Maharashtra CM | गृहखाते मिळाल्यास आम्ही उपमुख्यमंत्री होऊ एकनाथ शिंदे! देवेंद्र फडवणीस 2.0 | Breaking News!

Maharashtra CM | देवेंद्र फडवणीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सूत्रांची माहिती.

Maharashtra CM: राज्यात विधानसभा निवडणूकीत नुकताच निकाल लागला आहे. महायुती ने तब्बल आठवडा पूर्ण झाला असून अजूनही महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण असेल हे ठरलेले नाही. महाराष्ट्रात महायुती च्या उमेदवारांना बहुमत मिळालं आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार निवडून आले आहेत. ह्या निकाला नंतर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडी चे उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी जोरदार आरोप केले आहेत. महाराष्ट्रात हा एकतर्फी निकाल लागुच शकत नाही असे देखील आव्हान महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हा निकाल नक्किच ईव्हीएम च्या बदलामुळे लागला आहे EVM machine खराब आणि बोगस असल्याचा दावा अनेक उमेदवारांकडून होत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

सध्या निकाल लागून एक आठवडा पूर्ण झाला असून अजूनही महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण असेल हे ठरलेले नाही आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर बसतील का यावर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीची दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झालेली असून अमित शहा यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार ह्यांनी चर्चा केली आहे.

Maharashtra CM Devendra Fadanvis

Telegram Group Join Now

(Maharashtra CM) सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राची सगळी सूत्रे दिल्लीतून हलतात असा टोला विरोधी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. महायुती सरकार हे दिल्लीत बसलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर नाचते असे आरोप देखील संजय राऊत यांनी केले आहेत. पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले होते परंतु आता मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर बसतील का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सुत्रांच्या माहिती नुसार सध्या चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM) हे दरेगाव त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. आज संध्याकाळ पर्यंत एकनाथ शिंदे त्यांचा निर्णय सांगतील असे देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे (Maharashtra CM) महाविकास आघाघाडी सोबत जातील का? हा देखील प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय भूकंप येईल सांगता येत नाही. गेल्या वेळी ऊबाठा चे आमदार फोडून गुवाहाटीला पळवून नेले होते आणि रात्रीत सरकार बदलले होते. कोणता आमदार कधी बंडखोरपणा दाखवेल सांगता येत नाही म्हणून सध्या राज्यात तणावाचे वातावरण आहे. सध्याच्या निकालानुसार भाजप ला चांगले मतं मिळाले आहेत म्हणून भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या (Maharashtra CM) गादीवर बसतील असे सूत्रांकडून कळले आहे.

Video Credit: @TV9MarathiLive

जेव्हा जेव्हा राजकारणात तणावाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार होते तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM) हे त्यांच्या मुळ गावी जाऊन राहतात. आता देखील मंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारायचे की नाही याच प्रश्नाचे उत्तर लवकरच एकनाथ शिंदे देतील अशी माहिती शिंदे गटाचे आमदार शिरसाठ यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू यांची एकनाथ शिंदे यांच्या सोबत झाली चर्चा.

Maharashtra CM: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि बसपा चे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली होती. परंतु या भेटीनंतर कुठेलेही पान हललेले दिसतं नाही आहे हे चिन्ह समोर येत आहे. जर महायुतीतील आमदार शिंदेगट आणि अजित पवार गट यांनी एकत्र येवून महाविकास आघाडीला पाठींबा दिला तर मात्र महाविकास आघाडीचे सरकार बनेल असे दिसून येत आहे. परंतु हे होने अवघड आहे विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या प्रचाराचा फायदा जास्त करून महायुतीला मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावरून राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) लवकरात लवकर ठरवावा नाहीतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागु होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्याच्या गावी गेले आहेत.

Maharashtra CM: जर मला उपमुख्यमंत्री पद मिळणार असेल तर माझे अमित शाह आणि केंद्राला विनंती आहे की आमचे शिंदे गटाचे १२ आमदार यांना मंत्री पद द्यावे त्याच सोबत गृहखाते हे आमच्या कडे असावे असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Ind Vs Aus 2nd Test Match | दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण असेल कर्णधार?

Ind Vs Aus 2nd Test Match | दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण असेल कर्णधार? Bad News for Best Captain Bumrah

 

Leave a comment