Lalbaugcha Raja: 16 कोटी 20 कीलो सोन्याचा मुकुट!! लालबागचा राजाला अंबानी दांपत्या कडून भेट!! यंदा Lalbaugcha Raja ला काशी विश्वेश्वराची थीम! Most Expensive Gift…

यंदा लालबागचा राजाला काशी विश्वेश्वराची थीम!

Lalbaugcha Raja: सध्या मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात जनतेला ओढ लागली आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. गणपती बाप्पा म्हटलं की मुंबई सह संपूर्ण राज्यात त्याच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळते. त्यातूनच मुंबईचा गणेश उत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात भव्य बाप्पाच्या भव्य मुर्त्या वेगवेगळ्या रूपात अनोख्या सजावटी आणि त्या सजावटी बघण्यासाठी जमलेली भाविकांची गर्दी. अशातच 5 सप्टेंबर 2024 रोजी नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखला जाणारा गणपती म्हणजेच लालबागचा राजा. लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन सोहळा (First Look) 5 सप्टेंबर 2024 रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लालबागचा राजाचा या वर्षाची थीम आहे काशीच्या विश्वेश्वराची!

लालबागचा राजा आणि नितीन देसाई!

मुंबईमधील लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) मंडळाची जोरदार तयारी चालू आहे. पण अशातच मंडळाला खरी उणीव भासत आहे ती म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध दिवंगत दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची. नितीन देसाई है ओळखले जातात कला दिग्दर्शक व उत्कृष्ट कलाकार म्हणून.

मागच्या वर्षी नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या एन डी स्टुडिओ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आपल्या समोर आली होती. तब्बल 16 वर्षांपासून नितीन देसाई हे लालबागचा राजा मंडळाचे जोडले गेले होते. फक्त लालबागचा राजाची सजावटच नाही तर नितीन देसाई यांची राजावर खूप श्रद्धा होती. म्हणूनच त्यांना श्रद्धांजली म्हणून एन डी स्टुडिओ तले हत्ती लालबागच्या राजाच्या दारावर उभे करण्यात आले आहेत.

लालबागचा राजा ! Lalbaugcha Raja First Look ambani gift

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लालबागचा राजा मंडळाचे माननीय सचिव सुधीर साळवी यांनी यांच्या आठवणी जागा करत असे वक्तव्य केले आहे मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचे मन भरून आले. नितीन देसाईन बद्दल बोलताना ते असे म्हणाले की,”राजा श्री शिव छत्रपती 350 वर्ष राज्याभिषेकाला झाली ते अतिशय हुबे हुब त्यांनी ती मेघडमरी साकारली होती. त्यापूर्वी देखील शिषमल साकारला होता, चांद्रयानाचा देखावा, त्यानंतर पर्यावरण देखावे, अतिशय कलात्मक असे टिकावे आणि त्यांच्या ज्या काही आयडियाज होत्या त्या भन्नाट अशा आयडिया असायच्या.”

पुढे ते असे म्हणाले की ,”पंधरा-सोळा वर्षांपूर्वी ते आले होते, हातात एक पेन आणि कोरा पेपर त्यांचा हातात घेऊन ते आले होते. एक कला दिग्दर्शक काय असतो हे त्यांना बघून समजले. एक पेन्सिल घेऊन दोन फुटाची सरळ लाईन त्यांनी माझ्या समोर ओडली होती. मी आवाक होतो की दिग्दर्शक आणि कलाकार कसा असावा. नितीन देसाई एक ओरिजनल कलाकार होते”

अंबानी दांपत्या कडून २० कीलो सोन्याचा मुकुट भेट!

जसजशी गणेश चतुर्थी जवळ येत आहे मुंबईकरांसह राज्यातील सगळ्याच भाविकांची आतुरता वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईच्या लालबागचा राजाचा प्रथम दर्शन कालच आपलं सर्वांना पाहायला मिळाले. डोळे दीपवणारे ते लालबागच्या राजाचे रूप बघत असतानाच लक्ष जातं ते राजाच्या शिरावर विराजमान असणाऱ्या भव्य 20 किलोच्या मुकुटाकडे. मुंबईमध्ये गणेशोत्सवा दरम्यान सर्वात जास्त गर्दी गणपतीला होत असेल तर ती म्हणजे लालबागचा राजाला.

Video Credit: @myradiocityindia

मोठमोठ्या राजकीय नेत्यांसह सुपरस्टार उद्योगपती आणि इतर क्षेत्रातले नावाजलेल्या लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. यावर्षी लालबागच्या राजाची थीम आहे काशीच्या विश्वेश्वराचे त्यातूनच अशी बातमी समोर आली आहे की लालबागचा राजाचा मुकुट वीस किलो सोन्याचा असून तो अंबानी कुटुंबाने भेट दिलेला आहे. 20 किलोच्या मुकुटाची किंमत सुमारे 16 कोटी इतकी सांगण्यात येत आहे.

यावर्षी लालबागच्या राजाची थीम आहे काशीच्या विश्वेश्वराचे त्यातूनच अशी बातमी समोर आली आहे की लालबागचा राजाचा मुकुट वीस किलो सोन्याचा असून तो अंबानी (Ambani Group) कुटुंबाने भेट दिलेला आहे. लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन 5 सप्टेंबर 2024 रोजी झाला असून राजाच मनमोहक रूप, शिरावर होण्याचा मुकुट आणि मरून रंगाचं गडद लाल रंगाचे धोतर आणि आनंदाने भुरळ पाडणरे मुख पाहून भाविकांना अगदी तृप्त झाल्यास सारखे वाटले. 20 किलोच्या मुकुटाची किंमत सुमारे 16 कोटी इतकी सांगण्यात येत आहे.

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा दर्शनाची वेळापत्रक

दर्शनाची वेळ 5:00 AM – 11:00 PM
सकाळची पूजा 6:00 AM – 7:00 AM
दुपारची पूजा 1:00 PM – 2:00 PM
संध्याकाळची पूजा 7:00 PM – 8:00 PM
सकाळची आरती 7:00 AM – 7:15 AM
दुपारची आरती 1:00 PM-1:15 PM
संध्याकाळची आरती 7:00 PM – 7:15 PM

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Vande Bharat Express | रेल्वे प्रवास आता अजून वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार. Super Fast Train

Vande Bharat Express | रेल्वे प्रवास आता अजून वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार! #1 Super Fast Train

Leave a comment