Vanraj Andekar Murder Case| गोळीबारामुळे नाही तर कोयत्या मुळे गेला वनराज आंदेकर चा जीव? Brutal Case 2024

लाडक्या बहिणने केली सख्या भावाची हत्या | वनराज आंदेकर मर्डर केस !

Vanraj Andekar Murder Case Pune: सध्या महाराष्ट्रात आणि खास करून पुण्यात (Pune) गुन्हेगारीचे प्रमाण खूप जास्त वाढताना दिसत आहे. दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता, पुण्यातील नाना पेठेत गोळीबार करून 13 ते 14 जणांनी राष्ट्रवादीचे पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

हत्येचा CCTV Footage सोशल मीडियावर व्हायरल !

Vanraj Andekar Murder Case Pune News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोशल मीडियावर वनराज आंदेकर यांच्या हत्तेचा व्हिडिओ काल रात्रीपासून व्हायरल होत आहे. नेमका काय प्रकार आहे आणि कुठल्या वादातून ही हत्या करण्यात आली जाणून घेऊया.

एके काळी प्रख्यात गुंड आणि नगरसेवक होता !

पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत वनराज आंदेकर (Vanraj Andekar) 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराज आंदेकर ह्यांचे चुलत भाऊ उदयकांत आंदेकर हे देखील माजी नगरसेवक आहेत. एकेकाळी दादागिरी, भाईगिरी, हफ्ता वसुली, मर्डर, गँगस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणाराज आंदेकर यांनी ह्या गुन्हेगारी क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचे ठरवले होते. गुन्हेगारी म्हटली की समोर कोण येऊन हल्ला करुन जाईल हे सांगता येतं नाही. म्हणूनच वनराज आंदेकर हे नेहमी आपल्या सोबत १०-१५ पोरांची टोळी सोबत ठेवत असतं.

काल रात्री एका घरगुती कार्यक्रमात जाणार असल्याने वनराज यांनी आपल्या सोबत असलेल्या पोरांना सुट्टी दिली. नेमकी हीच संधी साधून हलेखोरांनी वनराज यांच्यावर हमला केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेज वरून लक्षात येतं आहे की ५-६ स्कूटी वरून १३-१४ जनांची टोळी येते वनराज हे त्यांच्या एका नातेवाईका सोबत बाहेर उभे असता हल्लेखोर त्यांच्या जवळ येऊन त्यांच्यावर गोळीबार करून आणि कोयत्याने हमला करून वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांना गंभीर जखमी करतात. ह्या नंतर वनराज आंदेकर यांना त्वरित जवळच्या के इ एम रुग्णालयात हलवण्यात येतं परंतू दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून येते.

लाडकी बहिण कि जवळचा मित्र कोणी केला खून ?

Video Credit: @SakalMediaGroup

वनराज आंदेकर यांचे वडील सूर्यकांत खांडेकर उर्फ बंडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या दोन बहिणी यांनी वनराज यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोरांना बोलून तुला ठोकतेच अशी धमकी देऊन वनराज ला धमकवण्यात आलं होतं. एका छोट्याश्या टपरी च्या जागेवरून वाद सुरु होता त्या नंतर वनराज आणि त्यांच्या कुटुंबाने ह्यआधी गुन्हा नोंदवला होता. “तु आमच्या पोटावर पाय देतोयेस वण्या तुला नाय संपवला तर नाव लावणार नाय” अशी धमकी वणराज यांची बहिण संजीवनी आंदेकर हिने दिली होती. झालेल्या हमल्यानंतर पोलिसांनी त्वरित वनराज च्या दोन्ही बहिणींना आणि मेव्हण्यांना अटक केली.

गोळीबारामुळे नाही तर कोयत्यामुळे झाला मृत्यू!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक टीमने वनराज यांच्या शव विच्छेदनानंतर एक रिपोर्ट समोर आली आहे सोमवारी सकाळी पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. तेरा जणांच्या टोळी मधून जो गोळीबार झाला होता त्यापैकी फक्त एक गोळी वनराज यांच्या दिशेने गेली होती परंतु त्यांना कुठलीही इजा झाली नव्हती त्यानंतर कोयत्याने केल्या गेलेल्या हल्ल्यात धारदार शस्त्रामुळे वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला असे स्पष्ट करण्यात आले आहे.

घटनेचा मुख्य आरोपी कोण ?

पुण्यामध्ये काल झालेल्या गोळीबाराने संपूर्ण पुणेच नाही तर महाराष्ट्र हादरला आहे. सांस्कृतिक कलेची राजधानी म्हणण्यात जाणाऱ्या पुण्यात (Pune) गुन्हेगारीची प्रमाण इतके वाढले आहे की याकडे कोणीही लक्ष देत नाहीये असे सवाल सामान्य जनता करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी कोण हे अजून कळलेले नाही परंतु वनराज यांच्या कौटुंबिक वादामुळेच हा हमला झाला असावा हे सांगण्यात येत आहे. सूर्यकांत आंदेकर यांचे जावई गणेश कुमकर याचं नाव समोर येत आहे. गणेश कुमकर याने पूर्वी देखील पुण्यात (Pune) ॲसिड हल्ला करून चर्चेत आला होता. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या बहिणी आणि मेव्हणे गणेश कुमकर यांनी मिळून हा डाव रचला असावा असे पोलिसांचा संशय आहे. सध्या पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहे.

कोण आहे वनराज आंदेकर?

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनं पुणे हादरलं. आता या हत्या प्रकरणाच्या तपासात त्यांच्या बहिणींनीच आपल्या भावाचा काटा काढल्याचं कळतंय. वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी वनराज आंदेकरांच्या दोन्ही बहिणींना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/paralympics-2024-nitesh-kumar-gold-medal-india/

Paralympics 2024 | Nitesh Kumar भारतासाठी नितेश कुमारने पटकावले सुवर्णपदक! Super Star

Leave a comment