Salman Khan| बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये नंतर अभिनेता सलमान खान च्या सुरक्षेत वाढ !
Salman Khan: बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्याकांडा मुळे सम्पूर्ण देश हादरला आहे. सध्या ह्या हत्याकांडाची कसून चौकशी सुरू आहे. ह्या हत्यकांडाचे संशयित आरोपी शिवकुमार, गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि शुभम लोणकर ह्यांना सध्या मुंबई पोलिस शोधत आहे. हा सर्व प्लॅन चा मास्टरमाईंड शुभम लोणकर आणि त्याचे साथीदार शिवकुमार, गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप ह्यांनी ह्या प्लॅन ची कहाणी जेल मध्येच बनवली होती अस सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचं राजकारणात, बॉलिवूड आणि उद्योगपती ह्यांच्या यादीत मोठं नाव आहे. सूत्रांच्या माहिती मुंबईत झिषान सिद्दिकी हा बाबा सिद्दीकी (Baba Siddique) ह्यांचा मुलगा आहे. झिषान सिद्दिकी हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट ह्यांचा खासदार आहे.
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे झिषान ह्याच्या ऑफिस मधून घरी परत असतांना हा हल्ला झाल्याचे पोलिस चौकशीतून समोर आहे आहे. ह्यांच्या बाबा सिद्दीकी हे त्यांच्या ड्रायव्हर सोबत एकटेच निघाले होते. त्याच दरम्यान रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या वर अनोळखी व्यक्तीनं कडून गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान ३ गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या मुळे त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ह्या हत्याकांडामुळे मुंबई आणि भारतात सर्वत्र खळबळ माजली आहे. बाबा सिद्दिकी यांचा बॉलीवूड तसेच राजकारणात मोठे नाव आहे. सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान यांच्यात पूर्वी जे वाद होते त्या वादांना मिटवून या दोघांना जवळ आणण्याचे काम बाबा सिद्दिकी यांनी केले होते.
लॉरेंस बिष्णोई हा सध्या जेल मध्ये कैद आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या गोळीबार आणि हल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी हे मुंबई आणि राजकारणातील मोठे नाव होते आणि त्यांची अशी गोळी झाडून हत्या करणं म्हणजे मुंबई ला हदरा बसने आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हात्ये नंतर सलमान खान च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या ह्या घटनेची पूर्ण जबाबदारी ही बिश्नोई गँग ने घेतली आहे असे सांगण्यात येत आहे.
सध्या सलमान खान (Salman Khan) हा मुंबई येथे बिग बॉसच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या हत्याकांड मागे लॉरेन्स बिश्नोई याचे नाव येत आहे. सध्या लॉरेन्स बिश्नोई हा गुजरात मध्ये साबरमती येथील जेलमध्ये कैद आहे. काही महिन्यांपूर्वीच सलमान खान याच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणात एका संशयित आरोप्याला अटक देखील करण्यात आली होती. त्या घटनेनंतर सलमान खान (Salman Khan) याची सुरक्षा वाढवण्यात आली होती परंतु नुकत्याच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान यांची सुरक्षा दुप्पट करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिसांना दिले आदेश !
मुंबईमध्ये झालेल्या बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर जनतेने हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचा बिहार होताना दिसतो आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सध्या कार्यरत असलेल्या पक्षाचे गृह मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबा सिद्दिकी हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की मुंबई पोलीस यांनी तीन आरोपींपैकी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी एक आरोपी सध्या फरार आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्वरित फाशी ची शिक्षा देऊ असे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
पुढच्या काही दिवसात राज्यात विधासभा निवडणुकी येतं आहेत आणि राज्यात असे वातावरण सुरू आहे. सध्या ह्या बाबा सिद्दिकी (Baba Siddique) ह्यांच्या वर झालेल्या हमल्यामुळे आणि हत्याकांडामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे असे आता जणता प्रशासनाला सवाल करत आहे. आपल्या महाराष्ट्रात आता जनता तरी सुरक्षित आहे का असा सवाल जनतेकडून विचारला जातो आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगच डायरेक्ट कनेक्शन!
Baba Siddique: मुंबई येथे एप्रिल महिन्यात सलमान खान (Salman Khan) ह्यांच्या घरावर जो हमला झाला होता त्या नंतर सलमान खान (Salman Khan) यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. ह्या घटनेची पूर्ण जिम्मेदारी ही लॉरेन्स बिश्नोई ह्यांच्या गँग ने घेतली होती. लॉवरेंस बिश्नोई हा सध्या गुजरात येथील साबरमती जेल मध्ये बंद आहे. सुप्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धु मुसेवाला ह्याची हत्या केली होती. त्या नंतर लावरेन्स बिश्नोई याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. सलमान खान ह्यांच्या वर काळवीट मारण्याच्या प्रकरणावरून राजस्थान पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता परंतू त्या नंतर सलमान खान (Salman Khan) ला त्या गुन्ह्यातून सुटका मिळाली होती.
काळवीट हा बिश्नोई समाजाचा पूज्य मानला जाणारा प्राणी आहे आणि ह्या प्राण्याची हत्याकरून शासन सलमान खान (Salman Khan) ला शिक्षा का सुनावत नाही ह्याच वादावरून लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान ला सोशल मीडिया वर धमकी दिली होती. माझा पुढचा टार्गेट आता सलमान खान आहे असे त्याने म्हंटले होते. आता सध्या सलमान खान (Salman Khan) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) ह्यांच्या हत्याकांडाची जबाबदारी लॉवरेन्स बिश्नोई गँग ने घेतली आहे. सोशल मीडिया platform फेसबुक वर पोस्ट करून बाबा सिद्दीकी ची हत्येचा जबाबदारी घेतली आहे. शूटर धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह ह्यांना घटनेच्या काही तासातच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रवीण लोणकर व त्याचा साथीदार शिवकुमार सध्या फरार आहेत. शिवकुमार ज्याने बाबा सिद्दिकी यांच्यावर हमला केला होता. पोलिसांना ताब्यात मिळालेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळली आहे. ह्या संपूर्ण प्लॅन ची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई च्या गँग ने घेतली आहे. ह्या प्लॅन मध्ये बाबा सिद्दिकी (Baba Siddique) व त्याचा मुलगा झिशान सिद्दिकी ह्याला संपवण्याचा प्लॅन होता परंतु हम्ल्यात कार मध्ये एकटे निघालेले बाबा सिद्दिकी (Baba Siddique) ह्यांची हत्या झाली.
सुदैवाने झिशान सिद्दिकी बाबा सिद्दिकी ह्यांच्या सोबात नसल्यामुळे वाचले असे पोलिस सूत्रांच्या माहितीवरून समोर येत आहे. बाबा सिद्दिकी ह्यांचा दाऊद सोबत कनेक्शन असल्याचे अरोप्यांकडून सांगण्यात येत आहे. आणि त्याच कारणुळे बाबा सिद्दिकी ह्यांना बऱ्याच वेळा उंडर वर्ल्ड आणि गांगर्स्टर्स कडून धमक्या देखील मिळतं होत्या. त्याच बरोबर सलमान खान (Salman Khan) ला जो कोणी मदत करेल आणि त्याची पाठ राखण करेल त्याला देखील आम्ही मारू असे लॉरेन्स बिश्नोई ह्यांच्या टोळीने एका सोशल मीडिया पोस्टवर टाकले आहे. दरम्यान ह्या हमल्या नंतर सलमान खान (Salman Khan) ह्यांची सुरक्षा दुप्पट करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी गेल्याने “सलमान खान” झाला भाऊक!
बाबा सिद्दिकी यांचे राजकारणात तसेच चित्रपट सृष्टीत खूपच चांगले नाव होते. सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वादाचा पूर्णविराम आणि दोघांमध्ये झालेल्या गैरसमज आणि वादांमुळे सलमान खान आणि शाहरुख खान हे बरेच वर्ष एकमेकांपासून लांब होते. परंतु बाबा सिद्दिकी यांच्यामुळे सलमान आणि शाहरुख यांच्यातील दुरावा हा दूर झाला असे सलमान खान यांनी सांगितले. बाबा सिद्दिकी हे नेहमी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी तसेच राजकारणातील बरेच दिग्गज मंडळी यांना नेवता द्यायचे. बाबा सिद्दिकी यांनी सलमान खान आणि शाहरुख खान यांना देखील एकाच वेळी इफ्तार पार्टीला बोलावले होते आणि ह्याच पार्टी दरम्यान बाबा सिद्दिकी यांनी सलमान खान आणि शाहरुख खान यांना जवळ आणून त्यांच्यातले वाद मिटवून मैत्रीचे नाते पुन्हा जोडावे यासाठी विनंती केली होती.
बाबा सिद्दिकी यांचे राजकारणासोबतच हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज निर्मात्यां सोबत आणि कलाकारां सोबत त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते. बाबा सिद्दिकी यांच्या जाण्यामुळे सलमान खान आणि त्याच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या अंत दर्शनाच्या वेळी सलमान खान हा भाऊ झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. मुंबई पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी ह्या घटनेचा त्वरित निकाल लावावा असे देखील सलमान खान यांनी सांगितले.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.