Royal Enfield Hunter 350: तुम्ही लदाखला हंटर 350 घेऊन जाऊ शकता का??? Most Strong and affordable

Royal Enfield Hunter 350: सर्वात कमी किमतीतील गाडी ?

Royal Enfield Hunter 350: हंटर रॉयल एनफिल्ड तयार केलेली सर्वात कमी किमतीतील गाडी आहे. ही गाडी त्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनवली आहे. ज्यांनी यापूर्वी कधीही रॉयल एनफिल्ड ची खत कुठली बाईक खरेदी केली नाही. आणि ज्या ग्राहकांना क्लासिक किंवा बुलेट घेणे भीतीदायक वाटते त्यांच्यासाठी या गाडीची डिझाइनिंग करण्यात आली आहे. तसं बघायला गेले तर हंटर 350 मध्ये सुद्धा तेच इंजिन वापरण्यात आले आहे जे न्यू क्लासिक 350 आणि बुलेट 350 मध्ये आहे. परंतु या गाड्यांपेक्षा हंटर 350 आकाराने कॉम्पॅक्ट गाडी आहे.

Royal Enfield Hunter 350 | Features आणि प्रमुख वैशिष्ट्ये

प्रमुख वैशिष्ट्ये

  • Engine
349.34 cc
  • Power
20.4 Ps
  • Torque
 27 Nm
  • Mileage
36.2 Kmpl
  • Kerb Weight
177 Kg
  • Brake
Disc

शीर्ष वैशिष्ट्ये

  • ABS Single Channel
  • Navigation
  • Service Due Indicator
  • LED Tail Light
  • Speedometer Analogue
  • Odometer Digital
  • Tripmeter Digital
  • Fuel gauge
  • Tachometer Digital

Royal Enfield हंटर 350 ग्राहकांची प्रतिक्रिया

सर्वप्रथम माझ्याकडे यापूर्वी कधीही रॉयल एनफिल्ड ही गाडी नव्हती म्हणून जेव्हा मी रेट्रोशैलीतील बाईक खरेदी करण्याचा विचार केला तेव्हा मी तीन बाईक्स फायनल केले. Royal Enfield Hunter 350,  क्लासिक 350 आणि टीव्हीएस रोनिन. मी सर्व तीन बाइकचे टेस्ट राईट घेतल्या आणि मला क्लासिक जरा जड वाटली कारण मी बहुतेक वेळा शहरांमध्ये बाईक चालवतो त्यामुळे कुठली शंका नाही ठेवता मी क्लासिक क्रिकेट टी ला बाजूला केले.

त्यानंतर मी खरंच टीव्हीएस रॉनी च्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आणि 100% पैसा वसूल गाडी म्हणून तीच गाडी घ्यायची असा ठाम निर्णय घेतला. पण टीव्हीएस रॉनींची ब्रँड व्हॅल्यू कमी असल्यामुळे तिला भविष्यात पुन्हा विकणे मला जड गेले असते म्हणून मी फक्त तेवढ्या कारणाने ही गाडी घेतली नाही. हेच कारण होते की मी हंटर 350 घ्यायचा विचार केला आणि टेस्ट ड्राईव्ह नंतर असे लक्षात आले की ही गाडी चालवणे देखील सोपे जाईल.

Royal Enfield Hunter 350 price, specs and review

Telegram Group Join Now

काही लोकांनी सांगितले की ही बाईक पाच तीन ते पाच सात उंचीच्या मुलांसाठी योग्य आहे. माझी उंची पाच 11 असून सुद्धा मला ही गाडी चालवण्यात कोणतीच अडचण वाटली नाही आणि ही बाईक माझ्यासाठी खरोखरच योग्य ठरली. हंटर 350 (Hunter 350) चालवताना पाय दुखणे किंवा क्रम सेने अशी कुठलीही प्रकार घडत नाहीत त्यामुळे हंटर चालवण्याचा माझा अनुभव मी सर्वांसोबत शेअर करायचा ठरवलं.

मायलेज विषयी बोललं तर पहिल्या सर्विसिंग च्या आधी जवळपास 29 30 चा मायलेज गाडी देत होते. पहिलं सर्विसिंग नंतर जवळपास 33 चा एवरेज गाडी देऊ लागली. गाडीचे 350 सीसी चे इंजिन अगदी स्मूद चालते. तर चौथ्याच गेअर मध्ये जो गाडी पिकप देते तो या गाडीचा wow फॅक्टर ठरतो. पहिल्या दोन गियर मध्ये गाडीच्या एक्झॉस्टचा आवाज सुद्धा खूपच चांगला आहे आणि टॉप गियर मध्ये देखील तितकाच उत्कृष्ट आवाज गाडी देते. पण क्लासिक चा जो डुबडुक चा आवाज आहे तो कुठेतरी या गाडीमध्ये आपण मिस करतो. तरीदेखील या गाडीच्या खरेदीने संपूर्ण संतुष्ट आहे आणि माझी कोणतीही तक्रार नाही.

आता वळूया ॲक्सेसरीज कडे. मला सगळ्यात मोठी समस्या वाटली ती म्हणजे महिलांकरिता दिलेला फूट रेस्ट. जेव्हा पण माझी आई किंवा घरातील वृद्ध बाईकवर साडी नेसून बसते तर ऑफिशिअली तिथे कुठलाच फूडरेस्ट उपलब्ध करून दिलेला नाहीये. एवढेच काय तर कुठला थर्ड पार्टी फूड प्रेस सुद्धा मला शोधून देखील सापडला नाही. शेवटी मी इतर मार्गाने या समस्येचे समाधान शोधले.

अजून एक समस्या वाटली ती म्हणजे सस्पेन्शनची. एक रायडर म्हणून मला सस्पेन्सशनचा इतका त्रास जाणवत नाही परंतु म्हणाले की त्यांना स्पीड ब्रेकर्स चा दणका जाणवतो. सीट मऊ असली तरी सुद्धा मला ब्रेकिंग सिस्टम खूप भावली. ब्रेकिंग रिस्पॉन्सिव्ह आहे पण क्लच थोडा हार्ड वाटतो विशेषता जेव्हा आपण ट्राफिक मध्ये अनेक वेळा त्याचा वापर करतो तेव्हा बोटांना क्रॅम्पिंग सुरू होते. हे व्यक्तिगत मध असून प्रत्येक चालवणाऱ्या रायडरवर डिपेंड करते. टायर्स आणि ग्रुप विषयी बोलायचं तर ते सुद्धा बऱ्यापैकी चांगले आहेत. ही एक स्पोर्ट्स बाईक नाही तरीसुद्धा वळणांवर लीन करताना बऱ्यापैकी ग्रिप मिळते.

हेडलाईट सुद्धा रात्रीच्या वेळी प्रवास करताना उत्तम ठरतात. तसेच गाडीचे इंडिकेटर सुद्धा चांगले काम करतात. मी असे ऐकले आहे की लोक इंजिन गरम होण्याच्या समस्येबद्दल तक्रार करतात परंतु मला अशी कुठलीही समस्या जाणवली नाही. तसे बघायला गेले तर थोडीशी उष्णता प्रत्येक बाईकवर सामान्य मानली जाते. मी बऱ्याचदा लोकांना फायबर च्या भागांबद्दल तक्रार करताना पाहिले आहे आणि हंटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या पॅरनल बद्दल सुद्धा लोकांना तक्रार करताना ऐकले आहे. परंतु रेट्रोवेरिएंट 149K हजारापासून चालू होते आणि मेट्रो 163K हजाराला चालू होते.

तर खरंच तुम्हाला या किमतीमध्ये फायबर पार्ट बद्दल तक्रार करावीशी वाटते का? तसे बघायला गेले तर दीड लाखात 350cc चे इंजिन हे मला फारच फायदेशीर आणि चांगले वाटते. खरंच सांगा इतक्या कमी किमतीत होंडा हायनेस, मेटिओर , क्लासिक यासारख्या गाड्यांची तुलना करणे कितपत योग्य वाटते. त्या बाईकची किंमत या गाडीपेक्षा तब्बल पन्नास हजाराने जास्त आहे. सर्वसामान्यांना ही गाडी परवडावी हीच प्राथमिकता ठेवून या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे. मला असे वाटते की रॉयल रॉयल एनफिल्ड ने फारच चांगले काम केली आहे आणि एक चांगली बाईक आपल्या समोर आणली आहे.

FAQs (Frequently Asked Questions)

हंटर 350 रोजच्या वापरासाठी चांगली आहे का?

संपूर्णतः परफेक्ट नसली तरी सुद्धा हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) ची ताकद अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड ब्रँडच्या चाहत्यांना मोहन टाकते आणि क्लासिक मोटरसायकलच्या दुनियेत नवीन ग्राहकांना नक्कीच आकर्षित करते. ही बाईक पुरेशी मजबूत आणि दिसायला सुद्धा चांगली आहे. शहरातील लांब राइट्स आणि भयंकर ट्राफिक मध्ये सुद्धा ही बाईक आरामदायी ठरते.

Video credit: @CLASSICGEARS

हंटर 350 हिट की फ्लॉप?

हंटर 350 ची बिल्ड क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे. पहिल्याच वर्षी 2 लाख बाईकस विकल्या गेल्या ज्यावरून लक्षात येते की हंटर 350 थस्टशीत हिट बाईक ठरली आहे.

हंटर 350 चा टॉप स्पीड काय आहे?

हंटर 350 चा टॉप स्पीड 114 kmph (किलोमीटर पर आवर) असा आहे. या बाईक मध्ये ३५० cc सिंगल सिलेंडर, जे-सिरीज इंजिन आहे जे 20.2 ब्रेक हॉर्स पावर (bhp) निर्माण करते हे सुद्धा 6,100 रेवोल्युशनस पर मिनिट (rpm) आणि 27 न्यूटन मीटर्स (nm) चा पीक टॉर्क निर्माण करते. या बाईक मध्ये फाय स्पीड गिअरबॉक्स आहे.

मी लदाखला हंटर 350 घेऊन जाऊ शकतो का?

हा एक व्यक्तिगत प्रश्न आहे, तरीदेखील कमीत कमी कंपनामुळे आणि मजबूत इंजिन असल्याकारणाने नक्कीच ही बाईक लॉंग राईड साठी सुद्धा वापरण्यात येऊ शकते.

हंटर किंवा क्लासिक कोणती आहे सर्वोत्तम?

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ची एक्स शोरूम किंमत ₹ 1,99,499 आहे आणि रॉयल एनफिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) ची किंमत ₹ 1,49,900 आहे. क्लासिक 350 दोन रंग आणि पाच वेरीएंट्स मध्ये उपलब्ध आहे तर रॉयल फिल्ड हंटर 350 एक रंग आणि तीन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे. किंमत सोडून इतरही गोष्टींवरून आपण या बाईक्सचे कम्पॅरिझन करू शकतो. जसे की डिस्प्लेसमेंट मायलेज परफॉर्मन्स आणि इतर पॅरामीटर्स. परंतु ग्राहकांच्या रेटिंग नुसार दोन्ही बाइक्स बऱ्यापैकी सारख्याच आहेत. परत एवढाच की हंटर 350 क्लासिक 350 पेक्षा आकाराने आणि वजनाने लहान आहे.

हंटर 350 मायलेज किती देते?

Hunter 350 चा मायलेज बऱ्यापैकी चांगला आहे. ही बाईक शहरामध्ये 33 Kmpl तर हायवेवर सर्वोत्तम असा 39.22 Kmpl मायलेज देत आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

iPhone 16| iOS 18 सह… iphone16 मध्ये कोणते मुख्य आणि नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत ?

iPhone 16 | भारतात iPhone 16 ची कधी सुरू होणार बुकिंग ? Apple चा iOS 18 सह Powerful Performance!

 

Leave a comment