Site icon ताज्या बातम्या

Vinesh Phogat Disqualified! सुवर्णपदकापासून वंचित ! 50 किलो वजन गटात वजन जास्त झाले! Worst News Disappointed

Vinesh Phogat Disqualified!

भारताला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाट (Vinesh Phogat) कडून कुस्तीत सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा भंग झाली. पॅरिस ओलंपिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती गटाच्या उपांत्य फेरीत विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने अप्रतिम विजय नोंदवले आहे. परंतु आजच आलेल्या बातमीनुसार 50 किलो पेक्षा अधिक वजन असल्याकारणाने दिनेश फोगाट हिला अंतिम फेरी मधून बाद करण्यात आले आहे. त्यामुळे सुवर्णपदक देखील तिच्या हातातून गेले आहे.

वजन वाढू नये आणि 50 किलो गटात सामील होता यावं म्हणून तिने बरीच मेहनत घेतली होती. दिवस असो किंवा रात्र पूर्ण जिद्दीने वजन कमी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. इतक्या परिश्रमानंतर देखील जवळपास 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्यामुळे दिनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अपात्र ठरवण्यात आले.

इंडियन ओलंपिक असोसिएशन (IOA) निवेदन

इंडियन ओलंपिक असोसिएशन (IOA) ने असे निवेदनात म्हटले की, “महिला कुस्तीच्या 50 किलो वर्गातून विनेश फोगाट (Vinesh Phogat) अपात्र ठरल्याची बातमी भारतीय दलाने छेदाने शेअर केली आहे. रात्रभर संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी तिचे वजन 50 किलो पेक्षा काही ग्रॅम जास्त झाले. यावेळी दलाकडून पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो ते हातातील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत.

” कुस्तीपटू विनेश फोगाटने इच्छित वजन कमी करण्यासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न केला मग ते जे जेवण वगैरे असू दे किंवा कसरत करणे असू दे. वजन श्रेणीत येण्याच्या आशेने ती रात्रभर झोपली सुद्धा नाही. भारतीय शिबिराने ऑलम्पिक असोसिएशन कडे आणखी वेळ मागितला पण तो प्रयत्न सुद्धा व्यर्थ गेला.”, असे वक्तव्य IE च्या अहवालानुसार समोर आले आहे.

विनेश फोगाट (Vinesh Phogat) विरुद्ध युई सुसाकी मंगळवार, 07 ऑगस्ट 2024 च्या रात्री ५० किलो गटात फ्री स्टाईल कुस्तीचा सामना झाला होता. जागतिक क्रमांकावर अव्वल असलेल्या युई सुसाकीला उपांत्य फेरीत त विनेश फोगाट हिने 5-0 या संख्येने हरवले. वीनेश फोगट ही ऑलम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत पोचणारी पहिली भारतीय महिला ठरली.

Video Credit: TV9 Bharatvarsh

काय म्हणतात नियम?

अहवालानुसार, सर्व स्पर्धकांसाठी संबंधित वजन श्रेणीसाठी दररोज सकाळी वजन काटे आयोजित केले जातात. त्याचबरोबर वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाते. वजन आणि वैद्यकीय नियंत्रण प्रक्रिया जवळपास 30 मिनिटे चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी रेपेचेजेस आणि अंतिम फेरीमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीपटूनच वजन करावे लागते आणि पंधरा मिनिटे टिकून राहावे लागते.

कुस्तीपटूंना पहिल्या सकाळी वजन करताना त्यांचा परवाना आणि मान्यता सादर करावी लागते. त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी करण्यात येते. तसेच पोशाखाबद्दल सुद्धा काही विशिष्ट नियम लागू होतात. वजनासाठी फक्त सिंगलेत पोशाखाची परवानगी देण्यात येते. योग्यता असलेल्या डॉक्टरांद्वारे तपासणी केल्यानंतरच संसर्गजन्य रोगाचा धोका असलेल्या कोणत्याही गोष्टी पटूला अपात्र ठरवले जाते त्यानंतर त्या पैलवानाचे वजन केले जाऊ शकते. सिंगलेड साठी कोणतेही वजन सहन करण्याची परवानगी दिली जात नाही.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Paris Olympic 2024 | आज होणार आहे महा मुकाबला भारतीय हॉकी संघाचा टीमचा जर्मनीसोबत. Great Fight !

Exit mobile version