Bigg Boss Marathi Season 5: फक्त 70 दिवसात बिग बॉस मराठी सीजन 5 घेणार प्रेक्षकांचा निरोप ! Gashmeer Mahajani बिग बॉसच्या घरात! Great Grand Finale!

Bigg Boss Marathi Season 5: फक्त 70 दिवसात बिग बॉस मराठी सीजन 5 घेणार प्रेक्षकांचा निरोप !

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी चा सीझन 5 हा लवकरच निरोप घेणार आहे. बिग बॉस चा खेळ हा शंभर दिवसाचा असतो आणि ह्या घरात येणारे सदस्य सुध्दा ह्या प्रमाणेच शंभर दिवसाची तयारी करून येतात परंतु बिग बॉस मराठी चा हा सीझन खूप जास्त चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एपिसोड मध्ये बिग बॉस यांनी हा खेळ फक्त सत्तर दिवसात संपणार आहे. त्यामुळे ह्या आठवडयात बिग बॉस ने घरातली उरलेल्या आठ ही सदस्यांना नॉमिनेशन साठी थेट नोमिनेट केले आहे.

बिग बॉस मराठी सीजन 5 चा हा सीझन शेवटच्या आठवडयात येऊन पोहचला आहे. फक्त 70 दिवसांच्या ह्या खेळात आपल्याला बरेच ट्विस्ट बघायला मिळाले होते. ऐकी कडे रितेश देशमुख हा देखील गेल्या दोन आठवड्यांपासून भाऊच्या धक्क्यावर वर दिसत नाही आणि मागच्या च आठवडयात बीग बॉसच्या टीम ने देखिल घोषणा केली की हा सीझन शंभर नाही तर फक्त सत्तर दिवसांचा होणार आहे. ह्या मुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग होत आहेत. सुरवातीला सोशल मीडियावर बीग बॉसच्या टीम ने आणि कलर्स मराठी वाहिनीने हे जाहीर केले होते की हा सीझन सर्वांत जास्त पसंतीचा ठरला आहे आणि काही दिवसातच बिग बॉस बंद होणारं आशी बातमी समोर येते ह्या गोष्टीवर प्रेक्षकांनी बरेच तर्क लावण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही हे गूढ उलगडले नाही.

Gashmeer Mahajani: गश्मिर महाजनी आणि प्राजक्ता माळी बीग बॉसच्या घरात!

Gashmeer Mahajani: गश्मिर महाजनी आणि प्राजक्ता माळी हे दोघेही बिग बॉस मराठी च्या सदस्यांना भेट द्यायला आले होते. कारण गश्मिर महाजनी (Gashmeer Mahajani) आणि प्राजक्ता माळी यांचा फुलवंती नावाचा चित्रपट ऑक्टोंबर मध्ये प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी हे दोघे ही बिग बॉस मराठी च्या घरात आले होते. दरम्यान डॉ. निलेश साबळे सध्या बिग बॉस मराठी ची होस्टिंग सांभाळताना आपल्या दिसत आहेत. गाश्मिर आणि प्राजक्ता ह्यांनी केला डान्स आणि सोबतच Bigg Boss Marathi Season 5 बीग बॉस मराठी च्या घरातील सदस्यांचे मनोरंजन.

त्याच बरोबर गश्मिर महाजनी (Gashmeer Mahajani) आणि प्राजक्ता यांनी बिग बॉस मराठी च्या घरातील सदस्यानं सोबत डान्स चा टास्क देखिल खेळला ज्यात घरातली एका सदस्याला बोलवून एक ठोकळा फेकायचा आणि ठोकळ्यावर लिहिलेला डान्स फॉर्म प्रेक्षकांना समोर सादर करायचा. ह्यात गश्मिर महाजनी (Gashmeer Mahajani) आणि प्राजक्ता ह्यांनी खूपच उत्तम नृत्य केलं आणि सोबतच सगळ्यांना आपल्या डान्स च्या ठुमक्यावर नाचायला लावले.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला मराठी चित्रपट “पाणी” हा देखील पुढच्या आठवडयात प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी ह्या सिनेमा चे निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठरे आणि अभिनेता सुबोध भावे हे बिग बॉस मराठी च्या घरात आले होते. त्यांनी देखील बिग बॉस च्या घरातील सदस्यानं बरोबर धिंगाणा केला.

त्याच बरोबर सुबोध भावे यांनी सुरज चव्हाण याच्या स्टाईल मध्ये त्याचे डायलॉग बोलुन दाखवले. तसेच बिग बॉस ने सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कडे एक सरप्राइज पाठवले होते ज्यात घरातील सदस्यांना त्यांना आवडणाऱ्या वस्तू मिळणार होत्या त्या साठी दोन ग्रुप मध्ये विभाजनी करून प्रत्येक ग्रुप मधील एक सदस्य असे दोघे मिळून ते बिग बॉस च्या घरात लपवलेले suprise कार्ड शोधायचे होते. ह्या वेळी सध्याचे कार्यक्रमाचे संचालक डॉ. निलेश साबळे यांनी देखील मार्गदर्शन केले.

फक्त 70 दिवसात बिग बॉस मराठी सीजन 5 बंद मागचे बरेच कारण समोर  !

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीचा हा सीझन नक्कीच गाजला आहे. सोशल मीडिया influencers आणि मराठी इंडस्ट्रीतले नावाजलेले कलाकार ह्यांनी हा सीझन चांगलाच रंगत दार बनवला आहे. परंतु हे सगळं असताना आता बीग बॉस मराठी आपल्या प्रेक्षकांची रजा घेणार आहे. बीग बॉस बंद होण्या मागचे बरेच कारण असू शकतात असे समजले जात आहे. कलर्स मराठी वाहिनी वर येणाऱ्या 2 नवीन मालिका. त्याच बरोबर बिग बॉस हिंदी जो colors हिंदी चॅनेल वर येत्या 8 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. ह्या संदर्भात अजून कुठलेच स्पष्टीकरण चॅनेल किंवा बिग बॉस मराठी च्या टीम ने दिले नाहीये.

बिग बॉस मराठी शो बंद होणार म्हणून सोशल मीडियावर प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी च्या निर्मात्यांना सवाल केला आहे. जर शो ला टीआरपी मिळतं आहे शो नंबर एक ला असताना शो बंद करण कितपत योग्य आहे. आत्ता कुठे जाऊन प्रेक्षकांना बिग बॉस च्या घरातील सदस्यांना ओळखण्याचा आणि त्यांचा गेम बघायला मिळतं होता आणि लगेचच शो बंद होणारं आहे ही बातमी येताच प्रेक्षक नाराज झाले आहेत हे प्रेक्षकांच्या भावनांशी खेळण्यात आले आहे असे देखील सोशल मीडियावर प्रश्न नेटकरी विचारत आहेत. त्याचं बरोबर रितेश देशमुखच भाऊच्या धक्क्यावर गैरहजर असणं हे देखील प्रेक्षकांना खटकल होत. यामागचे बरेच कारण असतील ह्या संदर्भात कोणी काही ही स्पष्ट वक्तव्य केलं नाही.

कलर्स मराठी चे चॅनेल हेड केदार शिंदे यांनी सुद्धा ह्या विषयावर कुठलाही खुलासा केला नाही. येत्या रविवारी 6 ऑक्टोबर ला बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले होणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुख लावणार महाअंतिम फेरीत हजेरी !

Bigg Boss Marathi Season 5 बिग बॉस मराठी सीजन 5 हा भरपूर ट्विस्ट आणि सस्पेन्स ने भरलेला होता. बिग बॉस मराठी चा हा सीझन घरातील सदस्यानं बरोबरच होस्ट रितेश देशमुख मुळे सुद्धा चर्चेत होता. रितेश देशमुखने हा सीझन त्यांच्या स्टाईल ने गाजवला त्यांची सर्वत्र चर्चा झाली आणि त्याचबरोबर रितेश देशमुख ला ट्रोल देखील कऱण्यात आले. गेल्या दोन अठवड्यांपासून रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर दिसले नाहीत.

त्यांच्या गैरहजेरीचे कारण काय हे अजून देखील प्रेक्षकांना समजलेले नाही. डॉ. निलेश साबळे हे सध्या भाऊच्या धक्क्यावर संचालक म्हणून दिसत आहेत. ह्या दरम्यान बिग बॉस च्या घरातील सदस्य nominate झाले आणि घराबाहेर देखील झाले. अरबाज पटेल आणि पंढरीनाथ कांबळे हे ह्या गेल्या आठवडयात बाहेर पडले.सध्या बिग बॉस मराठी च्या घरात आता 7 सदस्य उरले आहेत जे शेवटच्या आठवडयात गेले आहेत. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर हे सध्या बिग बॉस च्या घरात टिकून आहेत. प्रेक्षकांच्या मत कमी मिळाल्या मुळे पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर गेले.

Also read: https://www.lokmat.com/filmy/television/riteish-deshmukh-bigg-boss-marathi-season-5-grand-finale-and-salman-khan-hindi-bigg-boss-18-grand-premiere-date-clash-a-a988/

पंढरीनाथ कांबळे घराबाहेर पडताना अंकिता वालावलकर हीला भारावून आले. सुरज चव्हाण ला जाता जाता पॅडी भाऊंनी प्रोत्साहन दिले. आता शेवटच्या आठवडयात कोण जिंकेल ट्रॉफी ह्या कडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. मागील आठवडयात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात एका एक्सेल शीट मध्ये बिग बॉस मराठीचा winner अभिजीत सावंत आहे अस लिहिण्यात आले आहे दुसऱ्या नंबर वर निक्की तांबोळी आणि सुरज हा तिसऱ्या स्थानावर दिसतं आहे. सध्या ही पोस्ट जोरात व्हायरल होत आहे.

सध्या पंढरीनाथ कांबळे ह्यांचा गेम खूपच चांगला दिसत होता परंतु शेवटच्या आठवडयात जाण्याआधी एक स्पर्धक घराबाहेर पडणार होता त्यात सुरज चव्हाण याला सर्वाधिक मत मिळाले आहेत त्याच बरोबर निक्की, अभिजीत आणि वर्षा उसगावकर यांना सर्वाधिक मत मिळून हे सदस्य सुरक्षित झाले. डॉ. निलेश साबळे यांनी सांगितले रितेश कधी येणार ह्या बद्दल. येत्या 6 ऑक्टोबर ला बिग बॉस मराठी चा सीझन 5 चा ग्रँड फिनाले अंतिम फेरी होणार आहे. ह्या कार्यक्रमात रितेश देशमुख आपल्याला दिसणार आहेत हे निलेश साबळे यांनी सर्व सदस्यांना सांगितले.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Ford Endeavour | Toyota Fortuner ला टक्कर द्यायला येतं आहे.. किंमत फक्त 35 लाख! Powerful Bi Turbo Engine सह..!

Ford Endeavour | Toyota Fortuner ला टक्कर द्यायला येतं आहे.. किंमत फक्त 35 लाख! Powerful Bi Turbo Engine सह..!

 

Leave a comment