महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात ताठ मानेने उभा आहे हरिश्चंद्रगड. सहाव्या शतकात उभारलेला या किल्ल्याने महाराजांच्या काळात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शिवनेरी किल्ला पुण्यातील जुन्नर जवळ स्थित आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांवर श्रद्धा ठेवणारा प्रत्येक जण या किल्ल्यावर येऊन नक्कीच भाऊक होतो.
पुण्याजवळील हा किल्ला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. सरसेनापती तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. "गड आला पण सिंह गेला"
पुण्यात स्थित असलेला सगळ्यात उंच किल्ला तसेच आकाराने खूप मोठा असल्यामुळे प्रचंड नावाने या देखील ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काबीज केला.
लोहगड किल्ल्याला बांधताना काळा रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे हा किल्ला लोखंड आणि बनलेला आहे की काय असा भास होतो. लोणावळा जवळील हा किल्ला इ.स. 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी काबीज केला.
प्रतापगड हा किल्ला महाबळेश्वर पासून अगदी 24 किलोमीटरवर स्थित आहे. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान मध्ये झालेल्या लढाईसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.
1674 मध्ये रायगडाला मराठा साम्राज्याची राजधानी घोषित करण्यात आले. रायगडावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य तर भारावून सोडतेच परंतु सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मन भरून येते.
पुण्याजवळ राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तब्बल 26 वर्ष राज्याची राजधानी होता. त्यामुळे पर्यटक येथे ट्रेकिंगला आणि टेन्ट लावून रात्रभर राहायला आवर्जून जातात.
महाराष्ट्राच्या कोकण भागात रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग हा भव्य समुद्री किल्ला आहे. चहू बाजूने समुद्र आणि सिंधुदुर्ग बघून मन भारून जाते. या किल्ल्यावर महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे यांचे दर्शन आपण घेऊ शकतो.
अद्भुत बांधकाम असलेला हा विजयदुर्ग किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला होता आणि सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून काबीज केला. महाराजांनी या किल्ल्यावर मिळालेल्या विजयावरून गडाचे नाव विजयदुर्ग असे ठेवले.
Click on the link below