“यंदा दार उघडणार आणि नशिबाचं गेम पालटणार.“,असे म्हणत रितेश देशमुख यांनी केली या नवीन सीजन च्या ग्रँड प्रीमियर ची सुरुवात. बिग बॉस मराठी सीजन 6 आज पासून प्रदर्शित झालेला आहे. पहिल्यांदाच इथे म्हणजेच बिग बॉस मराठी 6 च्या घरात उघडणार आहेत 800 खिडक्या आणि 900 दार आणि सुटणार आहेत मनोरंजनांच डेंजर वारं. रितेश देशमुख म्हणाले की, “या नवीन सीजनला लोकप्रियतेचा सिक्सर मारायचा”.
Bigg Boss Marathi 6 घराचा First look
बिग बॉस मराठी सीजन सहाच्या घराचा इंटिरियर कसा असेल याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागलेली असते तर आज ग्रँड प्रीमियर च्या रात्री रितेश देशमुख यांनी स्वतः या घराचे दरवाजे उघडले आणि आपल्याला घराची ओळख करून दिली आहे. नेहमीप्रमाणे अतिशय उत्कृष्ट, अनोखे आणि आकर्षक इंटिरिअर आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या इंटेरियस बघायला मिळतात. इंटिरियर त्या त्या सीजनच्या थीमला धरून असतात.
कॅप्टन रूम
कॅप्टन रूम: पुढे त्यांनी बिग बॉस मराठी 6 च्या कॅप्टन रूम चा खुलासा केला. कॅप्टनसी आणि कॅप्टन चा रूम मिळवण्यासाठी बरीच धडपड सदस्य करत असतात. बिग बॉस मराठी 6 च्या या रूमसाठी होणारी खळबळ बघण्यात दर्शकांना एक वेगळीच मजा येणार आहे. या खोलीला राजमहाल असे नाव देण्यात आले आहे. तसेच राजमहालला गुप्त दरवाजे असतातच असा संकेत रितेश देशमुख यांनी दर्शकांना दिला आहे.
Video Credit: @KalakrutiMedia
वॉशरूम
बिग बॉस मराठी 6 च्या नवीन घराचे वॉशरूम बघितल्याबरोबर रितेश देशमुख म्हणाले की, “हे वॉशरूम आहे की पॉश रूम आहे! इथे आंघोळ कमी आणि घोळ जास्त होणार आहेत. पण इथे bath कमी आणि बाते जास्त होणार आहेत पण बाद च बतांगड कुठे होणार आहे?” ते त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. तर ती खोली होती बेडरूमची. बेडरूम्स मध्ये साधारण बेड च्या जागी bunk beds बघायला मिळाले. ते बँक बेड्स बघून रितेश देशमुख यांना हॉस्टेलची आठवण झाली. त्यावर ते असे म्हणाले की, “हे जर हॉस्टेल असेल, तर मी वॉर्डन आहे! आणि घरातल्या सदस्यांसाठी त्याचाच जास्त बर्डन आहे!”
खुफिया अड्डा
त्यानंतर रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6 च्या खुफिया अड्डा नावाच्या खोलीचा त्यांनी खुलासा केला परंतु नावाप्रमाणे ह्या खोलीबद्दलची पुढची माहिती त्यांनी खाजगीच ठेवले आहे.
उलटा पुलटा ROOM
त्यानंतर एकदम अद्भुत अशा खोलीशी त्यांनी परिचय करून दिला. बिग बॉस मराठी 6 च्या या खोलीमध्ये चक्क रितेश देशमुख स्वतः उलटे दिसत होते. त्यांनी असं सांगितले की ही रूमच उलटी आहे. काय भानगड आहे हे पुढे जाणून घ्या.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Tata Nano EV: स्वस्त इलेक्ट्रिक कारमुळे मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण होणार का?
Tata Nano EV: स्वस्त इलेक्ट्रिक कारमुळे मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण होणार का?