Best Car in India: Maruti Suzuki Vs Toyota कोणती कार घ्यायची..?
Maruti Suzuki Vs Toyota: भारतीय बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वात जास्त विकली जाणारी कार ही मारुती सुझुकी ब्रँड ची आहे. त्याच बरोबर मारुती सुझुकी ला टक्कर देण्यासाठी अनेक वाहन कंपन्या भारतीय बाजारात उतरल्या आहेत. Hyundai, Kia, Skoda, Toyota ह्या विदेशी कंपन्या सध्या बाजारात वाहनांची जोरदार विक्री करत आहेत. त्याच बरोबर भारतीय कंपनी टाटा मोटर्स सुध्दा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या नवनवीन गाड्या ऊपलब्ध करून देत आहे. ग्लोबल Safety ratings मध्ये टाटा मोटर्स च्या सर्वच कार्स ला अव्वल दर्जा मिळतो. मारुती सुझुकी ने सुरवाती पासूनच भारतीय बाजारात स्वस्त दरात कार्स उपलब्ध करून भारतीय बाजारात आपली एक छाप सोडून आणि आपलं नाव केल आहे.
भारतात कार्स कंपनी ला कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सर्वात जास्त टॅक्स भरावा लागतो. Government rules नुसार प्रत्येक कार वर 28% GST भरावा लागतो. त्याच बरोबर Compensation Cess देखील भरावे लागते जे प्रत्येक कार च्या segment नुसार बदलते. Hatchback कार्स साठी भारतात 1200 cc खालील आणि 4 मिटर पेक्षा कमी लांबी वाल्या गाड्यांवर कमी टॅक्स भरावा लागतो. त्याच बरोबर Sedan आणि प्रीमियम SUV कार्स वर 15-25 % पर्यंत Compensation Cess tax भरावा लागतो.
त्याच साठी भारत अनेक car manufacturer कंपन्यांनी दोन कंपन्या एकत्र येऊन गाड्यांचे (Maruti Suzuki Vs Toyota) उत्पादन करून भारतात विक्री करायचे सुरू केले होते. ह्युंडाई कंपनीने किया कंपनीसोबत टाईप करून मॅन्युफॅक्चर सुरुवात केली. तसेच टोयोटा आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki Vs Toyota) सोबत एकत्र येऊन काम सुरू केले. अशा अनेक कंपन्या एकत्र येऊन काम करत आहेत.
(Maruti Suzuki Vs Toyota) मारुती ही भारतीय कंपनी आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL)आणि सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशन (SMC) ह्यांनी एकत्र येऊन एक करार केला होता. 1981 साली ह्या दोन्हीही कंपनी नी एकत्र येऊन सुरावत केली होती. आज भारतीय बाजारात मारुती सुझुकी चे नाव आणि ब्रॅण्ड value नंबर एक वर आहे. त्याच बरोबर टोयोटा मोटर्स कॉर्पोरेशन ही सुद्धा एक जापानी कंपनी आहे.
टोयोटा कंपनी च्या अनेक गाड्या भारतीय बाजारात आणि रस्त्यावर धावताना दिसतात. टोयोटा आणि मारुती सुझुकी ह्या दोन्ही ही ब्रँड्स ने एकत्र येऊन काम करायचे ठरवले होते. 2016 मध्ये टोयोटा आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki Vs Toyota) यांनी हा करार केला होता. टोयोटा च्या नवनवीन डिझाईन आणि रिसर्च अँड डेव्हलमेंट आणि मारुती सुझुकी चे प्रोडक्शन ह्या कॉन्सेप्ट ने दोन्ही ही ब्रँड्स ने काम सुरू केले होते.
Maruti Suzuki Vs Toyota: आज मारुती सुझुकी च्या आणि टोयोटा (Maruti Suzuki Vs Toyota) च्या अनेक गाड्या सारख्याच दिसतात. आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडत असतो, फक्त ब्रॅण्डचा लोगो change करून इतर सर्व गोष्टी सारख्याच दिसतात. आणि किंमतीत सुद्धा उंनिस बिस चा फरक आपल्याला दिसून येतो. (Maruti Suzuki Vs Toyota) सध्या भारतीय बाजारात टोयोटा आणि मारुती सुझुकी च्या जवळपास सारख्या दिसणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. जसे की मारुती सुझुकी ची नुकतीच लॉन्च झालेली fronx टोयोटा कंपनी ची urben cruiser taisor.
ह्या दोन्ही ही कार्स सारख्याच दिसतात. मारुती सुझुकी ची Baleno आणि toyota कंपनीची Glanza. मारुती सुझुकी ची Grand Vitara आणि Toyota ची Urban Cruiser Hyryder. मारुती सुझुकी ची Ertiga आणि toyota ची Rumion. मारुती सुझुकी ची Invicto आणि Toyota ची Innova Hycross.
Video Credit: @Biturbomedia
ह्या सर्व गाड्या दिसायला सारख्याच दिसतात परंतू त्यांची विक्री आणि किंमत ह्यात बराच मोठा अंतर आहे. मारुती सुझुकी ची विक्री आणि खप जास्त असल्या मुळे मारूती सुझुकी च्या कार्स जास्त विकल्या जातात आणि स्वस्त मिळतात. तसेच Toyota (Maruti Suzuki Vs Toyota) ची ब्रॅण्ड value खुप चांगली असून Toyota च्या Fortuner आणि Innova Crysta ह्या कार्स ने त्यांची ब्रॅण्ड value वाढवली आहे. म्हणून थोडी जास्त किंमत मोजून लोकं मारुती सुझुकी ची कार न घेता टोयोटा ची कार घेण्यासाठी पसंती देतात.
काय आहे फरक Grand Vitara Vs Hyryder ? किती आहे किंमत..??
मारूती सुझुकी grand vitara आणि toyota urban cruiser Hyryder या दोन्ही गाड्या (Maruti Suzuki Vs Toyota) एकाच युनिट मध्ये तयार होतात. ह्या दोन्ही कार्स चे इंजिन हे 1462 CC, 4 Cylinder inline, 4 Valves/Cylinder, DOHC ने बनलेले आहे. त्यांनतर फरक येतो तो टेकनोलॉजीचा Toyota Hyryder मध्ये आपल्या 1.5 L K e-Drive Hybrid इंजन मिळते आणि Grand Vitara मध्ये K15C + Mild Hybrid System इंजिन मिळते. ह्यामुळे गाडीच्या मायलेज मध्ये फरक पाडतो. टोयोटा Hyryder ही कार मायलेज च्या बाबतीत Grand Vitara ला मागे टाकते. Power आणि Torque बद्दल सांगायचं झाल तर toyota Hyryder आणि Maruti Suzuki Grand Vitara दोन्हीं कार्स मध्ये सारखाच Torque आणि power मिळते.
Max Power (bhp@rpm):
102 bhp@ 6000 rpm
Max Torque (Nm@rpm):
136.8 Nm@4400 rpm
Toyota Hyryder vs Maruti Suzuki Grand Vitara दोन्ही कार्स मध्ये BS6 phase 2 इंजिन आहे. ज्यात आपल्याला फुल tank मध्ये 950 km ची range मिळते.
Toyota Hyryder ची किंमत ही Maruti Suzuki Grand Vitara च्या तुलनेत जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे काही advanced features.
1. Emergency Break Light Flashing: Toyota Hyryder – Not available, Grand Vitara – Available
2. Traction control system: TC/TCS-
TOYOTA HYRYDER: available
Grand vitara : Not available
3. Ride height adjustment: Toyota Hyryder: Yes Grand vitara: Not
4. GPS navigation inbuilt system: Toyota Hyryder: Yes Grand vitara: No
5. Manufacturing warranty: Toyota Hyryder: 3 years 100000 km Grand vitara: 2 years 40000 km
6. Color options: Toyota Hyryder: 7 colour options, Grand Vitara: 4 colour options
7. कार ची किंमत : Toyota Hyryder: Starting from 19 लाख रुपये. Grand Vitara: starting from 10.96 लाख रुपये.
मारूती सुझुकी Baleno Vs टोयोटा Glanza ?? किती आहे मायलेज आणि किंमत.. ??
मारुती सुझुकी Baleno आणि Toyota Glanza ह्या दोन्ही कार दिसायला जरी सारख्या असतील परंतु त्यांच्या किंमतीत, मायलेज मध्ये आणि फिचर्स मध्ये बराच फरक आहे. जर तुम्ही दोन्हीही कार मध्ये (Maruti Suzuki Vs Toyota) कुठली कार सिलेक्ट करावी यात कन्फ्युज असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा तुम्हाला नक्कीच उत्तम माहिती मिळेल. Toyota Glanza ही कार Maruti Suzuki Baleno पेक्षा नक्कीच उत्कृष्ठ आहे. जर तुम्ही तुमच्या बजेट मध्ये कुठेही तळजोड करू शकणार असाल तर तुम्ही नक्कीच टोयोटा Glanza ह्या कार ला पहिले प्राधान्य द्यायला हरकत नाही.
काय आहे किंमत किती आहे फरक मायलेज आणि परफॉर्मन्स मध्ये जाणून घेऊया. Toyota Glanza ची किंमत ही Maruti Suzuki Baleno च्या तुलनेत जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे काही advanced features आणि मायलेज. दोन्हीं ही कार्स चे इंजिन हे एकाच युनिट मध्ये बनते म्हणून इंजिन मध्ये दोन्ही ही कार्स चा परफॉर्मन्स सारखाच मिळतो.
BS6 Phase2, 1.2 लीटर चे VVT, 1197 Cc 4 सिलिंडर inline, 4 Valves/ Cylinder, DOHC engine बघायला मिळते. 113 NM@4400 एवढा TORQUE निर्माण करते.
1. Traction control system: TC/TCS-
TOYOTA Glanza: Yes
Suzuki Baleno: No
2. Average Fuel Consumption:
TOYOTA Glanza : Yes
Maruti Suzuki Baleno : No
3. Low Fuel Warning:
TOYOTA Glanza : Yes
Maruti Suzuki Baleno : No
4. Techometer:
TOYOTA Glanza : Analog
Maruti Baleno: Analog
5. Warranty in Year/Km:
TOYOTA Glanza : 3 years 100000 km
Maruti Suzuki Baleno : 2 year 40000 km
6. Colour options:
TOYOTA Glanza : 5
Maruti Suzuki Baleno : 7
7. Price starting from:
TOYOTA Glanza : 8.02 लाखा पासून सुरू.
Maruti Suzuki Baleno : 7.74 लाखा पासून सुरू.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.