Marathi Bhasha| माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त…! 1500 वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास! Great News

Marathi Bhasha classical language मराठी भाषा अभिजात दर्जा म्हणजे काय ?

Marathi Bhasha: तमाम मराठी भाषिकांचा आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी आज अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. भाषेचा प्राचीन आणि पूर्वीचा इतिहास असतो, जी भाषा १५००-२००० वर्षांपूर्वीची असते त्या भाषेला हा दर्जा दिला जातो. आपल्या भारतीय संस्कृती मध्य अनेक जाती धर्म पंथ आहेत. “धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी” असं म्हणत प्रत्येक वर्षी मराठी माणूस २७ फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिवस मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करत असतो. ह्या दिवशी कविवर्य मराठी भाषेतले थोर कवी “कुसुमाग्रज” यांचा जन्मदिवस असतो आणि ह्याच दिवसाला आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

गेली अनेक वर्ष आपल्या मातृ भाषेला माय मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने राज्य सरकार कडून केंद्र सरकार यांना पत्र पाठवले जाते. ह्या मध्ये गेली अनेक वर्ष आपल्याला माय बोली Marathi Bhasha मराठी भाषेचे स्थान अभिजात भाषेच्या श्रेणी तून हुकत होते. मात्र आपल्या मराठी मायबोलीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून विलंब होतोय. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ४ हजार हून अधिक पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले होते.

आपल्या Marathi भाषेचे स्थान हे अभिजात भाषेच्या दर्जेत यावे या साठी जवळपास १० वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत आली होती. परंतु काल दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी केंद्र सरकारने माननिय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्या Marathi मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले आहे.

Marathi Bhasha मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त!

सर्व माय मराठी भाषा Marathi Bhasha जपणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो भाषा ही मानवी संसारातील एक समर्थ किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी गोष्ट आहे. आपण आपल्या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे त्याला प्रगत करण्याचे कार्य भाषा करते. माणसं मरत्य असतात पण त्यांनी उच्चारलेली भाषा अजरामर असते. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यात भाषा हीच अशी एक शक्ती आहे की जिला चिरंजीवनाचे वरदान आहे. भाषेच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते पुढे जात असते. भाषा ही माणसा माणसातील अंतर कमी करून युगायुगांची साखळी या भाषेने जोडली जाते.

Marathi Bhasha

Telegram Group Join Now

जेव्हा ही भाषा माणसाला सुसंस्कारित करून मानवी जगण्याला सुकर करते, मायेची पखरण करून माणसा माणसांमधील भावबंध जपते, तेव्हा ही भाषा केवळ भाषा न राहता मायबोली होते. Marathi Bhasha; classical language “मराठी असे आमुची मायबोली “ज्ञानोबाच्या पसायदानातून स्त्रवलेली, तुकोबाच्या अभंगातून पाझरलेली, एकनाथाच्या भारुडातून दुमदुमलेली,समर्थांच्या दासबोधातून समर्थपणे जगायला शिकवणारी, नामदेव जनाई सारख्या असंख्य संतांनी समृद्ध केलेली ही आपली माय मराठी Marathi काय वर्णावी तिची महती ह्या माय मराठी नी मला समृद्ध केलं. माझं जगणं सहज सुंदर केलं. आपण तिचा हात धरूनच विविध कलांचा साहित्याचा मी आस्वाद घेऊ शकलो. तिचे संवर्धन,तीचे सौंदर्य जतन तसेच तिला वृद्धिंगत करण्याचं उत्तरदायित्व आपण साऱ्यांनीच स्वीकारायला हवं तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या महान Marathi मराठी बोलीचा दर्जा आपणं सार्थ ठरवू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा.!

Marathi Bhasha: ज्या भाषेचा वर्षानुवर्षे बोलण्यात वावरण्यात सामावेश आहे जी भाषा वर्षांनु वर्षे सातत्याने बोलली गेली आहे आणि ज्या भाषेचा कुठेही खंड पडलेला नाही त्या भाषेला अभिजात असा दर्जा प्राप्त होतो. आणि त्या भाषेतून उत्तमोत्तम कलाकृती, साहित्य, आणि ग्रंथ लिहिले गेलेले पाहिजेत आणि सोबतच व्यावहारिक दृष्ट्या दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी भाषा ही अभिजात दर्ज्या साठी योग्य मानली जाते. हे जगभरातील अनेक भाषा ना अभिजात हा दर्जा प्राप्त आहे. आपल्या माय बोली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या साठी अनेक साहित्यिक, लेखक आणि राज्यसरकार ह्यांचा मोठा हाथभार लागला आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील थोर साहित्यकार आणि ज्येष्ठ मंडळी ह्या मराठी भाषेच्या Marathi Bhasha अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सतत कार्यरत आहेत.

मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?

आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हा मुद्दा केंद्र शासनासमोर प्रस्थापित केला होता. काही राजकीय आणि साहित्यिक अडचणीमुळे हे काम बऱ्याच वर्षांपासून रखडले होते. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती खाली मराठी भाषेला Marathi Bhasha अभिजात भाषेचा दर्जा आणि स्थान मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहे. यासोबतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ह्या कामाचा फायदा होईल का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्या मुळे काय फायदा होणार ?

Marathi Bhasha: मराठी ही भाषा प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत ज्यात प्रामुख्याने विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश, कोल्हापूर सांगली सातारा ह्या विविध भागांत वेगवेगळ्या लाहेज्यांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. आपली Marathi Bhasha भाषा ही एकच आहे. मराठी आणि ह्या मुळे आता जगभर आपल्या मराठी Marathi Bhasha भाषेचा प्रचार आणि प्रसार सुरू होणार. ज्यामुळे आपल्या मराठी साहित्याला जगभर पोहचता येईल. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्या मुळे मराठीच्या बोलिंचा अभ्यास करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळेल.

त्याचं बरोबर जे संशोधन कार आणि साहित्यिक आहेत त्यांना देखील प्रोत्साहन मिळेल. भारतात जवळपास 450 विद्यापीठानं मध्ये मराठी भाषेचे साहित्य पोहचवण्यात येणार आहे. जेणे करून तिथल्या लोकांना आपल्या भाषे बद्दल अजून माहिती मिळेल. तसेच मराठी भाषेत अनेक थोर महापुरुषांनी, संतांनी आपल्या भाषेत ग्रंथ आणि साहित्य लिहून ठेवलेलं आहे त्या प्राचिन ग्रंथांना अनुवादित करण्यात येणार आहे. आणि राज्यभरातील अनेक ग्रंथालयांना ह्या निर्णयाचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. आपल्या Marathi Bhasha मराठी भाषेचा ठेवा आणि साहित्य जपणाऱ्या संस्थांना, ग्रंथालयांना, आणि भाषेसाठी काम करणाऱ्या साहित्य कारांना आणि लेखकांना देखील फायदा मिळणार आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Bigg Boss Marathi Season 5: फक्त 70 दिवसात बिग बॉस मराठी सीजन 5 घेणार प्रेक्षकांचा निरोप ! Gashmeer Mahajani बिग बॉसच्या घरात! Great Grand Finale!

Bigg Boss Marathi Season 5: फक्त 70 दिवसात बिग बॉस मराठी सीजन 5 घेणार प्रेक्षकांचा निरोप ! Gashmeer Mahajani बिग बॉसच्या घरात! Great Grand Finale!

Leave a comment