सोशल मीडियावर पोस्ट टाकताना विक्रंत मेसी यांनी लिहिले आहे की गेली अनेक वर्ष आणि त्यापुढील काळ हा अभूतपूर्व आहे. तुमच्या अमाप आणि अप्रतिम पाठिंबामुळे मी आज इथवर पोहोचलो आहे त्याबद्दल मी सर्व चाहत्यांचे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु जसजसा मी पुढे जात आहे तसतशी मला पुन्हा कॅलिब्रेट करण्याची आणि घरी परत जाण्याची वेळ येते आहे. एक पती म्हणून एक वडील म्हणून आणि एक मुलगा म्हणून माझी सुद्धा ही जबाबदारी आहे की मी घरच्यांना वेळ दिला पाहिजे आणि अभिनेता म्हणून देखील माझी जबाबदारी आहे.