Vinod Tawde: नालासोपाऱ्यात राडा, बवीआने लावला पैसे वाटपाचा आरोप
Vinod Tawde: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या बिलकुल एक दिवस आधी ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप लावण्यात आलेला आहे. Vinod Tawde हे नालासोपारा इथे राजन नाईक यांना भेटायला गेले होते. राजू नाईक हे नालासोपाराचे उमेदवार आहेत आणि त्यांनाच भेटण्यासाठी विनोद तावडे तिकडे गेले होते.
विनोद तावडे हे महाराष्ट्राचे एक राजकीय नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत. विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे ते जनरल सेक्रेटरी देखील आहेत. भारतीय जनता पार्टी चे नालासोपारातील उमेदवार राजन उर्फ राजू नाईक यांनाच भेटायला विनोद तावडे नालासोपारा येथे गेले होते.
विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्त्यांच्या घोळक्याने Vinod Tawde यांना घेरून त्यांना जाब विचारला. त्याच दरम्यान बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, “विनोद तावडे चोर आहेत” अशी घोषणा देखील करत होते.
“देवा शप्पथ! मी पैसे वाटप करत नाहीये, वाटलं तर…”- विनोद तावडे
विनोद तावडे वायरल व्हिडिओमध्ये बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांसमोर हात जोडून “देवा शप्पथ! मी पैसे वाटप करत नाहीये, वाटलं तर माझा फोन तपासा, माझे किती फोन कॉल्स आहेत ते देखील चेक करा” असे म्हणत होते.
काही तासांपूर्वीच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि बवीआच्या कार्यकर्त्यांमध्ये नालासोपारा तुफान राडा झाल्याचे दिसून आले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना घेरल्याचे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. विनोद तावडेंबरोबर भाजपाचे नालासोपाराचे उमेदवार राजन उर्फ राजू नाईक देखील आहेत. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते Vinod Tawde यांना जाब विचारत आहेत. हा राडा विरार पूर्वेला झाला. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील विवांत हॉटेल मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक यांना भेटण्यास गेले असताना हा सगळा राडा झाला.
Video Credit: @TV9MarathiLive
आमदार हितेंद्र ठाकूर- “विनोद तावडे लाज-शरम कोळून प्यायले आहेत…”
वसई-विरार चे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व राड्यावर एक प्रतिक्रिया दिलेली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी असे वक्तव्य केले की, “पाच कोटींचा वाटप चालू आहे आणि मला डायऱ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर लॅपटॉप सुद्धा आहे. कुठे कुठे काय वाट प झालाय याची सर्व माहिती माझ्याकडे आहे.” आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे हे नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचे आहे.
त्यापुढे ते असेही म्हणाले की, “भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्यायले आहेत. Vinod Tawde हे एक राष्ट्रीय नेते आहेत. ते राज्याचे शिक्षण मंत्री देखील होते त्यांना इतकं सुद्धा साधं माहीत नाही की 48 तासा आधी मतदारसंघ सोडायचा असतो” अशी जोरदार टीका आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली.
हितेंद्र ठाकूर यांनी असाही दावा केला आहे की, विनोद तावडे यांनी त्यांना अशी विनंती केली,” त्यांनी मला 25 फोन कॉल केले आणि मला माफ करा, मला जाऊ द्या, प्लीज मला माफ कर माझं चुकलं” असे देखील ते वारंवार हितेंद्र ठाकूर यांना विनवण्या करत होते.
पुढे ते असेही म्हणाले की,” मला विनोद तावडे येण्याआधीच ते पैसे वाटपासाठी येत आहेत आणि ते पाच कोटी घेऊन येत आहेत हे समजले होते. तशा माझ्याकडे डायऱ्या आणि इतर काही पुरावे देखील आहेत. आता यावर कायदेशीर कारवाई काय होते ते बघूच.”
विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे नालासोपाऱ्यातील भाजपाचे उमेदवार राजन उर्फ राजू नाईक यांना भेटण्यासाठी विरार पूर्वेच्या एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यांच्या या भेटीदरम्यान अचानक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि आमदार हितेंद्र ठाकूर हे तिथे उपस्थित झाले. बगळ्याच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप लावला.
तो आरोप फेटाळत Vinod Tawde यांनी असे वक्तव्य केले की, “मी निवडणुकी संदर्भात काही गोष्टी सांगण्यासाठी नालासोपाराला पोहोचलो होतो. त्यावेळी बवीआचे कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांचा असा गैरसमज झाला की मी पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही आहेत. त्यांचे फुटेज हवे तर तपासावे. मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. जे सत्य आहे ते समोर येईलच. माझी सुद्धा अशी मागणी आहे की या प्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी.”
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.