हिवाळ्यात हळद ह्या पद्धतीने वापरल्यास.. तुम्ही दिसणार 10 वर्षांनी तरुण!

पुरातन काळापासूनच हळदीला औषध म्हणून वापरण्यात आले आहे. हळदी मध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये एक घरोघरी असणारी हळद अत्यंत उपयोगात येते.

हळदीचा भात

साधा भात शिजवताना त्यातच जर तुपाची फोडणी आणि हळद घालून  शिजवला आणि कोणत्याही आमटी बरोबर खायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

हळदीचे सूप

हिवाळा म्हटलं की गरमागरम सूप प्यायची इच्छा नक्कीच होते. तुमच्या आवडीचं जे पण सुख असेल मिक्स भाज्यांचं, डाळिंब किंवा चिकन जरी असेल तरी त्यात फ्लेवर म्हणून अर्धा छोटा चमचा जर तुम्ही हळद घातली तर त्या सूपची चवीसोबतच न्यूट्रिशनल व्हॅल्यू देखील तितकीच वाढेल.

हळदीचे दूध

हिवाळ्यातील थंडी म्हटलं की सर्दी खोकला आलाच. दूध गरम करून त्यात अर्धा छोटा चमचा आणि त्याचबरोबर एक चिमूट काळीमिरी पावडर आणि वरून थोडेसे मध घातल्यास घशाला आराम भेटतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तसेच झोप लागण्यास मदत होते.

हळदीचा काढा

थंडीचा वातावरण म्हटलं की सारखी चहा पिण्याची इच्छा होते. बऱ्याचदा चहाच्या अतिप्रमाणाने ऍसिडिटी सारखा त्रास वाढतो. पाण्यात उकळून त्यात थोडे आले आणि मध घालून जर घेतले तर पचनास मदत होते आणि शरीरातील उष्णता वाढण्यास देखील सहायता मिळते.

Click on the link below