्षात भारत देश हा जगातील सर्वोच्च पाच देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारतीय लोकांच्या आवडीनिवडी आणि गरजेनुसार भारतीय वाहन बाजारात जोरदार मागणी सुरू आहे. मारुती सुझुकी ही कंपनी नेहमीच भारतीय नागरिकांची सर्वात पहिली पसंती दिसून आली आहे. सामान्य कुटुंबाला पहिली कार घेण्यासाठी मारुती सुझुकीची पहिली पसंती बघायला मिळते.

New Dzire

Telegram Group Join Now

मारुती सुझुकीच्या अनेक गाड्या जसे की मारुती सुझुकी वॅगन आर, मारुती सुझुकी सेलेरियो, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर, मारुती सुझुकी SPresso, तसेच एसयूव्ही कार्स मध्ये मारुती सुझुकी एर्टिगा, मारुती सुझुकी ब्रेझ्झा, मारुती सुझुकी ग्रंड विटारा आणि नुकतीच भारतीय मार्केटमध्ये आपला दबदबा गाजवणारी मारुती सुझुकी fronxx या गाड्यांनी भारतीय ग्राहकांचे नेहमीच मन जिंकली आहेत. त्याचबरोबर आता सर्वात आवडती गाडी म्हणजे स्विफ्ट डिझायर हिचा नवीन मॉडेल भारतीय बाजारात उतरविण्यात येत आहे. नवीन लुक ऍडव्हान्स फीचर्स दमदार मायलेज आणि कमी किंमत हे या गाडीचे वैशिष्ट्य राहणार आहे. या गाडीला मारुती सुझुकी ने डिझायर असे नाव दिले आहे. जुन्या स्विफ्ट डिझायर ला मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (New Dzire) असे नाव दिले होते कारण तिचा हॅचबॅक बॅरियंट हा स्विफ्ट होता.

New Dzire मध्ये 1.2 लिटर चे पेट्रोल Z series petrol engine सह.. काय आहेत फीचर्स..?

New Dzire ही कार फक्त तिच्या क्लासी लूक साठीच नाही तर नविन 1.2 लीटर च्या दमदार इंजिन सह मिळणार आहे. ह्याच बरोबर New Dzire कार ही आपल्याला विश्वसनीय इंधन कार्य क्षमतेचे आश्वासन देखील देते आहे. New Dzire मध्ये आपल्याला Sharp design लूक, प्रीमियम इंटेरियर टच सह responsive engine देखील मिळते आहे. New Dzire ही कार Hyundai Aura आणि Honda Amaze ह्या सेगमेंट मधल्या दोन्ही कार्स ला काट्याची टक्कर देणार आहे. आपल्या जबरदस्त परफॉर्मन्स आणि आकर्षक लूक घेऊन All New Dzire लॉन्च होणार आहे येत्या 11 नोव्हेंबर ला. आपल्याला नविन Dzire मध्ये 1.2 लिटर चे पेट्रोल Z series petrol engine बघायला मिळणारं आहे.

ज्यात आपल्याला 69 Nm ते 80 Nm पर्यंतचा powerful Torque मिळणारं आहे. New Dzire मध्ये आपल्याला मोठ्या आकाराच्या Chrome ग्रिल सह आकर्षक led lamp देखिल मिळणारं आहेत. शानदार New Dzire मध्ये आपल्याला 15-17 इंचेस च्या टायर बघायला मिळतील. त्याचं बरोबर नॉर्मल आणि alloy wheels चे विविध ऑप्शन्स देखील मिळणारं आहेत. स्विफ्ट hatchback च्या तुलनेत पाहिले तर led insert सहीत मोठे tail lamp आपल्याला मिळणार आहेत. ग्राहकांसाठी नविन New Dzire मध्ये सुरवातीला सात नवीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात आपल्याला dual tone कलर ऑप्शन देखील मिळणारं आहेत.

Video Credit: @JagranHiTech

New Dzire मध्ये भरपूर नवीन feature ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. ज्यात 360° कॅमेरा असेल. त्याचबरोबर आकर्षक डिझाईन असलेल्या led headlamps सहित led DRL देखील बघायला मिळेल. डिजिटल touch screen हा 9 Inches चा फ्लोटिंग display असेल ज्यात infotainment system मिळेल. त्याच बरोबर ऑटोमॅटिक climate change सिस्टिम आणि Cruze control चे ऑप्शन देण्यात आले आहे. त्याच बरोबर आर्म रेस्ट साठी पुढे आणि मागे सुविधा देण्यात आली आहे. ह्या सेगमेंट मध्ये पहील्यांदाच मारुती सुझुकी dzire कंपनीने Electric सोबत Automatic Sunroof देणार आहेत. सध्या ग्लोबल सेफ्टी नियमांचे पालन सर्वच कार निर्माण करणाऱ्या कंपनी करत आहेत. New Dzire मध्ये आपल्याला पहील्यांदाच सहा Airbags पहायला मिळतील. नविन मारुती Dzire च्या सर्व variant मध्ये आपल्याला EBD सहित ABS सोबतच stability program देखिल मिळणार आहेत.

कधी होणार Maruti New Dzire लाँच ?

सध्या new Dzire ची टेस्टिंग सुरू आहे. भारतीय रस्त्यांवर All New Dzire खरी उतरेल ह्या कडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. आपल्या नवीन 1.2 लीटर z series च्या तीन सिलेंडर इंजिन ची क्षमता वाढवण्यात आली आहे. हे इंजिन 80/112 nm एवढा जबरदस्त Torque निर्माण करते. ह्या सोबतच new Dzire मध्ये 5 gear Manual आणि automatic असे दोन्ही variant ग्राहकांसाठी मिळणारं आहेत. सध्या new Dzire ह्या कार चे पेट्रोल आणि CNG variant बाजारात उपलब्ध होणार आहेत. अद्याप कुठल्याही diesel Variant चा उल्लेख मारुती सुझुकी च्या official data मध्ये आढळत नाही.

मात्र भारतीय बाजारात सध्या EV कार्स ला देखील तुफान मागणी मिळतं असल्या कारणाने मारुती सुझुकी आपल्या नविन new Dzire मध्ये इलेक्ट्रीक variant आणेल का ह्याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. मार्केट सर्वेनुसार आणि एक्सपर्टस च्या माहिती नुसार मारुती सुझुकी येत्या काही काळात New Dzire मध्ये सुध्दा इलेक्ट्रिक variant काढेल असे अंदाज आहेत. नोव्हेंबर 2024 महिन्यात लॉन्च होणार असून. डिसेंबर 2024 पासून बुकिंग सुरू होतील अशी महिती मिळत आहे.

new dzire

Photo credit: https://www.carwale.com 

मारुती सुझुकी Dzire कार नक्कीच भारतीय ग्राहकांच्या पसंतीत उतरलेल्या शंका नाही. ह्युंडाई कंपनीची creta n line ही कार तिच्या आकर्षक फ्रंट ग्रील आणि अट्रॅक्टिव्ह हेडलाईन्समुळे ग्राहकांच्या पसंतीत उतरते. मारुती सुझुकीच्या प्रत्येक गाडीची खासियत म्हणजे मिळणाऱ्या दमदार मायलेज आणि कमी किंमत यामुळे भारतीय ग्राहकांच्या पसंतीत मारुती सुझुकीच्या गाड्या उतरतात. परंतु सेफ्टी पाहता मारुती सुझुकी कंपनीच्या कार्सला ग्राहक नाराजगी व्यक्त करतात. फक्त मायलेज आणि कमी किंमत बघून ग्राहक घेतात परंतु bad क्वालिटी material आणि सेफ्टी याकडे देखील लक्ष दिले गेले पाहिजे असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

Safety साठी मारुती सुझुकी Dzire मध्ये सहा Airbags देखिल देण्यात आल्या आहेत. Dzire मध्ये मिळणारे आरामदायी सीट आणि आकर्षक लूक ग्राहकांच्या आकर्षणाचा भाग ठरेलच. सोबतच जून्या Dzire पेक्षा आतील space हा वाढवण्यात आला आहे. जेने करून प्रवाश्यांना आरामात आणि कंफर्टेबल बसता येईल. ह्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत ज्या new dzire मध्ये पहायला मिळतील. काही न आवडणाऱ्या गोष्टी देखील समोर आल्या आहेत ज्यात steering रिस्पॉन्स आणि handling issue समोर येत आहेत त्याचसोबत ह्या कार ची जी build quality आहे ती ह्याच सेगमेंट मधल्या इतर कार्स च्या तुलनेत कुठेतरी कमी पडते असे देखील कार एक्सपर्टस म्हणत आहेत.

New Dzire किती असेल किंमत आणि मायलेज ??

मारुती सुझुकी Dzire च्या संपूर्ण varint च्या किंमती सध्या पूर्ण पने समोर आल्या नसुन येत्या 11 नोव्हेंबरला ग्राहकांना त्यांच्या सर्व किंमती आणि त्या बद्दल ची माहिती मिळणार आहे. सध्या automobile चे काही एक्सपर्टस आणि नामांकित कार डिटेल्स देणाऱ्या वेबसाइट्स द्वारे मिळालेल्या माहिती नुसार मारुती सुझुकी new Dzire ची किंमत 7 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत असेल. त्याच बरोबर Dzire ही पेट्रोल आणि CNG ह्या दोन Varient मध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या ह्या कार ची कार एक्सपर्टस द्वारे trial आणि टेस्टिंग सुरू आहे. साधारण पने 1.2 लीटर z series च्या engine मध्ये ग्राहकांना 25-35 km/ltr एवढा दमदार millage मायलेज मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मारुती सुझुकी new Dzire कार नक्कीच भारतीय ग्राहकांच्या पसंतीत उतरलेल्या शंका नाही. ह्युंडाई कंपनीची creta n line ही कार तिच्या आकर्षक फ्रंट ग्रील आणि अट्रॅक्टिव्ह हेडलाईन्समुळे ग्राहकांच्या पसंतीत उतरते. मारुती सुझुकीच्या प्रत्येक गाडीची खासियत म्हणजे मिळणाऱ्या दमदार मायलेज आणि कमी किंमत यामुळे भारतीय ग्राहकांच्या पसंतीत मारुती सुझुकीच्या गाड्या उतरतात. परंतु सेफ्टी पाहता मारुती सुझुकी कंपनीच्या कार्सला ग्राहक नाराजगी व्यक्त करतात. फक्त मायलेज आणि कमी किंमत बघून ग्राहक घेतात परंतु bad क्वालिटी material आणि सेफ्टी याकडे देखील लक्ष दिले गेले पाहिजे असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Top 5 Cars under 5 lakhs: सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या या 5 कार तुम्हाला माहिती आहेत का? Best on Road Price

Top 5 Cars under 5 lakhs: सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या या 5 कार तुम्हाला माहिती आहेत का? Best on Road Price

 

Leave a comment