Neeraj Chopra: ह्या वेळी निशाणा Silver वर लागला! First Silver Medal in Paris Olympics 2024

Paris Olympics 2024: भारताच्या एकूण ११७ धावपटूंचा समावेश

Neeraj Chopra: २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये भारताच्या एकूण ११७ धावपटूंचा समावेश होता. एकूण सहा पदके भारताने जिंकली एक रौप्य आणि पाच कांस्य पदकं जिंकली. भारतीय संघाचा भालाफेक पट्टू नीरज चोपडा याने खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने एकूण 90.45 मीटर लांब ला फेकून रौप्य पदक आपल्या नावावर केले आहे. टोकियो ओलंपिक मध्ये नीरज चोपडा ने सुवर्णपदक जिंकले होते परंतु ह्यावेळी त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सुवर्ण पदक कोणी जिंकले ?

पॅरिस 2024 ऑलम्पिक गेम्स मध्ये पाकिस्तानच्या अर्षद नदीम याने 92.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. अंतिम फेरीत एकूण आठ खेळाडूंचा सहभाग होता. प्रत्येक खेळाडूला सहा वेळा संधी मिळते. ज्याचा भाला सर्वात जास्त लांबीचा अंतर गाठेल त्यालाच पुढे जायला संधी मिळते. अंतिम सामन्यात भारताच्या भालाफेक पटू नीरज चोपडा ने त्याच्या सीजन चा बेस्ट परफॉर्मन्स देऊन योग्य पदक आपल्या नावावर केले. ग्रेनडाच्या ए पीटर्स याने 88.54 मीटर लांब भाला फेकून कांस्यपदक आपल्या नावावर केले.

नीरज (Neeraj Chopra) सोबत नेमके काय झाले ?

Neeraj Chopra Paris Olympics 2024 Silver medal

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत नीरज चोपडा (Neeraj Chopra) ने सांगितले की, “मी आपल्या देशासाठी सुवर्णपदक आणू शकलो नाही याबद्दल मनात खंत आहे परंतु भारताला रोप्य पदक जिंकून दिल्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. तो सहजच सुवर्णपदका पर्यंत पोहोचला असता परंतु धावताना त्याच्या आत्मविश्वास थोडा कमी पडला आणि त्या मुळे आला 90 मीटरच्या वर जाऊ शकला नाही.” खेळाडूला शारीरिक तसेच मानसिक रित्या स्थिर राहणे खूप गरजेचे असते. हा सामना फक्त ऑलिंपिक नसून भारत पाकिस्तान विरुद्ध सामना वाटत होत्या प्रेक्षकांचा आक्रोश कानावर येत होता तरीसुद्धा आपल्या भावना स्थिर ठेवत मी माझा पूर्ण प्रयत्न केला. अर्शद नदीम याने देखील मागील ऑलिंपिक मध्ये 90 मीटर च्या जवळपास भाला फेकून त्याचा बेस्ट दिला होता. भालाफेकतांना प्रत्येक खेळाडूच्या मनात तो त्याचा बेस्ट कसा देईल याबद्दल विचार सुरू असतात.

सलग दोन ऑलिम्पिक आणि दोन पदके !

ऑलम्पिक गेम्स मध्ये भारताला आतापर्यंत सलग दोन वेळा पदक जिंकून इतिहासात नाव कोरल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये नीरज चोप्राचे नाव कोरले जाणार आहे. एवढ्या वर्षांत, स्वातंत्र्य काळा नंतरच्या 2 वेगवेगळ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये केवळ 3 भारतीय खेळाडूंना दोन पदके जिंकता आली आहेत. सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा यांना आतापर्यंत ही कामगिरी करण्याचा मान मिळाला आहे.

नीरज आणि अर्शद नदीम भारतीय तिरंग्या मध्ये !

पॅरिस ऑलम्पिक 2024 च्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असताना. पदके वितरण झाल्यावर फोटोशूट होत होता त्यावेळी भारतीय खेळाडू नीरज चोपडा आपल्या भारतीय तिरंगा सोबत तिथे उभा होता त्याचवेळी सोबत उभा असलेला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम हा त्याच्या देशाचा झेंडा शोधत होता परंतु त्याचवेळी त्याला तो मिळाला नाही असे पाहता निरजणे नदीमला हाक मारून जवळ बोलावले आणि दोन्हीही खेळाडू आपल्या भारताच्या तिरंग्याला घेऊन एकाच फोटोमध्ये दिसून आले. सध्या त्या फोटोची चांगलीच चर्चा सुरू आहे. खेळाडू हा नेहमीच आपल्या देशासाठी खेळत असतो त्याचबरोबर त्याला आपल्या सह स्पर्धकाचे सुद्धा मन जिंकायची संधी मिळते हीच तर प्रत्येक खेळाडूची परिभाषा आहे असे नीरज म्हणाला.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Vinesh Phogat Disqualified! सुवर्णपदकापासून वंचित ! 50 किलो वजन गटात वजन जास्त झाले! Worst News Disappointed

Leave a comment