MG Hector facelift 2026: नवीन डिझाईन,फीचर्स आणि किंमत
MG Hector facelift 2026: 2019 मध्ये एमजी हेक्टर पहिल्यांदा लॉन्च झाली होती. त्यानंतर सहा वर्षांनी 2026 मध्ये एमजी हेक्टर लॉन्च करण्यात आली आहे. ही एक लोकप्रिय SUV(Sport utility vehicle) आहे. जी एक अशी गाडी आहे जी रस्त्यावरील उंच भागांवरून जाण्यासाठी उपयोगी आहे. खडबडीत रस्त्यांवर टिकून राहील अशी आहे. जर तुम्ही 2026 मध्ये नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा.
एमजी हेक्टर 2026 एक्सटेरियर आणि इंटेरियर
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया ने नुकतच हेक्टर या गाडीचा फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केला आहे. एमजी हेक्टर हे पाच सीटर आणि सहा सीटर या दोन वर्षांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एमजी हेक्टर ही सर्वप्रथम 2019 मध्ये लॉन्च झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत हा तिसरा सर्वात मोठा अपडेट या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळी या गाडीमध्ये एक जबरदस्त बदल म्हणजे त्यात दिलेला नवीन बोल्ड क्रोम ग्रील ज्याला ऑरा हेक्स असं नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर फ्रंट बंपरला एक नवीन क्रोम ट्रिम डिझाईनिंग देण्यात आली आहे. एवढेच नाही तर रियर बंपर देखील सुधरवण्यात आला आहे आणि नवीन 18 इंच ओरा बोल्ट असलेले आलोय व्हील देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत.
VIdeo Credit: @shrishkaushik
- गाडीच्या पुढील बाजूला नवीन फ्रंट ग्रील बसवण्यात आली आहे.
- 18 इंच नवीन alloy wheel डिझाईन.
- मागील बाजूस कनेक्टिंग एलईडी टेल लाईट आहेत.
- केबिन मध्ये नवीन 14 इंच एचडी पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट स्क्रीन बसवण्यात आली आहे.
- या गाडीमध्ये भरपूर बूट स्पेस आहे.
MG Hector Ex-showroom किंमत किती आहे?
एमजी हेक्टर ची बेस प्राईस सुरू होते ₹11.99 lakh पासून ते टॉप मॉडेल ची प्राईस ₹18.99 lakh पर्यंत. एमजी हेक्टर 5 सीटर आणि 7 सीटर मध्ये उपलब्ध आहे.
MG Hector 2026 Ex-showroom Prices
- Style MT – Rs 11.99 lakh
- Select Pro MT – Rs 13.99 lakh
- Smart Pro MT – Rs 14.99 lakh
- Smart Pro CVT – Rs 16.29 lakh
- Sharp Pro MT – Rs 16.79 lakh
- Sharp Pro CVT – Rs 18.09 lakh
- Savvy Pro CVT – Rs 18.99 lakh
MG Hector Plus 2026 Ex-showroom Prices
- Sharp Pro MT – Rs 17.29 lakh
- Sharp Pro CVT – Rs 18.59 lakh
- Savvy Pro CVT – Rs 19.49 lakh
या गाडीमध्ये दोन कलर आहेत: 1) Celadon Blue आणि 2) Pearl White. या गाडीत आतील बाजूस Ice Grey कलर थीम 5 सीटर साठी आणि Urban Tan कलर थीम सहा ते सात सीटर साठी उपलब्ध आहे. एमजी हेक्टर 2026 आधीच्या मॉडेल पेक्षा जास्त मॉडर्न आणि स्पोर्टी आहे. त्यामुळे तुम्ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hector Facelift नक्की घेऊ शकता.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
