TVS सज्ज झालाय त्यांची नवीन बाईक लॉन्च करण्यासाठी. बाईक प्रेमी उत्सुकतेनी ज्या बाईक ची वाट बघत आहेत ती TVS Apache RTX 300 Adventure लवकरच आपल्याला रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. ह्या बाईक मध्ये आपल्याला बघायला मजा आकर्षक असे स्पोर्ट लूक आणि नवीन 299cc RTX D4 इंजिन ते पण 35 हॉर्स पॉवर सह.
TVS Apache RTX 300 Adventure: पुढच्या महिन्यात येते तुमच्या भेटीला!
TVS Apache RTX 300 Adventure लॉन्च होण्याची चर्चा मार्केटमध्ये पसरलेली असून 2025 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दरम्यान ही गाडी launch होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतच मोटोसोल 2024 मध्ये टीव्हीएस ने त्यांचा नवीन आरटीएक्स RTX D4 इंजिन सर्वांसमोर प्रदर्शित केले होते. त्यानंतर काही दिवसातच नवीन अपाची आरटीएक्स 300 एडवेंचर सुद्धा लाँच होण्याच्या बातम्या पसरू लागल्या. नवीन RTX D4 इंजिन च्या बातमी नंतर नवीन आरटीएक्स थ्री हंड्रेड एडवेंचर गाडी लॉन्च होण्याच्या बातम्यांना उधाण आले. परंतु TVS ब्रँडने अद्यापही कुठली अधिकृत बातमी जाहीर रित्या सांगितली नाही.
Performance आणि Engine बद्दल माहिती
तर या नवीन Apache RTX 300 एडवेंचर बाईक मध्ये बरेच दमदार फीचर्स आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यामुळे या गाडीचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम असण्याची शक्यता मानली जाते. या गाडीच्या इंजिन बद्दल सांगायचे झाले तर 299cc लिक्विड कुल्ड RTX D4 इंजिन जे निर्माण करतं जवळपास 35BHP तेही 9000rpm च्या उच्च feature सह. त्याचबरोबर या नवीन बाईक मध्ये पीक टॉर्क असणार आहे जवळपास 7000Rpm सह 28.5NM चा. या नवीन एडवेंचर बाईक मध्ये अजून एक आकर्षक फीचर म्हणजे यात सहा स्पीडचा गिअर बॉक्स असणार आहे.
Video credit: @theautostory
बाईक रायडर्सला आकर्षित करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात असणार आहे विविध प्रकारचे रायडिंग नोट्स आणि फ्रॅक्शन कंट्रोल सिस्टम सुद्धा तेही अगदी आकर्षक दरात. त्याचबरोबर ऑफ रोडींग साठी सुद्धा ही बाईक अगदी उपयुक्त ठरणार आहे कारण यात आपल्याला स्विचेबल ABS सुद्धा मिळणार आहे.
या एडवेंचर बाईकच्या इंजिन ची माहिती अशाप्रकारे आहे:
- Engine: 299cc लिक्विड कुल्ड RTX D4 इंजिन
- Peak Torque: 28.5 NM with 7000 RPM
- Power: 35 BHP with 9000 RPM
- Gearbox: 6-speed gear box
- Riding Modes: Multiple modes and Traction Control System
- Off-roading: Switchable ABS
किंमत| RTX 300 Adventure Price
Price: या गाडीचा समावेश 300 सीसी एडवेंचर्स ज्या सध्या भारतात उपलब्ध आहे त्याच्यामध्ये होईल. जेव्हा केव्हा ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होईल तेव्हा ही जी तुलना KTM 250 Adventure, Suzuki V Storm SX, आणि Kawasaki Versys 300 या गाड्यांसोबत नक्कीच केली जाणार आहे. त्यामुळे असा अंदाज सांगितला जातो की या गाडीची किंमत अडीच लाख ते तीन लाख (₹2.5 Lacs to ₹3 Lacs Ex-showroom) एक्स-शोरूम प्राईस दरम्यान असण्याची शक्यता आहे.
Competitors in India:
- KTM 250 Adventure
- Suzuki V Storm SX
- Kawasaki Versys 300
- Kawasaki Ninja 300
- Keeway RR 300
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
Frequently Asked Questions
TVS Apache RTX 300 Adventure ची किंमत किती आहे?
असा अंदाज सांगितला जातो की या गाडीची किंमत ₹2.5 लाख ते ₹3 लाख एक्स शोरूम प्राईस दरम्यान असण्याची शक्यता आहे.
TVS Apache RTX 300 Adventure ची इंजिन कोणते आहे?
इंजिन बद्दल सांगायचे झाले तर 299cc लिक्विड कुल्ड RTX D4 इंजिन जे निर्माण करतं जवळपास 35BHP तेही 9000rpm च्या उच्च feature सह.