Pradhan Mantri Awas Yojana | PMAY 2.0 योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले उत्पन्न किती असावे लागते? Get Your Huge Dream House!

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.?

Pradhan Mantri Awas Yojana: म्हाडा सिडको ची लॉटरी आणि प्रधानमंत्री आवास योजना रजिस्ट्रेशन २.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं आहे. PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2024: तुम्ही भरला आहे का फॉर्म ?? तुमचं नाव आहे का यादीत आजच तपासा. केंद्र सरकारची ती मे प्रधानमंत्री आवास योजना ही योजना भारत सरकारची नवीन योजना आहे गरीब कुटुंबांना परवडणारी घरे बांधून देण्यासाठी पंतप्रधान निधीतून सबसिडी दिली जाते. भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2015 साली सुरू केली होती. या योजनेमध्ये (PMAY) ग्रामीण भागातील जनतेला आणि आपल्या भारतीय समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

(Pradhan Mantri Awas Yojana) ज्यांची घरे अवकाळी पावसात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पडून गेली अशा लोकांसाठी घर बांधणे कठीण जाते, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आज 2024 मध्ये देखील PMAY 2.0 योजना सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. आपले उत्पन्न किती असावे त्याचबरोबर लागणारी सर्व महत्त्वाची कागदपत्रे यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

Pradhan Mantri Awas Yojana

Telegram Group Join Now

 

Pradhan Mantri Awas Yojana डिसेंबर 2024 पासून PMAY 2.0 (Pradhan Mantri Awas Yojana) ह्या योजना अंतर्गत 2.95 कोटी घरांचे बांधकाम आणि त्यांचा निधी मंजूर करण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये या योजनेचा गावकऱ्यांनी पुरे पूर लाभ घेतला आहे. 2015 मध्ये भारत सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत अंदाजे वीस लाखांहून अधिक घरे बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्याचबरोबर आता या योजनेच्या अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची संख्या ही वाढवून दोन पूर्णांक जवळपास 3 कोटी घरापर्यंत पोहोचले आहे.

PMAY 2.0 योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे..?

  1. PMAY 1.0 ह्या योजनेत मूळतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले (EWS) , मागासवर्गीय (LIG) आणि इतर मागासवर्गीय (MIG) या वर्गात बसणाऱ्या लोकांना या योजनेचा फायदा आणि लाभ घेता आला होता.
  2. PMAY 2.0 या योजनेअंतर्गत झोपडपट्टीत राहणारे रहिवासी SC/ST, अल्पसंख्यांक, विधवा, सफाई कर्मचारी, अपंग व्यक्ती तसेच पथ विक्रेते कारागीर आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यांना घरे दिली जात आहेत.

PMAY 2.0 योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले उत्पन्न किती असावे लागते ?

(Pradhan Mantri Awas Yojana) PMAY 2.0 प्रधानमंत्री आवास योजना 2024 या योजनेच्या लाभ घेण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती असावे याबद्दल शासनाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. त्याचबरोबर थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील दिलेले माहिती वाचा.

  1. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी म्हणजेच (EWS) वर्गात येणाऱ्या लोकांसाठी, त्याच बरोबर वार्षिक उत्पन्न कमी असलेला गट (LIG) तसेच मध्यम उत्पन्न असलेला गट (MIG) अशा तीन वेगवेगळ्या विभागात या योजनेच्या लाभ देण्यात येत आहे.
  2. EWS ह्या वर्गात येणाऱ्या लोकांचे वार्षिक उत्पन्न हे जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  3. LIG कुटुंबात येणाऱ्या लोकांसाठी: ह्या वर्गात येत असलेल्या लोकांसाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांपासून 6 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  4. MIG ह्या वर्गात येणाऱ्या कुटुंबांसाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपये आणि जास्तीत 9 लाख रुपये असणे आवश्यक आहे.

Video Credit: @KiranDhanawade27

PMAY 2.0 व्याज आणि कर्जावर अनुदान किती आहे..?

Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेत आपल्या आवास योजनेच्या कर्जावर कमीत कमी 12 वर्षांच्या कालावधी साठी पहिल्या 8 लाख रुपयांसाठी तुमच्या कर्जावर 4% पर्यंत व्याज अनुदान मिळणार आहे आणि त्याच हिशोबाने व्याज आकारण्यात येणार आहे. जर तुमचे घर आणि त्यासाठी लागणारे कर्ज 35 लाख रुपयांच्या आसपास असेल तर तुम्हाला तर आपल्याला साधारण पने 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी आणि ग्रामीण भागातील मागासवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. Pradhan Mantri Awas Yojana शहरी भागात कमीत कमी दरात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सिडको गृहनिर्माण आणि म्हाडा अंतर्गत शहरी भागात स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ह्यात सुद्धा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुरवातीला अनुदान दिले जात आहेत.

PMAY योजना 2024 अंतर्गत लाभार्थीसाठी किती मिळते अनुदान.?

Pradhan Mantri Awas Yojana: प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजनेत 4 श्रेणींन मध्ये विभाजन करण्यात आलेले आहे.

  1. EWS: वर्गात येणाऱ्या किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये एवढी आहे.
  2. LIG: ह्या वर्गात येणाऱ्या लोकांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 ते 6 लक्षरुप्यांपर्यंत आहे.
  3. MIG 1: ज्यांचे उत्पन्न मध्यम वर्गात येते अशा लोकांसाठी 6 ते 12 लाखरुपयांपर्यंत मदत मिळते.
  4. MIG 2: ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाख रुपयांपर्यंत आहे अशा लोकांसाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत CLSS किंवा क्रेडिट लिंक्स सबसिडी योजनेसाठी पात्र ठरतील असे PMAY च्या अधिकृत वेबसाईटवर माहिती मिळते.

ह्या सर्व वर्गातील किंवा श्रेणीतील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागद पत्रे देणे बंधनकारक आहे. https://pmay-urban.gov.in/ योजनेसाठी पात्र ठरतील असे PMAY च्या अधिकृत वेबसाईटवर अवश्य भेट द्या.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Tata EV Scooter Launch date जाहीर? किंमत फक्त ₹75000?

Tata EV Scooter Launch date जाहीर? किंमत फक्त ₹75000? Best ev Scooter

 

Leave a comment