दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंचा सुपडा साफ करत.. कांगारूनी केली बरोबरी.!
Ind vs Aus 2nd Test: भारतीय संघाने पहिला सामना जिंकून उदो उदो केला परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय क्रिकेट संघाचा फक्त 3 दिवसात सुपडा साफ केला आहे. हा सामना आता पर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी दिवस खेळला गेलेला कसोटी सामना आहे. फक्त 4 डावात एकूण 1031 चेंडू मध्ये हा कसोटी सामना संपला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली होती परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात मागील सामन्यात मिळालेल्या पराभवाची परत फेड करण्यासाठी ऑस्ट्रिलीयाच्या संघाने अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून भारतीय संघाला नेस्तनाबूत केले आहे.
Ind vs Aus 2nd Test भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया मधील दुसरा कसोटी सामान हा ॲडलेड येथील ओव्हल नावाच्या मैदानावर खेळला गेला. ह्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने आपले 10 गडी राखून भारतीय संघाचा दाबून पराभव केला आहे. हा पराभव अतिशय लाजिरवाणा आहे. आता पर्यंतच्या इतिहासात कधी ही न मिळालेला पराभव बघायला मिळाला आहे. या पराभवामुळे भारतीय प्रेक्षक ज्यांना क्रिकेट च वेड आहे ते अतिशय नाराज आहेत.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमाराह याने केले होते. Ind vs Aus 2nd Test मात्र दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्मा हा परत आला आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्मा याने नेतृत्व केले. या कारणामुळे देखील भारतीय क्रिकेट फॅन्स नी नाराजी व्यक्त केली आहे. कर्णधार रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आधीच 3 सामने गमावून बसला आहे. त्यातच आता सलग हा चौथा सामना रोहित शर्मा च्या नेतृत्वा खाली पराभव स्वीकारावा लागला आहे.
Video Credit: @ABCricinfo
दुसऱ्या कसोटी सामन्यात नेमके काय घडले..??
Ind vs Aus 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात मध्ये कांगारूंनी भारतीय संघाचा धुव्वा उडविला..! फक्त ३ दिवसात सामना संपवला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया च्या संघाने कसोटी सामन्यांमधील आता पर्यंतच्या सर्वात मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. हा सामना आता पर्यंतच्या इतिहासात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वात कमी दिवस चाललेला कसोटी सामना होता. अवघ्या ३ दिवसातच आणि फक्त १०३१ चेंडूमध्ये सामना संपवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने BGT बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये भारताची बरोबरी केली आहे.
Ind vs Aus 2nd Test: पहिल्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाने ४४.१ षटकांमध्ये १८० धावा पर्यंत पोहचू दिले. त्या नंतर दुसऱ्या डावात फक्त ३६.५ षटकांमध्ये भारतीय संघाला १७५ धावा बनवून माघारी पाठवले. या दोन्हीही डावांमध्ये भारतीय संघाने केवळ 486 चेंडूंना सामोरे गेले. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्याच डावात 525 चेंडूंचा सामना करीत 337 धावांचे लक्ष गाठले. तर त्याचबरोबर दुसऱ्या गावात ऑस्ट्रेलिया संघाने केवळ २० चेंडूतच खेळ संपवला आणि ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी च्या दुसऱ्या कसोटी Ind vs Aus 2nd Test सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने भारताला पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या कामगिरी वरून समोर पराभव पक्का असल्याने भारतीय संघाने पराभव स्वीकारून ऑस्ट्रेलिया संघाला विजयी घोषित केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात आपली जादू दाखवली आहे. पाहिल्या डावात भारतीय संघाला १८० तर दुसऱ्या डावात फक्त १७५ धावांवर माघारी पाठवले आहे. भारतीय फलंदाजांची फळी या सामान्य काहीच जादू दाखवू शकली नाही.
या सामान्यत रोहित शर्मा नेतृत्व करत आहे. सलग चौथ्यांदा कसोटी सामन्यांत अतिशय वाईट पराभव भारतीय संघाला सामोर जावे लागले आहे. ५ पैकी २ सामन्यांत Ind vs Aus 2nd Test आता दोन्हीही संघांची बरोबरी झाली आहे. उरलेल्या ३ सामन्यांत आता भारतीय संघ काय करेल या कडे लक्ष लागून आहे. पाहिल्या सामन्यांत अतिषय उत्कृष्ठ कामगिरी करून भारताने विजय मिळवला होता. भारतीय संघाला येणाऱ्या सामन्यांमध्ये आपली उत्कृष कामगिरी दाखवावी लागेल त्याशिवाय कसोटी सामना जिंकणे आणि ट्रॉफी उचलणे अशक्य आहे. भारतीय गोलंदाज आपली जादुई कामगिरी करून पुढील सामाना आणि ट्रॉफी आपल्या भारतात आणतील अशी आशा भारतीय क्रिकेट प्रेक्षकांकडून केली जात आहे.
Aus चा कर्णधार आणि fast गोलंदाज Pat Cummins याने दुसऱ्या कसोटी सामान्यत ५ गडी घेतले आहेत. आर आश्विन, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या तिन्ही फलंदाजांना Pat Cummins याने आपल्या शॉर्ट बॉल वर चालते केले. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात कर्णधार Pat Cummins याने बाउन्सर मारत भारतीय फलंदाजांना चक्रावून सोडले.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.